लेखन उपक्रम २ - स्पर्धा - प्राचीन

Submitted by प्राचीन on 23 September, 2023 - 10:13

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."

तिचं वाकड्यात जाणं त्याच्या ओळखीचं होतं. पण आज तिची जरा जास्तच चमकोगिरी चालली होती. गुलाबाच्या पाकळ्या काय, चंदेरी - केशरी किनार काय.. त्याला एरव्ही फारसा न्यूनगंड वाटत नसे. पण आजची गोष्ट वेगळी होती.. त्याच्याकडे फारसं लक्षवेधक काही नव्हतं..आधीच गोलमटोल शरीर, त्यातून नावासारखे कोणतेही गुण नाहीत...
"हं...." त्यानं एक सुस्कारा सोडला आणि 'चमचे'गिरी करणाऱ्याकडे
तुक टाकला..
"इट इज द लिटिल, लिटरल अॅलराऊंडर स्वीट ऑफ भारत - गुलाबजामुन.." एक भारदस्त, कौतुकभरला आवाज.. त्याच्याकडे वळलेल्या नजरा..
जी - २०च्या पाहुण्यांची गाडी आली होती तर..
आणि यावर नाक उडवणारी ती.. जिलबी..
जलने दो .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy जमली आहे. खूप गोड!!
>>>> जी २०
अति समर्पक.
बायडेनच्या तोंडी घाल ना. आय मीन जस्ट अ सजेशन. Happy इटस अप टू यु.

Cute

फार गोड.

मी गोडखाऊ नाही फार पण गोलमटोल आवडीचा. ती नखरेल नाही आवडत.