उपक्रम २ - 'रेल' चेल मेजवानी - प्राचीन

Submitted by प्राचीन on 19 September, 2023 - 14:51

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."

तिच्या चेहर्‍यावर आत्यंतिक उत्कंठा.. स्थळ - ग्वाल्हेरचा जयविलास राजमहाल.. महाराजांनी सुरू केलेली ही अजब अन्नपूर्णा गाडी म्हणजे महालाचं मुख्य आकर्षण. शाही मुदपाकखान्यातून थेट भोजनपीठावर, तब्बल ७४ मीटर लांबीच्या रुळांवर डौलाने दौडत
येणारी ही गाडी.
"ह्या हिंदुस्थानी राजामहाराजांची तर्‍हाच वेगळी. .. पारंपरिक वैभवात कल्पकतेची भर.. त्यातून हा महाल तर चारशे खोल्यांचा. ते संगमरवरी सुवर्णजडित वैभव पाहून ती हरखूनच गेली..शिवाय तिची खास बडदास्त ठेवली होती महाराणींनी.. साहजिकच होतं ते... हिंदुस्थानच्या व्हाईसरॉयची पत्नी होती ती. " तो समाधानानं हसला..
तिला मात्र वाटत होतं , "खरंतर ह्या अन्नपूर्णेवर आपलाच हक्क नव्हे काय?"
रीड मोअर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राचीन, मला कळली नाही गं.
मी हिंदुस्थानच्या व्हाईसरॉयची पत्नी आहे आणि तो ग्वाल्हेरचा राजमहाल आहे. मग माझा हक्क कसा त्या गाडीवर?

ओहोहो!!!! कसलं भारीये.
>>>>>>>>अन्नपूर्णा गाडी आणि राजमहलाच चित्र उभ केलत, शशक मघ्ये..
धन्यवाद छन्दिफन्दि

यापुढे 'तो' आणि 'ती' असच शोधत जाइन.

>>>>>>>तिला मात्र वाटत होतं , "खरंतर ह्या अन्नपूर्णेवर आपलाच हक्क नव्हे काय?"
ती स्वतःच जर अन्नपूर्णा गाडी आहे तर मग ती असे कसे म्हणते आहे की - खरंतर ह्या अन्नपूर्णेवर आपलाच हक्क नव्हे काय?

मलाही कळली नाही.
'तो' कोण
आणि व्हाईसरॉयच्या पत्नीचा गाडीवर हक्क कसा?

सर्व प्रतिसादांबद्दल आभार.
ती स्वतःच जर अन्नपूर्णा गाडी आहे तर मग ती असे कसे म्हणते आहे की - खरंतर ह्या अन्नपूर्णेवर आपलाच हक्क नव्हे काय >> सामो, इथे "ती" म्हणजे व्हाईसरॉय ची पत्नी. स्वातंत्र्यपूर्व काळातील काल्पनिक प्रसंग सादर करण्याचा प्रयत्न केला आहे गं.
धाग्यावेताळ, "तो" म्हणजे व्हाईसरॉय आणि -
"आणि व्हाईसरॉयच्या पत्नीचा गाडीवर हक्क कसा? ">> यासाठी ब्रिटिशकालीन भारतीय इतिहासात डोकावायला हवं. Happy

सामो, इथे "ती" म्हणजे व्हाईसरॉय ची पत्नी. स्वातंत्र्यपूर्व काळातील काल्पनिक प्रसंग सादर करण्याचा प्रयत्न केला आहे गं.
धाग्यावेताळ, "तो" म्हणजे व्हाईसरॉय आणि -
"आणि व्हाईसरॉयच्या पत्नीचा गाडीवर हक्क कसा? ">> यासाठी ब्रिटिशकालीन भारतीय इतिहासात डोकावायला हवं>>>>>

माझ्या पण असच डोक्यात आलेलं..

तो राजा मंडलिक असेल ब्रिटिशांचा म्हणून तिला असा वाटलं..

छान कथा. Happy
शेवटचा व्हॉईसरॉय माऊंटबॅटन होता की काय, अजूनही entitled आहेत मिसेस एडविना व्हॉईसरॉय.स्वातंत्र्य मिळाल्यावरही अधिकार सोडवत नाहीये.

सामो, उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष आभार.
अमितव, छन्दिफन्दि, धाग्अया, स्मिता., ह. पा., ऋन्मे§§ष, सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
(इथे लिंक देऊन चालेल का ते माहीत नाही. The Tribune मध्ये पूर्वी ग्वाल्हेर महालातील ह्या गाडीबद्दल व गव्हर्नर बद्दल वाचलेलं. तो प्रसंग जरा वेगळा होता . पण कथा याच कल्पनेवरून बेतलेली आहे. शिवाय सयाजीरावांकडे अशा प्रकारची त्यांच्या खाजगी वस्तूची मागणी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली वाचली होती. त्यामुळे तसं घडत असेलही असं वाटतं.)