बंगळूर महाराष्ट्र मंडळ हे नवीन नवीन कार्यक्रम आखून पार पाडण्याच्या बाबतीत अत्यंत उत्साही आहे. त्यांचा शिवगंगे ट्रेकबद्दल मेसेज आला तेव्हा लगेचच जाण्याचं पक्कं केलं. याआधी हुळुकुडी बेट्टा नावाच्या ट्रेकला मंडळाच्या सदस्यांबरोबर जाऊन आलो होतो. तेव्हा खूपच मजा आली होती. तो ट्रेक तसा सोपा होता. शिवगंगे त्यापेक्षा थोडासा अवघड असल्याचं गूगल केल्यावर लक्षात आलं. उंचीला सिंहगडाच्या निम्मा आहे. बंगळूर हे पश्चिम आणि पूर्व घाटापासून लांब असल्यामुळे इथे आजूबाजूला आपल्या सह्याद्रीसारखे उंच उंच डोंगर नाहीत. पण अशा टेकड्या मात्र अनेक आहेत.
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शॉर्ट फिल्मची स्पर्धा असायची. त्यात भाग घेतला होता. तेव्हा स्पर्धेचे परीक्षक म्हणून रानवाटाचे स्वप्निल पवार आले होते. त्यांनी हरिश्चंद्र गडावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दलची शॉर्ट फिल्म दाखवली आणि तेव्हा पहिल्यांदा इंद्रवज्राबद्दल कळलं. त्याआधी मी हरिश्चंद्रगडावर जाऊन आलेलो असल्याने आपण तेव्हा इंद्रवज्र बघितलं नाही याचं वाईट वाटलं होतं. पण नंतर कळलं की त्याला काही काळ वेळ असते. पावसाळ्याआधी येणारे ढग कोकणकड्यावर अडकतात आणि आपल्याला हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं.
दोनेक वर्षांपूर्वी आम्ही ज्या कोणत्या वेळेला तोरण्याला जायचे नक्की केले जायला निघालो होतो ती वेळ म्हणजे खरोखरच एक उत्तम मुहुर्त असावा. त्या मुहुर्तावर ठरवलेले कुठलेही कार्य निर्विघ्नपणे, विनाविलंब, विनासायास, सफल संपूर्ण झालेच असते.....
सगळे कसे जुळून आले होते.
सकाळी ५ ला निघायला ठरवून आणि एकूण १०-१२ जणं वेगवेगळीकडून येणार असतानासुध्दा निघायला अजिबात न झालेला उशीर...
पावसाळा असताना देखिल पावसाने न दिलेला त्रास.....
खूप म्हणजे खूप प्रमाणावर फुललेली रानफुलं....
आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत अनपेक्षितरित्या दिसलेले इन्द्रवज्र....
बघा ही प्रकाशचित्रे आवडताहेत का ते!
इंद्रवज्र !
होय, आम्ही इंद्रवज्र पाहिले.... आणि तेही तोरण्यावरून...