लेखन उपक्रम २ - सुंदरता - अजय चव्हाण

Submitted by अजय चव्हाण on 26 September, 2023 - 07:53

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं.

चेहरा पूर्ण ओढणीने झाकून घेतला असला तरी ते डोळे आणि त्या परिचित सुंगंधाने तीच असावी, असं सारखं त्याला मनोमन वाटतं होतं.

खरंतरं ती त्यांच्या बॅचची कॉलेजक्वीन. तिच ते शालीन सौंदर्य विसरण्यासारखं नव्हतंचं मुळी. तिलाही तिच्या सुंदरतेचा फार अहंकार नसला तरीही अभिमान मात्र नक्की होता.

इतक्यातच,अचानक धाडधाड करत मालगाडी आली नि गेली. तसा तो वर्तमानात आला आणि पुन्हा तिच्याकडे पाहीलं‌ आणि क्षणात विजेचा झटका बसावा तसा दिड फूट मागे सरला.

तिच्या चेहर्यावरची ओढणी तिने काढली होती आणि जळालेल्या गालांवरून हलकेच रूमालाने पुसत ती त्याच्याचकडे पाहत होती.

-अजय चव्हाण.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users