आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शॉर्ट फिल्मची स्पर्धा असायची. त्यात भाग घेतला होता. तेव्हा स्पर्धेचे परीक्षक म्हणून रानवाटाचे स्वप्निल पवार आले होते. त्यांनी हरिश्चंद्र गडावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दलची शॉर्ट फिल्म दाखवली आणि तेव्हा पहिल्यांदा इंद्रवज्राबद्दल कळलं. त्याआधी मी हरिश्चंद्रगडावर जाऊन आलेलो असल्याने आपण तेव्हा इंद्रवज्र बघितलं नाही याचं वाईट वाटलं होतं. पण नंतर कळलं की त्याला काही काळ वेळ असते. पावसाळ्याआधी येणारे ढग कोकणकड्यावर अडकतात आणि आपल्याला हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं.
बर्याच कालावधी नंतर मायबोलीकर भटक्यांचे पाय पुन्हा एकदा ट्रेकर्सच्या पंढरी कडे निघाले. यंदाची पाणी टंचाई आणि हवेतील उष्मा यामुळे ट्रेकला जाणे टाळले होते... परंतू मान्सुन पुर्व ट्रेकची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देईना... मग एक से भले दो करत तब्बल १७ भटके एकत्र जमले ते हरिश्चंद्रगडाच्या मोहिमेला.. या मोहिमेने काय नाही दिले...
९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....
सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर. एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले महादेवाचे एक अतिशय सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो.