वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणार्या प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळू हळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करत जातात. जून जुलै मध्ये रानावनातील कोवळी हिरवळ बाळसं घेत असते. साधारण ऑगस्ट पासून ह्या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलांच्या बहराचे.
महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले कासचे पठारही आता फुलू लागेल. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुले ह्या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात.
दोनेक वर्षांपूर्वी आम्ही ज्या कोणत्या वेळेला तोरण्याला जायचे नक्की केले जायला निघालो होतो ती वेळ म्हणजे खरोखरच एक उत्तम मुहुर्त असावा. त्या मुहुर्तावर ठरवलेले कुठलेही कार्य निर्विघ्नपणे, विनाविलंब, विनासायास, सफल संपूर्ण झालेच असते.....
सगळे कसे जुळून आले होते.
सकाळी ५ ला निघायला ठरवून आणि एकूण १०-१२ जणं वेगवेगळीकडून येणार असतानासुध्दा निघायला अजिबात न झालेला उशीर...
पावसाळा असताना देखिल पावसाने न दिलेला त्रास.....
खूप म्हणजे खूप प्रमाणावर फुललेली रानफुलं....
आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत अनपेक्षितरित्या दिसलेले इन्द्रवज्र....
बघा ही प्रकाशचित्रे आवडताहेत का ते!
माफ करा हा धागा चुकुन पुन्हा सेव्ह झाला.
हा रविवार रानफुलांच्या शोधात घालवू असे ठरवले आणि सकाळी नणंदेला घेउन रानफुलांच्या वाटेने निघाले. आमच्या एरीयात मी पहीलीच असेन अशी रस्त्यात फोटो काढणारी. जर लाजले तर मुळ हेतू दुर राहील आणी मनसोक्त फोटो काढता येणार नाही. म्हणून रस्त्याला कोण येत जात तिथे पाहीलच नाही. नणंदेला स्कूटीवर ड्रायव्हिंग करायच होत म्हणून तिने तिची वेगळी आणि माझी वेगळी अश्या दोन गाड्या घेउन आम्ही दोघी हम दो शेर चले प्रमाणे निघालो. सुरुवातीलाच एका ओसाड जागी जाऊन दोघी थांबलो. ती फक्त जाण्या येण्याची वाट आहे. दुचाकी तिथे जात येत होत्या. मला कॅमेरा अॅडजेस्ट होत नव्हता. प्रचंड दु:ख होत होतं तेंव्हा.
=================================================
=================================================
कुंडित, बागेत किंवा इतरत्रः लावलेल्या शोभेच्या,फुलांच्या झाडांपेक्षा मला हि इवली इवली गवत फुले फार आवडतात. थोड्या दिवसांसाठीच जन्माला आलेल्या या लाल, पिवळ्या, जांभळ्या, पांढर्या निळ्या, हिरव्या, गुलाबी शलाका पावसाळ्यानंतर जमिनीवरच्या हिरव्या तारांगणात लखलखत असतात. निसर्गाची अशी हि सतरंगी उधळण करीत फक्त काही दिवसांचेच आयुष्य घेऊन आलेली हि रानफुले आपल्याला निखळ आनंद देऊन जातात आणि मग आपले मनही लहान होऊन शांताबाईंच्या कवितेसारखेच गाऊ लागते.