लेखन उपक्रम २ - भूतकाळ - अमितव

Submitted by अमितव on 22 September, 2023 - 12:16

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
बांधलेले केस, उत्फुल्ल चेहरा, वय वाढल्याच्या खुणा तरी अजुनही आकर्षक. त्याची नजर तिच्या अंगप्रत्यंगावरुन फिरत्येय, बारा वर्षांनी! छद्मी हास्य. शरीरात उष्णउर्जेचा लोट, आणि दुसर्‍याच क्षणाला तो तिच्या समोर! "मी बदललोय, आपण परत आयुष्य चालू करू" शब्द कानावर पडायला आणि गळ्यात दोन्ही हाताचा विळखा पडायला एक गाठ. "माया जरा हळू!" ओठ चावलाच तिने.
त्याची नजर मायाच्या शरीराला आरपार भेदत्येय!
"माझीच ना?"
"तुला काय हवंय? पैसे?"
त्याचं लक्ष मायाकडे! मायाला काहीतरी देतोय तो. माझा भूतकळ देतोय?
तिरीमिरीत त्याला बाजुला ढकललं, आणि मायाला पकडलं. खोल दरीत जरावेळासाठी शांतता पसरली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायाबरोबर तिचा मित्र आहे त्याला, नायकाने म्हणजे मायाच्या एक्स लव्हरने दरीत ढकलले. स्वतःसुद्धा मायाबरोबर दरीत उडी घेतलेली असू शकते.

बाप रे! प्रतिसाद वाचून अंदाज आला. आधी नीट कळली नव्हती.

(मला वाटलं ती माया साने आहे, आणि हा श्याम फ्रॉम शांतेचं कार्टं चालू आहे)

ओह! Sad
रुन्मेषच्या प्रतिसादावरून कळली.

त्याला दरीत ढकलले इतके आधी कळले.

रुन्मेषच्या प्रतिसादावरून कळली...... हो.

सोलीव संत्रे परत का चिकटवले?

मला समजली ती अशी:
माया - १०-११ वर्षांची तिची मुलगी आहे.
तो - १२ वर्षांपुर्वी त्याने प्रेमात फसवून किंवा नुसतेच शारीरिक फायदा घेऊन सोडून दिलेय

आताही बदलला असे म्हणाला तोंडाने तरी छद्मी हास्यावरुन मनसूबा वाईट आहे हायलाईट होतेय. आणि आता तिला भूतकाळ रिपीट होताना नजरेतल्या वासनेवरुन दिसतेय. यावेळी या वासनेच टार्गेट माया होऊ शकते (भूतकाळ देतोय म्हणजे सेम तिला दिलेली ट्रिटमेंट मायाबाबत रिपीट) म्हणून ती मायाला आधीच प्रोटेक्ट करत त्याला ढकलून देत त्याचा अंत करतेय.

हा मला लागलेला अर्थ. कालचं सोललेलं संत्र ज्यांनी वाचलय त्यांनी काही वेगळे आहे का सांगा Proud

@ कविन,
तुम्ही लिहिलेल्या पोस्टचे शब्द मोजा. जवळपास शंभर भरले तर काढलेला अर्थ बरोबर समजा..
शब्द कमी पडले तर त्यात संयोजकांनी दिलेली गाडी जोडा

मी रात्री अर्धवट झोपेत होतो त्यामुळे संत्रे होते की मोसंबी हे सुद्धा विसरलो..

ओये! काल "जा ने जा" थोडा पाहिला. आता या कथेला त्याचा संदर्भ असावा असे दिसते Happy तो आधी पाहिला असता तर लगेच समजली असती Happy

ती संत्र पोस्ट हेच सांगणारी होती का?

जा ने जा ? मराठीत वाचलं, जा आणि जाताना सोललेले संत्रे ने या अर्थाने. Happy

कविन, धन्यवाद.
छान कथा. वाचकांना आणि व्हिलनला अक्षरशः 'क्लिफहॅन्गर'वर सोडलं आहे. Happy

ओये! काल जा ने जा थोडा पाहिला. आता या कथेला त्याचा संदर्भ असावा असे दिसते Happy>> मी आज पाहिला आणि पाहताना ही कथा आठवली मलाही

मी पण काल जानेजा पाहिला. आज ही शशक वाचली. कळ्ळी बरं मला , तुम्ही मायाला तारा करून दिशाभूल केलीत तरीही Lol

मला आधी वाटलं अमित नेहमीप्रमाणे टाइम ट्रॅव्हलची कायतरी गीकी कॉम्प्लिकेटेड ष्टोरी सांगतोय. मग मी पण 'जानेजा' पाहिला आणि एकदम ट्यूब पेटली. Proud Happy
(सिनेमा आवडला नाही - पण तो दुसर्‍या धाग्याचा विषय आहे.)

गूढ कथा...
छान जमलीयं..
कविन तुम्ही छान उलगडा केलात कथेचा..!

Pages