या शनिवारी माझगाव विभागातील सार्वजनिक गणपती बघणे झाले. मुलगी लहान असल्याने जास्त फिरता आले नाही, मात्र तिच्यासाठीच म्हणून जाणे झाले असल्याने नेटाने जवळच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले.
आमच्या माझगाव विभागाला सार्वजनिक गणपतींची परंपरा दक्षिण मुंबईतील ईतर गणेशोत्सवांप्रमाणेच जुनी आहे. सध्या नवसाच्या आणि मानांच्या गणपतींशी स्पर्धा करण्यात कुठेतरी कमी पडल्याने पहिल्यासारखा रांगा लागत नाहीत, पण मंडळांचा उत्साह मात्र आजही आटला नाही, ना भक्तांचा भक्तीभाव ओसरलाय. बस्स तोच या चित्रांमधून शेअर करतो आहे.
बा गणराया, या आंतरजाल विश्वात "मायबोली" नावाचं एक कुटुंब नांदत आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांवर तुझ्या कृपेचा आशिर्वाद कायम राहु दे, त्यांना/त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना उत्तम आरोग्य संपदा लाभु दे. सुखी आनंदी जीवन जगण्याची संधी मिळवून दे. भांडणाने फक्त भांडण वाढते आणि एकत्र राहिल्याने एकी/प्रेम वाढते हे सगळ्यांना समजण्याची बुद्धी दे. मायबोलीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहु दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना. इथल्या सर्व सदस्यांवर व त्यांच्या कुटुंबियांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहु दे.
प्रचि ०१
मुंबईतील लालबाग, परळ, दादर, माटुंगा विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची हि प्रचि. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रतिकृती, नेत्रदिपक रोषनाई, भव्य गणेशमूर्तीने मुंबईचा गणेशोत्सव रंगला आहे. गणेशगल्लीत यंदा जेजुरीची भव्य प्रतिकृती बनवली आहे, तर रंगारी बदक चाळ यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. तेजुकायाचा गणेश शेषनागावर विराजला आहे तर नरे पार्कातला बाप्पा श्री विष्णु अवतारात आहे. लाल मैदानात अजिंठाची प्रतिकृती केली आहे तर जी.एस.बी.एस मंडळाचा मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा हिरक महोत्सव साजरा करत आहे.
ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार बोळींजकर बंधू यांच्या कार्यशाळेतील गणपती बाप्पांची हि प्रचि. मायबोलीकर घारूआण्णा यांच्यामुळे या कार्यशाळेस भेट देता आली. घारूआण्णा मनापासुन धन्यवाद.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३