Submitted by अमितव on 22 September, 2023 - 12:16
" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
बांधलेले केस, उत्फुल्ल चेहरा, वय वाढल्याच्या खुणा तरी अजुनही आकर्षक. त्याची नजर तिच्या अंगप्रत्यंगावरुन फिरत्येय, बारा वर्षांनी! छद्मी हास्य. शरीरात उष्णउर्जेचा लोट, आणि दुसर्याच क्षणाला तो तिच्या समोर! "मी बदललोय, आपण परत आयुष्य चालू करू" शब्द कानावर पडायला आणि गळ्यात दोन्ही हाताचा विळखा पडायला एक गाठ. "माया जरा हळू!" ओठ चावलाच तिने.
त्याची नजर मायाच्या शरीराला आरपार भेदत्येय!
"माझीच ना?"
"तुला काय हवंय? पैसे?"
त्याचं लक्ष मायाकडे! मायाला काहीतरी देतोय तो. माझा भूतकळ देतोय?
तिरीमिरीत त्याला बाजुला ढकललं, आणि मायाला पकडलं. खोल दरीत जरावेळासाठी शांतता पसरली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणीतरी संत्रे सोलेल का?
कोणीतरी संत्रे सोलेल का?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सोलल्यावर एक साल माझ्याही
सोलल्यावर एक साल माझ्याही डोळ्यात पिळा
मायाबरोबर तिचा मित्र आहे
मायाबरोबर तिचा मित्र आहे त्याला, नायकाने म्हणजे मायाच्या एक्स लव्हरने दरीत ढकलले. स्वतःसुद्धा मायाबरोबर दरीत उडी घेतलेली असू शकते.
***संत्र****
***संत्र****
आवडली.
आवडली.
माया त्यांची मुलगी.. इतके
माया त्यांची मुलगी.. इतके पुरले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी एडिट करायचे असेल तर करू शकता..
आणि हो.. छान आहे
बाप रे! प्रतिसाद वाचून अंदाज
बाप रे! प्रतिसाद वाचून अंदाज आला. आधी नीट कळली नव्हती.
(मला वाटलं ती माया साने आहे, आणि हा श्याम फ्रॉम शांतेचं कार्टं चालू आहे)
नाहीच समजली
नाहीच समजली
ओह!
ओह!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रुन्मेषच्या प्रतिसादावरून कळली.
त्याला दरीत ढकलले इतके आधी
त्याला दरीत ढकलले इतके आधी कळले.
रुन्मेषच्या प्रतिसादावरून कळली...... हो.
सोलीव संत्रे परत का चिकटवले?
समजली. जमलेय कथा
समजली. जमलेय कथा
प्रतिसादावरून थोडी कळली.
प्रतिसादावरून थोडी कळली. वेगळी आहे पण..
मलाही प्रतिसादांवरून थोडीफार
मलाही प्रतिसादांवरून थोडीफार कळाली असे वाटत आहे. पण नक्की काय आहे माहीत नाही.
मला समजली ती अशी:
मला समजली ती अशी:
माया - १०-११ वर्षांची तिची मुलगी आहे.
तो - १२ वर्षांपुर्वी त्याने प्रेमात फसवून किंवा नुसतेच शारीरिक फायदा घेऊन सोडून दिलेय
आताही बदलला असे म्हणाला तोंडाने तरी छद्मी हास्यावरुन मनसूबा वाईट आहे हायलाईट होतेय. आणि आता तिला भूतकाळ रिपीट होताना नजरेतल्या वासनेवरुन दिसतेय. यावेळी या वासनेच टार्गेट माया होऊ शकते (भूतकाळ देतोय म्हणजे सेम तिला दिलेली ट्रिटमेंट मायाबाबत रिपीट) म्हणून ती मायाला आधीच प्रोटेक्ट करत त्याला ढकलून देत त्याचा अंत करतेय.
हा मला लागलेला अर्थ. कालचं सोललेलं संत्र ज्यांनी वाचलय त्यांनी काही वेगळे आहे का सांगा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
@ कविन,
@ कविन,
तुम्ही लिहिलेल्या पोस्टचे शब्द मोजा. जवळपास शंभर भरले तर काढलेला अर्थ बरोबर समजा..
शब्द कमी पडले तर त्यात संयोजकांनी दिलेली गाडी जोडा
मी रात्री अर्धवट झोपेत होतो त्यामुळे संत्रे होते की मोसंबी हे सुद्धा विसरलो..
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असच म्हणायचं होतं.
कविन, तूमाखमै
कविन थँक्यु... नाहीतर काहीच
कविन थँक्यु... नाहीतर काहीच कळली नव्हती.
अमितव , आता आवडली.
भारी. कविन यांचा प्रतिसाद
भारी. कविन यांचा प्रतिसाद वाचल्यावर नीट उलगडली.
इन्साफ का तराजू चित्रपट आठवला.
ओये! काल जा ने जा थोडा पाहिला
ओये! काल "जा ने जा" थोडा पाहिला. आता या कथेला त्याचा संदर्भ असावा असे दिसते
तो आधी पाहिला असता तर लगेच समजली असती ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती
संत्रपोस्ट हेच सांगणारी होती का?जा ने जा ? मराठीत वाचलं, जा
जा ने जा ? मराठीत वाचलं, जा आणि जाताना सोललेले संत्रे ने या अर्थाने.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविन, धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान कथा. वाचकांना आणि व्हिलनला अक्षरशः 'क्लिफहॅन्गर'वर सोडलं आहे.
ओये! काल जा ने जा थोडा पाहिला
ओये! काल जा ने जा थोडा पाहिला. आता या कथेला त्याचा संदर्भ असावा असे दिसते Happy>> मी आज पाहिला आणि पाहताना ही कथा आठवली मलाही
मराठीत वाचलं, जा आणि जाताना
मराठीत वाचलं, जा आणि जाताना सोललेले संत्रे ने या अर्थाने. >>>
कोटात टाकले ते ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद फा, 'कोटा'ने कसं
भारी आहे गूढ पण मस्त
भारी आहे गूढ पण मस्त
जानेजाला आय आय टी ची तयारी
जानेजाला आय आय टी ची तयारी करायला पाठवलं असं पण वाटतं.
मी पण काल जानेजा पाहिला. आज
मी पण काल जानेजा पाहिला. आज ही शशक वाचली. कळ्ळी बरं मला , तुम्ही मायाला तारा करून दिशाभूल केलीत तरीही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो हो! 'जा ने जा' च प्रेरणा
हो हो! 'जा ने जा' च प्रेरणा होती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला समजली नव्हती, कविताने
मला समजली नव्हती, कविताने समजाऊन सांगितली म्हणून समजली.
छान आहे.
मला आधी वाटलं अमित
मला आधी वाटलं अमित नेहमीप्रमाणे टाइम ट्रॅव्हलची कायतरी गीकी कॉम्प्लिकेटेड ष्टोरी सांगतोय. मग मी पण 'जानेजा' पाहिला आणि एकदम ट्यूब पेटली.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(सिनेमा आवडला नाही - पण तो दुसर्या धाग्याचा विषय आहे.)
गूढ कथा...
गूढ कथा...
छान जमलीयं..
कविन तुम्ही छान उलगडा केलात कथेचा..!
Pages