Submitted by जो_एस on 31 July, 2014 - 21:41
सध्या घराच्या आसपास बरेच पक्षी आहेत. पहाटे ५ पासून त्यांची गाणी सुरू होतात.
ही पाण कोंबडी, ही तर इतक्या प्रकारचे आवाज काढते, रात्रीपण ओरड्ते बरेचदा
एकदा ही उंच सरळ झाडाच्या खोडावर खालुन वर पळत जाताना पाहिली. असे क्षण कॅमेरात पकडता येत नाहीत.
कोकीळेच्या पिल्लाला कावळा भरवताना पाहीला तेही राहीलच कॅप्चरायच.
परवा बराच पाऊस पडून थांबल्यावर पंख वाळवत होती
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त प्र. चि. ; मी तर
मस्त प्र. चि. ; मी तर पहिल्यांदा पाहीली पाणकोंबडी.
मस्त आहेत प्रचि.
मस्त आहेत प्रचि.
नाव ऐकुन होते दर्शन आज झाले
नाव ऐकुन होते दर्शन आज झाले
रच्याकने ही पण खातात का? (का हा प्रश्ण पडलाय मला देव जाणे :अओ:)
रच्याकने ही पण खातात का?
रच्याकने ही पण खातात का? >>>>> आगोदर पकडून तर दाखवा, अशी काय पळते ना... सुसाट
सुंदर फोटो.. फार चपळ असते हि,
सुंदर फोटो.. फार चपळ असते हि, फोटोत पकडणे कठीण असते.
खूप नैसर्गिक आले आहेत फोटो
खूप नैसर्गिक आले आहेत फोटो
The White-breasted Waterhen
The White-breasted Waterhen (Amaurornis phoenicurus) मस्त आलेत सारे फोटो.
मस्त आलेत फोटो
मस्त आलेत फोटो
हि पाण कोंबडी बघुन मला 'सागर'
हि पाण कोंबडी बघुन मला 'सागर' मधली डिंपल कपाडिया आठवली
पाणकोंबडी प्रथमच पाहिली. फोटो
पाणकोंबडी प्रथमच पाहिली.
फोटो सुरेख!
आमच्याही मागच्या आवारात आहेत
आमच्याही मागच्या आवारात आहेत पाणकोंबड्या. एका झाडावर घरटीच केली आहेत. ह्यांची पिल्ले झाली की कोंबड्यांप्रमाणेच फिरतात एकत्र इकडे तिकडे.
फोटो छान.
रच्याकने ही पण खातात का? >>>
रच्याकने ही पण खातात का? >>> श्रावण पाळला नाही का ?
सुंदर आहे पा.को.
मस्त आहे पाण कोंबडी.
मस्त आहे पाण कोंबडी. पहिल्यांदाच पाहतीये.
छान फ़ोटो. आज प्रथमच पाहिली.
छान फ़ोटो. आज प्रथमच पाहिली.
कोकीळेच्या पिल्लाला कावळा भरवताना पाहीला तेही राहीलच कॅप्चरायच.>>>>>>>>>नशीबवान आहात. हे पहायला मी केव्हापासून वाट बघतेय.
श्रावण पाळला नाही का ?
श्रावण पाळला नाही का ? फिदीफिदी दिवा घ्या>>> अहो श्रावण कसला पुर्ण वर्ष पाळते. मी एगीटेरिअन. म्हणुन तर लिहिलेय की मला हा प्रश्ण का पडला. (हे राम - डोक्यावर टपली मारुन घेणारी बाहुली)
म्हणुन तर लिहिलेय की मला हा
म्हणुन तर लिहिलेय की मला हा प्रश्ण का पडला>>>>>..म्हणजे मला वाटलेलं बरोबर होतं तर!
कुठे दिसली?? माझ्या घराच्या
कुठे दिसली?? माझ्या घराच्या मागच्या ओढ्यात पण असते. अनेक ठिकाणी दिसते ही. पाषाणलेक, कवडीपाट व तळ्याच्या जागी.
रच्याकने ही पण खातात का? (का
रच्याकने ही पण खातात का? (का हा प्रश्ण पडलाय मला देव जाणे>>>>>
हो खातात. चुलीवर भाजल्यास भरपूर तेल निघते. शाळेत असताना डोंबिवलीला स्थानिक गावकऱ्याकडे पाहिलं होतो. त्यावेळेस डोंबिवली मध्ये पाणथळ जागा खूप असल्याने यांचा वावर भरपूर होता.
मस्त आहेत फोटो. सूनटून्या,
मस्त आहेत फोटो.
सूनटून्या, डोंबिवलीत कुठल्या एरियात बघितली हिला, मी नाही बघितलेली आठवत म्हणून विचारते.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
घराच्या आसपास पक्षी... वॉव
घराच्या आसपास पक्षी... वॉव लकी आहात.
पाणकोंबडी हा प्रकार माझ्या कानावर पहिल्यांदा आलाय. याआधी खरेच माहीत नव्हते.
पण पाणकोंबडी हे नाव का? म्हणजे पाण्याच्या जवळ आढळते की त्यात पोहता, तरंगताही येते. कारण तसा एकही फोटो नाही वा तिच्या पायाची शरीराची रचनाही तशी बदक टाईप वाटत नाहीये.
खूप मस्त आलेत फोटो. आवडले.
खूप मस्त आलेत फोटो. आवडले.
ही खरचं पाणकोंबडी आहे का ?
ही खरचं पाणकोंबडी आहे का ? रंग असलेली कधीच पाहिले नव्हती.
धन्यवाद मित्रांनो मला वाटत
धन्यवाद मित्रांनो
मला वाटत पाण्याच्या आसपास असल्या मुळे पाण कोंबडी म्हणत असावेत
व्वा! खुपच छान आहे
व्वा! खुपच छान आहे पाणकोंबडी.काहीशी टीटवी सारखी दिसते आहे..
बंडु
फोटो छान आले आहेत.
फोटो छान आले आहेत.
अंजू डोंबिवली पश्चिमेला १५
अंजू
डोंबिवली पश्चिमेला १५ वर्षांपूर्वी खाडीपासून जवळपास २ किमी आत खूप पाणथळ जागा होती. आता थेट खाडी पर्यंत बांधकाम झाल्यामुळे सगळी नष्ट झाली आहेत.
अच्छा ओके, धन्यवाद सुनटून्या.
अच्छा ओके, धन्यवाद सुनटून्या.
ही खरचं पाणकोंबडी आहे का
ही खरचं पाणकोंबडी आहे का ?>>
म्हणजे काय. White Breasted Waterhen ही अशीच असते फक्त. पाण्यावर असलेल्या पाणवेलींवरुन अलगदपणे चालतात या कोंबड्या. अतिशच चपळ व भित्र्या.
अतिशच चपळ व भित्र्या. >
अतिशच चपळ व भित्र्या. > +१
वसई विरारला बघितल्या आहेत.. यांचीच मोठी बहिण म्हणजे जांबळी कोंबडी त्या नाशिकच्या नांदुरमध्यमेश्वर आणि बारमती जवळील भिगवणला दिसल्या होत्या.
Pages