चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-५ - चॉकलेट,गोळ्या,लहानपणीचा खाऊ

Submitted by संयोजक on 23 September, 2023 - 01:43

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - चॉकलेट,गोळ्या,लहानपणीचा खाऊ

लहानपणीच्या अनेक आठवणी आपल्या गाठीशी असतात..त्यातील सगळ्यात गोड आठवण म्हणजे खाऊ..लहानपणी खाल्लेल्या खाऊ ची सर आत्ताच्या बर्गर,पिझ्झा मध्ये नाही...शाळेच्या मधल्या सुट्टीत खाल्लेल्या चिंचा, उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी खाल्लेला पेप्सिकोला....अजून खूप काही..

मग अशाच तुमच्या आठवणीतल्या छान छान खाऊची प्रकाशचित्र आम्हाला पाठवा..

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खारे दाणेIMG-20230923-WA0024.jpg
निल्स दे दे, मग मीही देईन Wink

आहा रावळगाव

हे डाळिंबाचे लालचुटुक दाणे
IMG-20230923-WA0023.jpg

पान पसंद
क्या, शादी और तुमसे?? कोब्बी नोई!!
IMG_20230923_163420.jpg

लहानपणीचा खाऊ.. काल पण आणि आज पण.. गोळा सरबत आणि चम्मच Happy

कोणाला चम्मच माहीत नसेल तर सांगतो, यात बर्फाचा चुरा एका ग्लासमध्ये काठोकाठ भरतात आणि त्यावर सरबत ओततात. म्हणजे एक प्रकारचा ग्लासात कोंबलेला गोळा जो चमच्याने खायचा असतो Happy

IMG_20230923_173134.jpg

Yummy!!!
ऋन्मेष, अवल - दोघांचा खाऊ आवडला.

पेरु माझा वीक पॉइन्ट आहे.

वाह हर्पेन.. लूट लो फोटो एकदम

ही पार्ले बिस्कीट मलाही आवडतात. मुळात मी बिस्कीट न आवडणारा प्राणी असून खातो म्हणजे आवडतात बोलू शकतो. याचा डब्ब्बा एका दर्शनीय जागी ठेवला की येता जाता अध्येमध्ये तोंडात टाकली जातात

20230926_125700.jpg
अनुपम प्रॉडक्ट..काजूकंद

झकास बोरकुट !

आता कुणीतरी चिंचेचा फोटो टाका म्हणजे कोरम पूर्ण होईल Happy

IMG_20230409_175700.JPG
घ्या...
शाळेच्या बाहेर नेहमी मिळायच्या मस्त गाभुळी चिंचा.