Submitted by बिपिनसांगळे on 28 September, 2023 - 15:17
खाट
-----
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं...
ती एक जुनी, फोल्डिंगची लोखंडी खाट होती . हिरवा रंग उडालेली . मोठ्या साईझची.
त्याने घरातलं आवरायला काढलं होतं . त्यात जुन्या जुन्या अनेक वस्तू . .
भंगारवाल्याची गाडी आली . माणसांनी सामानाला हात घातला . तसं त्याला काही वाटलं .
तो म्हणाला ,' ही खाट काढा बाजूला . ठेवा पुन्ना घरात . '
त्याची बायको चमकली , ' का वो ? पुन्ना कशाला ? '
'राहू द्ये गं ! माज्या मायबापाची आठवण हाय .'
' अस्सं ? राहू द्या तं राहू द्या . तुमचा जन्म त्या खाटेमुळे झाला आसन ... बघू- तिच्यामुळं तरी आपल्या घरी पाळणा हालतूया का ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान जमलंय.
छान जमलंय.
ती खाट इतके दिवस वापरात
ती खाट इतके दिवस वापरात नव्हती का ? मग घरात कुठे/कशी ठेवली असेल
हाहाहा फोल्ड करून - माळ्यावर
हाहाहा
फोल्ड करून - माळ्यावर
बायको फारच ब्वॉ स्पष्टवक्ती
बायको फारच ब्वॉ स्पष्टवक्ती
(No subject)
मंडळी खूप आभारी आहे
मंडळी खूप आभारी आहे
उपक्रमाची ओळ आली . आणि मला
उपक्रमाची ओळ आली . आणि मला वाटतं - सामो म्हणाल्या - अवघड आहे सुचणं .
मलाही तसंच वाटलं
पण लोकांची कल्पनाशक्ती धावू लागली .
मलाही बरंच सुचलं पण - सगळंच गंभीर . मग मी ठरवून विनोदी लिहायचं ठरवलं .
ही कथा लिहिली . पण वात्रटपणाची मात्रा थोडी जास्त झाली .
पण - यामध्ये विनोद आहे . तिचा खवचटपणा आहे , तरी , पोस्ट केल्यानंतर मला त्यामधली तिची वेदनाच जाणवत राहिली
तिखट, करुण विनोद.. आवडली..
तिखट, करुण विनोद..
आवडली..