या शनिवारी माझगाव विभागातील सार्वजनिक गणपती बघणे झाले. मुलगी लहान असल्याने जास्त फिरता आले नाही, मात्र तिच्यासाठीच म्हणून जाणे झाले असल्याने नेटाने जवळच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले.
आमच्या माझगाव विभागाला सार्वजनिक गणपतींची परंपरा दक्षिण मुंबईतील ईतर गणेशोत्सवांप्रमाणेच जुनी आहे. सध्या नवसाच्या आणि मानांच्या गणपतींशी स्पर्धा करण्यात कुठेतरी कमी पडल्याने पहिल्यासारखा रांगा लागत नाहीत, पण मंडळांचा उत्साह मात्र आजही आटला नाही, ना भक्तांचा भक्तीभाव ओसरलाय. बस्स तोच या चित्रांमधून शेअर करतो आहे.
मी काही फोटोग्राफर नाही, हौसेने म्हणूनच काढलेले फोटो आहेत. पण बाप्पांचे लोभसवाणे रूप, सुबक मुर्त्या, आणि आकर्षक सजावट माझ्या चित्रणातील साधेपणा सांभाळून घेतील.
गणपती बाप्पा मोरया !
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
प्रचि १
प्रचि २ - देव आणि दैवत !
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
__/\__
खूप छान फोटो आहेत. इथे
खूप छान फोटो आहेत. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे लाईनीत उभे रहाण्याचे कष्ट वाचवलेत. :स्मितः
गणपती बाप्पा मोरया !
छानच फोटो.
छानच फोटो.
मस्त आहेत फोटो. धन्यवाद.
मस्त आहेत फोटो. धन्यवाद.
मस्त फोटो गणपती बाप्पा मोरया
मस्त फोटो
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
अरे, आमच्या माझगांवच्या
अरे, आमच्या माझगांवच्या गणपतीचे फोटो बघून बरं वाटलं.
माझगाव डॉकच्या गणपतीला आम्ही दरवर्षी जायचो. अंजीर वाडी आणि (बहुतछि) चिकूवाडीच्या गणपतीलासुद्धा.
नंदिनी, माझगावच्या घरगुती
नंदिनी, माझगावच्या घरगुती गौरीगणपतींचे विसर्जन भाऊच्या धक्क्यालाच होते. रात्री कधीतरी उशीरा घरी परतताना तिथले बघत यायचो.
मस्त आहेत फोटोज. अभिजीत तुला
मस्त आहेत फोटोज. अभिजीत तुला इतक्या निवांतपणे कसे फोटो काढता आलेत?
अदिती, ... अभिजीत नाही अभिषेक
अदिती, ... अभिजीत नाही अभिषेक


आणि हो कसे म्हणजे काय, माझगाव हा आपलाच एरीया आहे
अॅक्चुअली माझगावच्या गणपतींना बाहेरची गर्दी कमी असते हल्ली, त्यामुळे निवांतपणे काढता आले फोटो. आणि मुलीला घेऊन गेलेलो तर शक्य होते तिथे गणपतीच्या पायावर तिचे डोके ठेवायची परवानगी मागितली
मनापासुन धन्यवाद, अभिषेक!!!
मनापासुन धन्यवाद, अभिषेक!!!

प्रचि ७ मधला बाप्पा खुपच आवडला.
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर हे
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर हे आवडले. छोटीला पावसाचा त्रास झाला नाही ना? फोटो छानच आहेत.
अमा, पाऊसाला टांग देऊनच
अमा, पाऊसाला टांग देऊनच घराबाहेर पडलेलो, आणि वरीलपैकी आमच्या घरापासून सर्वात लांबचा गणपती निव्वळ ५-६ मिनिट वॉकेबल अंतरावर आहे. येऊन जाऊन एकूण चालणे २० मिनिटांपेक्षा जास्त झाले नाही.
जिप्सी, सेम टू यू रे, तुलाही धन्यवाद, कारण इथे प्रचि शेअर करायची प्रेरणा तूच !
आणि प्रचि ७ बाप्पासाठी पुन्हा सेम टू यू.. कारण आमच्या घरच्या बाप्पाची आठवण करून देणारी मुर्ती आहे ती.. पर्रफेक्ट मोजमापात..
मस्त रे भाऊ!
मस्त रे भाऊ!
खुप छान अभिषेक...
खुप छान अभिषेक...
मस्त फोटो..
मस्त फोटो..
सुंदर! अंजिर वाडीचा देखावा
सुंदर!
अंजिर वाडीचा देखावा या पुर्वीही झाला होता.
मस्त आहेत सगळे गणपती. छान
मस्त आहेत सगळे गणपती. छान वाटलं पाहताना.