Submitted by छन्दिफन्दि on 21 September, 2023 - 22:12
मस्तांग आलू
साहित्य:
बटाटे, तेल, मीठ, मसाला( तिखट, जिरेपूड, आमचूर, गरम मसाला, चाट मसाला ह्यांचे मिश्रण)
कृती:
१. बटाटे कुकर मध्ये शिजवून घ्यावेत.
२. साल काढून थोड्या मोठ्या फोडी कराव्यात
३. फ्राय पॅन मध्ये थोड तेल घ्यावं
४. तेल तापल्यावर त्याच्यात बटाटयाच्या फोडी एका थरात पसरवांव्यात
५. खालची बाजू crispy झाली की फोडी परत पलटवा
६. थोड मीठ टाका
७. बटाटे क्रिस्पी झाले की त्यात वर तयार केलेले मसाल्याचे मिश्रण भुरभुरवा
८. चटकदार मस्तांग आलू तयार.
९ . नुसते खायला न्याहारी साठी ही छान लागतात
१०. पोळीला, थोडा सॉस/ चटणी लावून वर हे मस्ताग आलू ठेवायचे, थोडा अजून चाट मसाला, कोथिंबीर, चीज ( आवडत असेल तर किंवा protein / calcium साठी) टाका. रोल करून mastang आलू रोल डब्यासाठी तयार.
---
---
---
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच.बटाटा त्यातही इतका
मस्तच.बटाटा त्यातही इतका चटपटीत. नक्की करून बघणार.
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
मस्त.. बटाटे असेच उचलून
मस्त.. बटाटे असेच उचलून तोंडात टाकावेत ईतके छान दिसत आहेत.
ही पण मस्त. आणि करायलाही
ही पण मस्त. आणि करायलाही सोपी.
पाककृती प्रकारात स्थलांतरीत
पाककृती प्रकारात स्थलांतरीत करेपर्यंत प्रतिसाद देण्याची सोय थांबवत आहोत.