सालाबाद प्रमाणे रानडे परिवार कोकणातील दापोलीजवळील आसुद गावी असलेल्या श्री व्याघ्रेश्वराच्या दर्शन आणि अभिषेकानिमित्त जात असतो.
यंदा दि. २२ मार्च २०१४ रोजी सकाळी ४.३०वा तवेरा मधुन रानड्यांच्या दोन पिढ्या आसुद गावी निघाल्या. दर्शन, महादेवाचा अभिषेक झाल्यावर मंदिरापासुन हॉटेलवर जाईपर्यंत आपल्यात एक फोटोग्राफर दडला असल्याची जाणीव अस्मादिकांना या काजुच्या झाडावरील काजुच्या गराने आणि फळाने करुन दिली.
या दोघांना कॅमेर्यात बंदिस्त करुन हॉटेलवर पोचले, जेवण-आराम करुन संध्याकाळी समुद्राला भेट द्यायला सहकुटुंब गेलो. पाण्यात यथेच्छ डुंबुन, भाच्याला किल्ला बनवायला मदत करुन झाल्यावर साबांनी आणलेल्या भेळेचा आस्वाद घेताना भास्करपंतांनी त्यांच दुकान बंद करत असल्याची जाणिव करुन दिली, मग त्यांनाही बंदिस्त केल कॅमेर्यात..
अंधार पडल्यावर हॉटेलवर येउन फ्रेश होउन जेवलो आणि परत बीचवर गेलो चांदण्या बघायला. सुदैवाने आकाश निरभ्र असल्याने आकाशात पडलेला चांदण्यांचा खच बघता आला.. अस आकाश फक्त आणि फक्त समुद्रकिनारीच बघता येत...
दि. २३ मार्चः
सकाळी उठुन चहा पिउन ताजतवान होउन गेलो परत समुद्राला भेटायला आणि उगवत्या सुर्याला आणि त्याच्या प्रतिबिंबाला कॅमेर्यात बंद करुन टाकल.
फोटो काढुन परतीच्या वाटेवर असताना यांनी दर्शन दिल.
स्टार फिश
तिथुन निघालो आणि दापोलीजवळ माझ्या माहेरी आलो. कथा कादंबर्यांमधुन असत की नाही स्त्री पात्राच कोकणातल माहेर अगदी तस्सच हे माझ कोकणातल माहेर. गो. नि दांडेकरांच्या पडघवलीमध्ये असलेल पडघवली गाव ज्याच खर नाव आहे "गुडघे" कोकणातल माझ माहेर.
आणि आता अन्जुडे दिल थाम के बैठो क्योंकी आ रहा है तुम्हारा प्रॉमिस:
गो. नि दांडेकर उर्फ आप्पांच घर
तिथुन निघाल्यावर वाटेत भोर घाटात विश्रांतीसाठी थांबलेलो असताना दिनकररावांचे लोभसवाणे दर्शन झाले आणि त्यांना कॅमेर्यात टिपण्याचा मोह अज्जिबात टाळु शकले नाही...
हे दिवसभराच काम संपवुन घरी निघालेले दिनकरराव
आलो कोकणातलं दिनकरराव
आलो
कोकणातलं दिनकरराव ,भास्करपंत आणि गोनिदांचं घर पाहून .इकडे तिकडे कोणी
नाही पाहून दोन केशरी पिवळे काजूगरही ओढले .थोडे उंचावर होते .उड्या
माराव्या लागल्या .किनाऱ्या वरच्या ताऱ्याला हात लावला पण थोडं खाजतंय
.किल्याचं काही नीट जमलं नाही .सिंहगड राजगड दगडांचे हे वाळूचे .पुढच्या
खेपेस बघू .तारे ओळखायला टिळक स्मारकातल्या ज्योतिर्विद्या मंडळात राजेंना
भेटायला हवे .
आसूद गारंबिच्या बापुंचं ना ?
माधवराव आणि गुरुदेवांचे वंशज कुठे राहातात कोण जाणे ?पडघवली खरं गुडघे
म्हणजे मालगुडीसारखं काल्पनिक की काय ?
असुदे .
आपल्याला काय गरम भाकरी नी सार ओरपायला मिळालं तरी काम झालं .
