प्रकाशचित्रण

किल्ले तिकोना उर्फ कठीणगड !

Submitted by अपूर्व on 4 August, 2014 - 22:50

सुधागड ट्रेक जवळ जवळ ठरलेला होता. सगळं सेट होतं, पावसाने अप'सेट' करेपर्यंत. जुलै च्या अखेरीस जाग्या झालेल्या पावसाने सुधागड ट्रेक धुक्यात ढकलला. पण दोन महिन्यांचा ट्रेकुपवास सोडायचा मुहूर्त आम्हाला सोडायचा नव्हता. केवढा पाऊस पडतोय, दरडी कोसळतायत, अशात सुधागड.... नको ना!... मग?.... मग तिकोना ! अशा प्रकारे तिकोना ट्रेक ठरला. त्यानुसार क्रिपया ध्यान दे; पाली जानेवाली गाडी आज पवना जाएगी. अशी सूचना घुमली.
aa

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden

Submitted by दिनेश. on 4 August, 2014 - 08:59

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

सोमवारपासून माझ्या सहली सुरु झाल्या. एकेका दिवसात बरीच ठिकाणे बघून व्हायची.
सुरवात झाली ती तिथल्या बोटॅनिकल गार्डन पासून. याचे लोकप्रिय नाव आहे Pamplemousses Botanical Garden तर शासकीय नाव आहे Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden.

३७ हेक्टरवर पसरलेले हे उद्यान जगपसिद्ध आहे. फक्त एकच प्रॉब्लेम होता कि सध्या तिथे हिवाळा असल्याने

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre

Submitted by दिनेश. on 1 August, 2014 - 09:03

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

दुसरा दिवस रविवार होता. त्यादिवशी मला कुठलीही टुअर नव्हती म्हणून स्वतंत्रपणे फिरायचे ठरवले.
नेटवर काही छान ठिकाणे दिसत होती. पण रविवार असल्याने ती बंद होती. शुगर म्यूझियम मात्र उघडे आहे,
असे टॅक्सीवाल्याने सांगितले. म्हणून तिथे गेलो.

साखर हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे आणि सध्याही तेच निर्यातीचे प्रमुख उत्पादन आहे.
उसाच्या शेतीत काम करायला म्हणून अनेक भारतीय लोक गेले असले तरी त्यांना गुलाम म्हणणे मला तरी

पाण कोंबडी

Submitted by जो_एस on 31 July, 2014 - 21:41

सध्या घराच्या आसपास बरेच पक्षी आहेत. पहाटे ५ पासून त्यांची गाणी सुरू होतात.

ही पाण कोंबडी, ही तर इतक्या प्रकारचे आवाज काढते, रात्रीपण ओरड्ते बरेचदा

एकदा ही उंच सरळ झाडाच्या खोडावर खालुन वर पळत जाताना पाहिली. असे क्षण कॅमेरात पकडता येत नाहीत.

कोकीळेच्या पिल्लाला कावळा भरवताना पाहीला तेही राहीलच कॅप्चरायच.

wh1.jpgwh2.jpg

परवा बराच पाऊस पडून थांबल्यावर पंख वाळवत होती

शब्दखुणा: 

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन

Submitted by दिनेश. on 31 July, 2014 - 06:13

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मी मॉरिशियसला पोहोचलो तो दिवस शनिवार होता. दुपार होऊन गेली होती. एमिरेट्सच्या फ्लाईटमधे भरपूर
खाणे झाल्याने भूक नव्हती. इमिग्रेशन वगैरे लगेचच पार पडले. माझ्याकडे फारसे सामानही नव्हते.
ड्रायव्हर माझी वाट बघतच होता.

हा विमानतळ आहे या बेटाच्या दक्षिण पूर्व टोकाला आणि माझे हॉटेल, ल मेरिडीयन उत्तर पश्चिम टोकाला.
हा १०० किमीचा टप्पा त्या देशाच्या एकमेव हायवेवरून तासाभरातच पार पडला. ड्रायव्हर बोलका होता. हिंदीतून
गप्पा चालल्या होत्या. वाटेतला एक अपघात ( दोन दिवसांपुर्वी झालेला ) त्याने मला कौतूकाने दाखवला. मनात

अप्रतिम निसर्गाचा थाट... भुईबावडा घाट

Submitted by गिरिश सावंत on 31 July, 2014 - 01:29

अप्रतिम निसर्गाचा थाट... भुईबावडा घाट
खडकांच्या कपारीतून खळखळणारे धबधबे, हिरव्यागार वनराईतून फेसाळणारे शुभ्र पाणी, दाट धुक्याची चादर, मनाला आनंद देणारा गार वारा आणि सोबत पावसाच्या सरी... वर्षा पर्यटनासाठी असे वातावरण म्हणजे स्वर्गीय सुखच. सध्या भुईबावडा घाटात असे वातावरण अनुभवायला मिळते आहे. अप्रतिम निसर्गाचा थाट घेवून भुईबावडा घाट वर्षा पर्यटनासाठी निसर्गाला साद घालतो आहे.
प्रचि १

शब्दखुणा: 

रॉकी माऊंटन नॅशनल पार्क - कॉलोरॅडो

Submitted by कंसराज on 30 July, 2014 - 17:17

समर सुरु झाल्या झाल्या मूलाने, आता ट्रीपला कूठे जायचे अशी भूण भूण करायला सूरुवात केली. शेवटी ४ जुलैच्या सूमारास रॉकी माऊंटन नॅशनल पार्क - कॉलोरॅडो ला जायचे ठरले. तेथील काही फोटो येथे देत आहे.

आमची ही रोड ट्रिप होती. ह्यूस्टन पासून एस्टेस पार्क (Estes Park, Colorado) ठिकाण साधारण ११०० मैल आहे. जाताना व येताना मधे एक रात्र अमेरीलो येथे थांबावयाचे ठरवून, ४ जूलैला आम्ही निघालो.

मॉरिशियस - ओळख

Submitted by दिनेश. on 30 July, 2014 - 07:42

मॉरिशियस ला जायचा तसा प्लान नव्हता. बाकीचे काही देश माझ्या मनात होते. पण माझा नेहमीचा प्रश्न असतो
तो व्हीसासाठी लागणार्‍या वेळाचा. मोजक्या दिवसांच्या सुट्टीतले दिवस व्हीसा मिळवण्याच्या खटपटीत घालवणे
मला रुचत नाही. अंगोलातून व्हीसा अप्लाय करायचा तर अनेक देशांच्या एम्बसीज इथे नाहीत. त्यासाठी
पासपोर्ट साऊथ आफ्रिकेत पाठवावा लागतो ( तेही केलेय मी. ) त्यामूळे सर्व भारतींयाना ऑन अरायव्हल व्हीसा
देणार्‍या या सुंदर देशाची ट्रिप नक्की झाली.

शब्दखुणा: 

Tour de Himachal (देवभुमी)

Submitted by इंद्रधनुष्य on 30 July, 2014 - 07:06

गत सालातील 'Mysterious Ladakh'ची याद धुसर होते न होते... तोच आम्हाला वेध लागले ते लाहुल स्पितीचे... खर तर स्पिती मोहिमेची पाळमुळे रोवली गेली तीच मुळी लेह-लडाखच्या परतीच्या प्रवासात... सार्चु, केलाँग, ग्राम्फू करत आम्ही जेव्हा रोहतांगचा चढ चढू लागलो, तेव्हा गिरीने ड्रायव्हरकडे लाहुल-स्पितीच्या रस्त्याची चौकशी केली... त्यावेळी ड्रायव्हरने ग्राम्फू वरुन स्पितीला जाणारा रस्ता दाखवला होता. तो पांढराफटक रस्ता मनात कुठेतरी घर करुन बसला होता. एके दिवशी फेसबुकवर मुंबई ट्रॅव्हलसची स्पितीची जाहिरात निदर्शनास आली...

श्री क्षेत्र नारायणपूर

Submitted by ferfatka on 26 July, 2014 - 08:15

नेहमीच्याच ठिकाणी जाऊन कंटाळा आला होता. घरापासून अंदाजे ६५ किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरला जायचे ठरले. राशीचा स्वामी गुरु म्हणून दहावीत असल्यापासून श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यास जायचा उपक्रम सुरू झाला. त्या नादाने मंदिरामागील पुरंदर किल्यावरही ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकवेळा वारी झाली होती. जमेल तेव्हा गुरुवारी जातच होतो. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. पंढरपूरला पालखी पोहचून सुद्धा पाऊस आलेला नव्हता. पावसाची सर्वच लोक चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण