Submitted by mi manasi on 22 September, 2023 - 14:41
ओळख
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
वेणीचा लांब शेपटा. केसात गजरा. कॉटनची कडक साडी. नक्की तीच!
नेहमी अशीच रहायची..
अजूनही तशीच दिसते.
“प्रसाऽऽद!”
तिने त्याच्या दिशेने पहात हात हलवला.
त्याचे डोळे भरून आले.. बारा वर्षांनंतरही तिने मला ओळखलं? आठ वर्षाचा होतो घरातून निघून गेलो तेव्हा..
तिच्यासोबत घालवलेला एक एक प्रसंग आठवून जीवाची घालमेल झाली.
वाटलं धावत तिच्याजवळ जावं आणि तिला घट्ट मिठी मारून सांगावं..
‘आई मी तुला..’
पाऊल पुढे पडलंही..
इतक्यात मागून त्याच्याच वयाचा तरुण आला. घाईघाईने तिच्याजवळ जाऊन सामान घेत म्हणाला..
“आई, चल गाडी आली. बाबा येतायत.”
त्याला बोलवलं.. हमाऽऽल!
मी मानसी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे! त्याच्या वयाचा?
बाप रे! वाईट वाटले.
.
.
.
त्याच्या वयाचा? दत्तक.
आई ग्ग..... असं झालं
आई ग्ग..... असं झालं
पण तरी जावे त्याने परत.. दरवाजे बंद झाले असे का समजावे
आई आणि गर्लफ्रेंडमध्ये हाच तर फरक असतो.
सामो, ऋन्मेष.. प्रतिसादासाठी
सामो, ऋन्मेष.. प्रतिसादासाठी आभार!
दत्तक>> हो
पण त्याने परत जावे>> नाही जाऊ शकत.
* शेवट बदललाय.
बाप रे!
बाप रे!
काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. एका कामानिमित्त पुण्याजवळ वेल्हे तालुक्यात भोर्डी नावाच्या एका लहान गावात गेलो होतो. साधारण १-२ हजार वस्ती असेल. किंवा कमीच. तिथे पाहतो तर कुणी तरुण मंडळीच दिसेनात. एक तर अगदी लहान मुलं नाहीतर चाळीस/ पन्नाशीच्या पुढचे लोक. मला जरा आश्चर्य वाटलं आणि थोडी चौकशी केली. तेव्हा कळलं की मुलं साधारण वयात आली की मग ती कोल्हापूरला तालमीत जाऊन शरीर कमावतात. का? तर त्यानंतर ती पुणे मुंबई वगैरे ठिकाणी फलाटांवर हमाल म्हणून काम करतात. साधारण चाळिशी पर्यंत मग त्यांची हाडं वाकतात, मोडतात. मग बाकी काही करता येत नाही तेव्हा गावात परत येतात.
नंतर गावात फिरताना अशी हाडं मोडलेली, पाठीतून वाकलेली काही माणसं दिसली. फार हृदयद्रावक दृश्य होतं ते!
बाप रे बाप!!! फार टचिंग आणि
बाप रे बाप!!! फार टचिंग आणि विचित्रच आहे हे हपा.
शशक छान जमलंय.
शशक छान जमलंय.
हपा, सुन्न करणारे आहे हे.
शशक छान जमलंय.
शशक छान जमलंय.
हपा, सुन्न करणारे आहे हे.>>+१
@हपा
@हपा
@मानव
@कविन
प्रतिसादासाठी आभार!
अगदी टचिंग अनुभव सांगितलात हपा.
शशक आणि हपा पोस्ट हृदय
शशक आणि हपा पोस्ट हृदय द्रावक
शशक छान जमलंय.
शशक छान जमलंय.
हपा, सुन्न करणारे आहे हे. >>>> +1
बाप रे!
बाप रे!
टचिंग!
टचिंग!
नाही जाऊ शकत.
नाही जाऊ शकत.
* शेवट बदललाय.
>>>>>
हमाल... आता परफेक्ट झालीय !
Submitted by हरचंद पालव on 23
Submitted by हरचंद पालव on 23 September, 2023 - 03:55
>>>>
माथाडी कामगार... हाल असतात नंतर..
ओह!
ओह!
छान लिहिली आहे लघुकथा.
हपा
वडीलच त्याला बोलावतात - हमाल
वडीलच त्याला बोलावतात - हमाल म्हणून ओळखत नाहीत ते.
वडीलच त्याला बोलावतात - हमाल
वडीलच त्याला बोलावतात - हमाल म्हणून >>>> अरेरे... !!
छान शशक.
अरेरे शशक छान आहे
अरेरे
शशक छान आहे
@अज्ञानी
@अज्ञानी
@Sanjana25
@SharmilaR
@rmd
@ऋन्मेष
@स्वाती आंबोळे
@आबा
@वंदना
@सामो
आपले मनापासून आभार!
मागून त्याच्याच वयाचा तरुण आला >>
तो बोलवतो त्याला. वडील नाही.
छान शशक!
छान शशक!
हपा, सुन्न करणारे आहे हे.......... +१.
@देवकी आभारी आहे.
@देवकी
आभारी आहे.
हृदयस्पर्शी शशक...!
हृदयस्पर्शी शशक...!
आवडली. ह. पालव,
आवडली.
ह. पालव,
सुरवातीला पट्कन कळली नाही पण
सुरवातीला पट्कन कळली नाही पण प्रतिसाद वाचून कळली. सुन्न करणारी शशक. हरपा यांचा प्रतिसाद सुद्धा
@रुपाली विशे-पाटील
@रुपाली विशे-पाटील
@सुनिधी
@अतुल
आभारी आहे.
ओह ! वाईट वाटले .
ओह ! वाईट वाटले .
हपा यांचा अनुभव ही हृदयद्रावक
हृदयस्पर्शी, वाईट वाटलं.
हृदयस्पर्शी, वाईट वाटलं.
@ जाई आभारी आहे.
@ जाई
आभारी आहे.
कथेने रडवलं, टचिंग.
कथेने रडवलं, टचिंग.
नंतर गावात फिरताना अशी हाडं मोडलेली, पाठीतून वाकलेली काही माणसं दिसली. फार हृदयद्रावक दृश्य होतं ते! >>> नि:शब्द.
@ rr38
@ rr38
@ अन्जू
बोलका प्रतिसाद आहे तुमचा..
आभारी आहे.
Pages