आता सणासुदीला समारंभाची फोटोग्राफीची कामं वाट पाहात असतील हौशी
कलावंतांची .वेळ दवडून उपयोग नाही .
Srd, किल्याचं काही नीट जमलं
Srd,
किल्याचं काही नीट जमलं नाही .सिंहगड राजगड दगडांचे हे वाळूचे .पुढच्या
खेपेस बघू .तारे ओळखायला टिळक स्मारकातल्या ज्योतिर्विद्या मंडळात राजेंना
भेटायला हवे >>>> नसलेले फोटो बघायला तुमच्याकडे दिव्यदृष्टी आहे काय??? काय बाई एकेक कलाकार आहेत माबोवर?
पडघवली खरं गुडघे
म्हणजे मालगुडीसारखं काल्पनिक की काय ?>>>> याच उत्तर मी तुम्हाला नक्की देईन
छान फोटोज आणि वर्णन
छान फोटोज आणि वर्णन
धन्स जाई..
धन्स जाई..
.
.
मुग्धा प्रवासवर्णन अजून
मुग्धा प्रवासवर्णन अजून डिटेलमध्ये जमलं तर लिही.
नको करु एडीट, सोडुन दे
नको करु एडीट, सोडुन दे विषय... एन्जॉय युअर सरप्राईज...
मुग्धा प्रवासवर्णन अजून
मुग्धा प्रवासवर्णन अजून डिटेलमध्ये जमलं तर लिही.>>>> नाही सुचत अग आणि डिटेलमधे लिहायच तर तेवढे फोटो यायला हवेत अस माझ मत... ऑफिसमध्ये हे सगळ करण नाही जमत, घरी तेवढा वेळ नाही मिळत, त्यामुळे ही शॉर्ट अॅण्ड स्वीट कोकणवारी
मस्त मजा केलीये
मस्त मजा केलीये
ज्यांच गाव कोकण आहे त्यांचा
ज्यांच गाव कोकण आहे त्यांचा मला किंचीत हेवा वाटतो.
सुंदर गाव दिसतय.
येस्स झकासराव.. गाव खरच सुंदर
येस्स झकासराव.. गाव खरच सुंदर आहे कारण अजुनही या गावाला शहरीकरणाच वार लागल नाहीये.. गावात एस.टी आणि वीजे आणि त्यामुळे घरोघरी टीव्ही हेच काय ते आधुनिकतेची चिन्ह, पण मुळ गावाच्या ढाच्यात काडीमात्र फरक नाही झालेला.
मुग्धा.... सुरेख शब्दचित्र
मुग्धा....
सुरेख शब्दचित्र आणि तितकीच लेखातील वर्णनाला शोभतील अशी जोडीची प्रकाशचित्रे....सार्यांनीच असे सांगितले की रानडे परिवाराने दांडेकर झोनमध्ये अगदी मजा केली आहे. गो.नि.दांडेकर मुक्कामाचे गुडघे (किंवा पडघवली) गावातील घर....घराची रचना इतकी मोहमयी आहे....म्हणजे अगदी त्या मातीतीलच, कुठेही टीचभरसुद्धा आधुनिकतेचा स्पर्श नसलेली....आधुनिकतेला अजिबात स्थान न दिलेली....त्यामुळे त्या घरासमोर उभा राहिलो तर अचानकच समोरील दार कर्रकर्र वाजवत अप्पाच जणू आता बाहेर येतील अशी आपली भावना मनी निर्माण झाली.
"...तिथल्या लोकांना आप्पांविषयी काहीही वाटत नाही..." असे वर एका प्रतिसादात तू लिहिले आहेस. पण मला त्या मानसिकतेत काही विशेष नाविन्य नाही वाटले, मुग्धा....टाईम्स हॅव चेन्ज्ड. आजच्या पिढीची भूमिती जुन्या चित्रांच्या मोजमापाच्या कक्षेत न येणारी असल्याने त्या विषयी आपण वैषम्य वाटून घेऊन चालत नाही. कोल्हापूरातील वि.स.खांडेकर, माधव ज्युलिअन, ना.सी.फडके आदी दिग्गजांची घरे कुठे होती हे तेथील शेजार्यालाही आज दाखविता येत नाही. सीमेन्टच्या जंगलांनी जुनी संस्कृती पूर्णपणे धुळीला मिळविली आहे. ही मोठी नावे आता समोर येतात म्हणजे तुझ्यासारखी एखादी मुलगी त्या भागात कुठल्यातरी निमित्ताने गेली आहे आणि तिने त्यावेळी गोळा केलेल्या आठवणींच्या शिंपल्यात जमा झालेल्या शुभ्र क्षणांमुळेच.
हे काम मात्र तू छान केले आहेस.
मुग्धटले कोकणवारी मस्तच
मुग्धटले कोकणवारी मस्तच झालेली दिसतेय. अजून का लिहिले नाहिस?
आणि सगळे फोटो सुरव्याचेच होय?
तस नाही मामा. मुळात त्या
तस नाही मामा. मुळात त्या लोकांना गो.नी विषयी कळकळ नसण्याच कारण अस की त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांचे वडील गाव सोडुन गेले होते घरातील भांडणामुळे. त्यामुळे मुळात आप्पा जन्मापासुन कधीच गावात नव्हते. आप्पा मोठे झाल्यावर आपल्या पूर्वजांचा शोध घेत ते गुडघे गावी आले. काल परवापर्यंत ज्या माणसाबद्दल आपण ऐकलही नव्हत त्या माणसाला आपल्यात सामावुन घेण जरा जडच जात.. त्यामुळे मला या गोष्टीच वैषम्य वगैरे काहीच वाटत नाही. नारबांच्या प्रतिसादात उल्लेख होता की ज्या रस्त्यावर गो.निं च घर आहे तिथे तशी पाटी लावण्याची विनंती आम्ही ग्रामपंचायतीला करावी, म्हणुन मी तस म्हणाले.
गोनिदा आवडतात त्यामुळे
गोनिदा आवडतात त्यामुळे त्यांच्याविषयी अगदी तसुभर असलं तरी प्रेमातच पाडत. तू त्यांची नातेवाईक आहेस किंबहुना त्यांना जवळुन पाहिल आहेस म्हणुन तुझ्याबद्दलचा आदर वाढला.
फोटो छानच. हो आणि सगळे म्हणताहेत तस थोडं लेखणी थोडी जास्त चालवली असतीस तरी चालल असत ग बायो
पण गोनिदांच्या घराच्या फोटोमुळे सगळ माफ तुला.
छान आलेत फोटो
छान आलेत फोटो
हो ज्यांच गाव, घर कोकणात आहे,
हो ज्यांच गाव, घर कोकणात आहे, जे कोकणात वाढले त्यांच्याबद्दल मलासुद्धा खूपच हेवा वाटतो. पडघवली, श्यामची आई, गारंबीचा बापू ज्यांनी वाचलय त्यांनी कोकणाच्या प्रेमात न पडाव तर नवलच.
गुब्बे आदर वगैरे नको बाई. मी
गुब्बे आदर वगैरे नको बाई. मी त्यांची नातेवाईक असण्यात माझ कर्तुत्व काहीच नाही उलट हे माझ नशीबच म्हणायच की त्यांच्या घरात मी जन्माला आले.
गोनिदांच्या घराच्या फोटोमुळे सगळ माफ तुला.>>> हे माहित होत म्हणुनच लेखणी कमी चालवली मी.
अगं माझा प्रतिसाद कुठं गेला??
अगं माझा प्रतिसाद कुठं गेला??
धागा वाहता आहे ग ताई.. काय
धागा वाहता आहे ग ताई.. काय करु?
गोनिदा आवडतात त्यामुळे
गोनिदा आवडतात त्यामुळे त्यांच्याविषयी अगदी तसुभर असलं तरी प्रेमातच पाडत. तू त्यांची नातेवाईक आहेस किंबहुना त्यांना जवळुन पाहिल आहेस म्हणुन तुझ्याबद्दलचा आदर वाढला. >>>> +१०० .....
गोनिदांच्या घराचा - या धाग्याच्या शीर्षकात उल्लेख केलात तर बरं होईल .....
मुग्धटले.....अगं धागा "वाहता"
मुग्धटले.....अगं धागा "वाहता" का झाला आहे ? गोनिदांच्या उल्लेखामुळे धागा वारंवार वाचला जाणार....त्यामुळे यातील प्रतिसादांचे कायमपणे राहणे गरजेचे आहे.
