मायबोलीकरांनो, 'शशक पूर्ण करा' या उपक्रमासाठी अजून एक नवीन सुरुवात आम्ही खाली देत आहोत.
" शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच..."
चला लवकर, ही सुरुवात पकडून वेगवेगळ्या काल्पनिक कथा मांडा.
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव लेखन उपक्रम ३ - कथेचे शीर्षक - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक ) अशा प्रकारे द्यावे. शब्दखुणांमध्ये उपक्रमाचे नाव "एकारंभा अनंतार्था" असे लिहावे.
3. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४ . प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||
छान रंगतदार होणार ही शशक
छान रंगतदार होणार ही शशक