लेखन उपक्रम २ - भूतकाळ - अमितव

Submitted by अमितव on 22 September, 2023 - 12:16

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
बांधलेले केस, उत्फुल्ल चेहरा, वय वाढल्याच्या खुणा तरी अजुनही आकर्षक. त्याची नजर तिच्या अंगप्रत्यंगावरुन फिरत्येय, बारा वर्षांनी! छद्मी हास्य. शरीरात उष्णउर्जेचा लोट, आणि दुसर्‍याच क्षणाला तो तिच्या समोर! "मी बदललोय, आपण परत आयुष्य चालू करू" शब्द कानावर पडायला आणि गळ्यात दोन्ही हाताचा विळखा पडायला एक गाठ. "माया जरा हळू!" ओठ चावलाच तिने.
त्याची नजर मायाच्या शरीराला आरपार भेदत्येय!
"माझीच ना?"
"तुला काय हवंय? पैसे?"
त्याचं लक्ष मायाकडे! मायाला काहीतरी देतोय तो. माझा भूतकळ देतोय?
तिरीमिरीत त्याला बाजुला ढकललं, आणि मायाला पकडलं. खोल दरीत जरावेळासाठी शांतता पसरली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविनच्या पोस्टमुळे समजली. जाने जा.

एक दोन ठिकाणी जरा गोंधळात टाकणारी शब्दरचना आहे. ती सहज केली तर जास्त परिणामकारक होईल असं वाटतं.

प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचे आभार.
यात इंजिनिअरिंग जास्त आणि कला कमी वाटत असतानाच, लिहायला सुरुवात केल्यावर मनावर शब्दांची ताकद अधोरेखित होत गेली. आधी जवळ जवळ दीडपट शब्द लिहिले होते. ते कमी करताना अर्थाचा कंगोरा कमी न होता वाढलाच. ते बघताना मजा आली.

उदा. >>खोल दरीत जरावेळासाठी शांतता पसरली. >> इथे नक्की काय झालं ते आधी नीट उलगडणार होतो. पण मग ते फार सपक आणि अगदीच सपाट वाटू लागलं. परत शब्दही जास्त होऊ लागले. शब्द जपून वापरण्यात शब्दांचे कंगोरे दिसू लागले, डीटेल्स वाचकांवर सोडून देणे इ. तंत्रे जी सिनेमात वापरतात आणि तसा सिनेमा बघताना आवडतात ती सुद्धा थोडी फार का होईना वापरता आली.

मला वाटतं कविता का आवडते, ती का सहजच वाचकाची होते यात तोलुन मापून वापरलेले शब्द हे ही एक कारण असावं. त्यामानाने गद्य खूप जास्त लिहिलेलं असल्याने बर्‍याचदा विचार करायला जास्त जागाच नसल्याने एकाच मितीत दिसत रहातं. कविता रिलेट होण्यामागे कदाचित या शब्द जपून वापरण्याचा ही हात असावा का?

गूढगम्य Happy सर्वांचे प्रतिसाद वाचूनही नाही कळली. "माया जरा हळू!" इथून जो track सुटला तो सुटलाच.
पण गूढगम्य बनून राहिली शशक हे सुद्धा छान वाटले. नकळत मन रवंथ करत राहते नंतर त्यावर.

Pages