लेखन उपक्रम २ - सुटका - rmd

Submitted by rmd on 25 September, 2023 - 22:24

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तिचा चेहरा ओढलेला होता. गाल सुजलेला. शरीर खंगलेलं. हातात एक सूट्केस. खांदयाला पर्स.
पण तिच्या डोळ्यांत मात्र आनंद फुलून आलेला होता.
"आलीस?"
"हो. कायमचं सगळं सोडून आले. परत न जाण्यासाठी"
"आधीच का नाही आलीस परत?" त्याने आवंढा गिळला.
"सुरूवातीला तो असा असेल असं वाटलं नाही. हळुहळू त्याचा खरा चेहरा समोर आला.
आणि कुठल्या तोंडाने घरी येणार होते? तुमच्या मनाविरूद्ध पळून गेले होते ना! धीरच झाला नाही.
आता हेच माझं नशीब असं मान्य केलं होतं.
पण आज तुम्ही स्वतः भेटायला आलात आणि हिंमत आली. थँक्यू बाबा!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त ! आवडली...

वा! हा मार्ग सर्व स्त्रियांना उपलब्ध असो
>>>>
ते बाप सुद्धा दुर्दैवी जे हा मार्ग बंद करत असतील..आणि आपली पोरगी गमावत असतील..

मस्तच.