हो मामा. अॅडमिनला विपु केली
हो मामा. अॅडमिनला विपु केली आहे. अजुन त्यांचा रिप्लाय नाही आला.
"लेखकाचं घर "हे जयवंत दळवी
"लेखकाचं
घर "हे जयवंत दळवी यांचं पुस्तक वाचल्यास नावाजलेल्या लेखकांच्या घराबद्दल
(=ते राहात होते त्या जागेबद्दल म्हणा ,इति आताचे तिथले राहाणारे) कळते ,
(माझा अगोदरचा प्रतिसाद थोडा गंमतीने लिहिला होता .थोडे अंदाजाने चार ओळी
घुसडल्या होत्या .नको वाटल्यास आजच काढतो .)
खरं म्हणजे लिखाण तुमच्या झटपट कोकणवारी इतकेच छान आणि रेंगाळणारे नाही
.फोटोपण छान आहेत .
पडघवली ,मालगुडी ,गारंबी अथवा माची (राजमाची)यामध्ये लेखक एक गाव निवडतो
त्यात स्थानिक वर्णन ,घटना रेखाटतो पण मुद्दामहून काल्पनिक नाव ठेवतो .उगाच
गाववाल्यांचा रोष पत्करून पुस्तक बाद व्हायला नको .
Srd, नका काढु तुमचा
Srd, नका काढु तुमचा प्रतिसाद.. पडघवली बद्दल मी जे लिहिल आहे ते यासाठी की त्यामागची गोष्ट मी लहानपणी ऐकली होती म्हणुन आता खास तुमच्यासाठी मी योग्य त्या सुत्रांकडुन (माझे वडील) ती माहिती परत मिळवेन आणि इथे प्रदर्शित करेन...
गोनिदांच्या घराचा - या धाग्याच्या शीर्षकात उल्लेख केलात तर बरं होईल>>>> शशांक तशी कोकणवारी हा माझ्या आयुष्यातला नेमेची येतो पावसाळा या उक्तीनुसार येणारा प्रसंग आहे. मायबोलीबरील कोल्हापुरी धाग्यावर बोलताना कोकणवारीचा उल्लेख आला तसेच गो. निं च्या चाहत्यांबद्दल पण समजल. म्हणुन खर तर त्यांच्यासाठी गो. निं च्या घराचा फोटो काढला होता. परंतु त्यांच्या आग्रहाखातर हा वेगळा धागा तयार झाला सर्व मायबोलिकरांसाठी. त्यामुळे ते सरप्राईजच राहु दे अस मला वाटत.. आणि शुभांगीच्या पोस्टला उत्तर देताना म्हणाले आहेच आदर वगैरे नको. मी त्यांची नातेवाईक असण्यात माझ कर्तुत्व काहीच नाही उलट हे माझ नशीबच म्हणायच की त्यांच्या घरात मी जन्माला आले.
मुग्धा वाहायचा थांबला की
मुग्धा वाहायचा थांबला की सांग. मग प्रतिसाद लिहीन.
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो. व्याघ्रेश्वराचे, मंदिराचे फोटो पण आवडतील पहायला.असतील तर टाकाना.
मुग्धा, अप्रतिम फोटो. वर्णनही
मुग्धा, अप्रतिम फोटो. वर्णनही छान पण अजून हवं होतं. एकंदरीत कोकणात मजा केलीस.
गोनीदांच्या घराचे फोटो, धन्यवाद ग. तू त्यांची जवळची नातेवाईक आहेस ऐकून खूप बरं वाटलं.
छानच फोटो.. कुठे मिळाले तर
छानच फोटो..
कुठे मिळाले तर आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेले.
बेतात राहू दे नावंचा वेग, नावंचा वेग
रातीच्या गर्भात चांदाची रेघ, चांदाची रेघ
हे गाणे अवश्य पहा. त्यात वर्णन केलेल गाव पाहतोय असे वाटले.
मस्स्त फोटो आहेत.....सी स्टार
मस्स्त फोटो आहेत.....सी स्टार तर अगदिच छान.....
Pages