Submitted by mi manasi on 22 September, 2023 - 14:41
ओळख
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
वेणीचा लांब शेपटा. केसात गजरा. कॉटनची कडक साडी. नक्की तीच!
नेहमी अशीच रहायची..
अजूनही तशीच दिसते.
“प्रसाऽऽद!”
तिने त्याच्या दिशेने पहात हात हलवला.
त्याचे डोळे भरून आले.. बारा वर्षांनंतरही तिने मला ओळखलं? आठ वर्षाचा होतो घरातून निघून गेलो तेव्हा..
तिच्यासोबत घालवलेला एक एक प्रसंग आठवून जीवाची घालमेल झाली.
वाटलं धावत तिच्याजवळ जावं आणि तिला घट्ट मिठी मारून सांगावं..
‘आई मी तुला..’
पाऊल पुढे पडलंही..
इतक्यात मागून त्याच्याच वयाचा तरुण आला. घाईघाईने तिच्याजवळ जाऊन सामान घेत म्हणाला..
“आई, चल गाडी आली. बाबा येतायत.”
त्याला बोलवलं.. हमाऽऽल!
मी मानसी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशक आणि हपांचा प्रतिसाद
शशक आणि हपांचा प्रतिसाद
खूप टचिंग खूप
खूप टचिंग खूप
हपा - काय अनुभव - वाईट आहे हे
Pages