एअर शो
मागच्या महिन्यात केटी मधे एअर शो साठी गेलो होतो तेथे काढलेली चित्र देतोय. आशा करतो की तूम्हाला आवडतील.
मागच्या महिन्यात केटी मधे एअर शो साठी गेलो होतो तेथे काढलेली चित्र देतोय. आशा करतो की तूम्हाला आवडतील.
वैशाख वणवा संपत आला, आता पावसाच्या धारा लवकरच बरसतील. वैशाखात जिवाची काहिली होत असतानाच निसर्गात मात्र विविध रंगाची उधळण होत असते. विविध फुलांचा "बहार" येत असतो. यावर्षीच्या वैशाख वणव्यात (आणि इतरत्र) टिपलेला हा बहर.
नही देखा कभी पहले, कभी पहले नही देखा
ये फूल है किन गुलजारोंका, मै आशिक हुँ बहारोंका...
प्रचि ०१
पळस
प्रचि ०२
विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात भटकंतीच्या दृष्टीने जे पाहिजे आहे ते सर्वच आहे. एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मन मोहविणारे समुद्रकिनारे, निसर्गनिर्मित चमत्कार तसेच मानवनिर्मित चमत्कारही. इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. महाराष्ट्रातील काही भागात तर निसर्गाने नाजुक आणि रौद्र सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे भंडारदरा आणि परीसर. येथे दुर्गमतेचे बिरूद मिरवणारे अलंग, मलंग आणि कुलंग हे दुर्ग त्रिकुट आहे, एकीकडे आकाशला गवसणी घालणारे कळसुबाई शिखर तर दुसरीकडे थेट पाताळाचा वेध घेणारी सांदण दरी.
भाग पहिला - http://www.maayboli.com/node/48703
भाग दुसरा - http://www.maayboli.com/node/48718
भाग तिसरा - http://www.maayboli.com/node/48810
हेल्लो मायबोलीकर,
मला माझा Nikon D ३२०० विकायचाय. सर्व माहिती खालील प्रमाणे:
माझा Nikon D ३२०० एकदम चांगल्या condition मध्ये आहे. १ वर्ष वापरलेला आहे.
किंमत: २५०००/-
सर्व accessories आहेत. मी माझी advertise Quickr website वरती पोस्ट केली आहे
http://kalyan.quikr.com/Mumbai-Nikon-D3200-for-Sale-W0QQAdIdZ168429874
जर कोणीही intreasted असाल तर मला कॉल करू शकता : ९५९४९६५७५२
It’s spring fever.
ईकडे म्हणजे अमेरीकेत असचं काहिसं म्हणतात, पण ते जे काही असतं ते वेड लावणार असतं. चार-पाच महिन्याची गोठवणारी थंडी, पांढरा लॅडस्केप, जड जॅकीट्स.... आणि अचानक सगळं रंगीत आणि उत्साही होउन जातं...रंगाचा उत्सव साजरा होतो... निसर्ग हिरवा सिग्नल देतो आणि सगळे सूटतात.
हे ही तीतकंच खर की जो पर्यन्त विंटर आहे तो पर्यत्नच स्प्रिंगची मजा देखिल आहे.या २०१४ च्या वसंतोत्सवाच्या काही प्रचि.
प्रचि १:
प्रचि २: स्प्रिंग फॉल
गूलाबी चेरीच्या फूलांचा सडा...
दुपारची वेळ. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता...
… अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी…
लाजरा-बुजरा असा हा चक्क होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानलेला 'शेकरू' (Indian giant squirrel).
मैत्रेय बुद्धा
साधारण २-३ महिन्यापूर्वी माझ्या "फिरूनी नवी जन्मेन मी" या धाग्यावर आणि नंतर "मायबोली प्रकाशचित्र धोरण" या धाग्यावर झालेल्या वादविवादानंतर मी या पुढे मायबोलीवर प्रचि प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बर्याच मायबोलीकरांनी ईमेल/SMS आणि प्रत्यक्ष फोन करून या निर्णयावर फेरविचार करण्याचा आग्रह केला होता. त्यांच्या सर्वांच्या आग्रहाचा मान राखत मी यापुढेही पूर्वीसारखे माझे प्रचि/थीम फोटोग्राफी मायबोलीवर प्रदर्शित करण्याचे ठरविले आहेत. ज्याची सुरूवात "आजोबा - फोटो वृतांत" यापासुन केली आहे.