चेरी ब्लॉसम
गेले काही दिवस इथे डीसीत वसंत ऋतूच्या आगमनाची दवंडी पिटणारा चेरी ब्लॉसम महोत्सव चालू आहे. चेरी ब्लॉसमचा हा बहर पोटोमॅक नदीच्या टायडल बेसिन च्या भोवताली फुललेला आहे.
आम्ही काल बहर बघायला गेलो होतो. खरं म्हणजे आम्ही बरेच उशिरा गेलो. तोपर्यंत बराचसा मोहोर गळून गेला होता.
पण काल आठवड्याचा पहिला दिवस …सोमवार…. असूनही या उत्सवाला जगभरातल्या कानाकोपृयातून लोक आलेले दिसत होते.
वेगवेगळ्या देशातल्या लोकांच्या नुसत्या झुंडी इकडून तिकडे फिरताना दिसत होत्या.