मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140
मी मॉरिशियसला पोहोचलो तो दिवस शनिवार होता. दुपार होऊन गेली होती. एमिरेट्सच्या फ्लाईटमधे भरपूर
खाणे झाल्याने भूक नव्हती. इमिग्रेशन वगैरे लगेचच पार पडले. माझ्याकडे फारसे सामानही नव्हते.
ड्रायव्हर माझी वाट बघतच होता.
हा विमानतळ आहे या बेटाच्या दक्षिण पूर्व टोकाला आणि माझे हॉटेल, ल मेरिडीयन उत्तर पश्चिम टोकाला.
हा १०० किमीचा टप्पा त्या देशाच्या एकमेव हायवेवरून तासाभरातच पार पडला. ड्रायव्हर बोलका होता. हिंदीतून
गप्पा चालल्या होत्या. वाटेतला एक अपघात ( दोन दिवसांपुर्वी झालेला ) त्याने मला कौतूकाने दाखवला. मनात
म्हणालो, बेट्या माझ्या आफ्रिकेत ये, म्हणजे दाखवतो तूला अपघात काय असतात ते.
शनिवार असल्याने बहुतेक दुकाने बंदच होती. पण त्याच्या ओळखीने मी डॉलर्स चेंज करून घेतले. ( खरं
तर तशी गरज नव्हती. डॉलर्स कुठल्याही दुकानात स्वीकारतात तिथे.)
हॉटेल मधे पोहोचल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. गेल्यागेल्या चिंचेचे अप्रतिम चवीचे सरबत व आईस्क्रीम
देऊन स्वागत झाले. पाच मिनिटात सर्व सोपस्कार करून रुम ताब्यातही मिळाली. आदल्या रात्री दुबईला
जागरण झाले होते म्ह्णून खरे तर झोप येत होती. रुम तर मस्तच होती.. पण निग्रहाने बाहेर पडलो.
हॉटेलचा परीसर, बाहेरचा रस्ता भटकून आलो.. तिथले हे फोटो.
१) रुमचे प्रथम दर्शन
२)
३) सज्जा
४) आतली पायवाट
५) बाहेरचा रस्ता, इथून पाच मिनिटावर एक सार्वजनिक समुद्रकिनारा होता.
६) वडगाव ( या जंजाळात पण शिरलो मी. )
७) रस्त्याच्या कडेने पसरलेली आईसक्रीम क्रीपर
८) हा फोटो आमच्या कोल्लापूरातला म्हणून खपेल.. हॉटेलच्या समोरच अशी शेती आणि मागे देखणे पर्वत होते.
रोज त्यांचे नवे रुप दिसायचे.
९)
१०) हॉटेलच्या मागे त्यांचाच खाजगी समुद्रकिनारा होता.. तशीच छोट्या स्विमिंग पूल्सची मालिकाही होती.
११) "तिन्हीसांजा सखे मिळाल्या ..." गाणे म्ह्णायची जागा अरसिक माणसं इथे मासे पकडतात.
१२)
१३)
१४)
१५)
१६) हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर बोराचे झाड होते... मी गोळा करून आणली.
१७)
१८)
१९) अंगत पंगत
२०)
२१) त्या रात्री तर जेवलोच नाही.. दुसर्या दिवशीचा नाश्ता
२२) दुसर्या दिवशीची प्रसन्न सकाळ
अप्रतिम ............ मस्तच
अप्रतिम ............ मस्तच दिनेशदा..
वाह! डोळ्याचं पारणं फिटलं
वाह! डोळ्याचं पारणं फिटलं दिनेश
बोरं चिमण्या हिरव्या पाण्याचा
बोरं चिमण्या हिरव्या पाण्याचा समुद्र किनारा क्या बात है !
छान आहे फोटो
छान आहे फोटो
मस्तच!
मस्तच!
काय स्वच्छता आहे!आणि निसर्ग
काय स्वच्छता आहे!आणि निसर्ग आहाहा! वडगाव आवडले बुवा!
त्या ह्रुदयाच्या आकाराची गुलाबी फुले असलेल्या वेलाला आईसकक्रीम क्रीपर म्हणतात नाही! त्याचे लाहान पणा पासुन मला विलक्षण वेड. नाव आत्ता कळले.. तिकडच्या चिमण्या पण कीती सोफेस्टीकेटेड वाटताय्त नाही
मस्तच दिनेशदा. सुंदर फोटोज,
मस्तच दिनेशदा. सुंदर फोटोज, माहिती.
वडगाव... भारी शब्दयोजना.
<< हा फोटो आमच्या कोल्लापूरातला म्हणून खपेल.. >> अगदी.
तेवढं अरसिक माणसे... मासे.... निषेध
खाण्यापिण्याचे पण टाकालच बहुतेक पुढे. त्यो ब्रेकफास्ट जरा कमीच पडला
निळे भगवे आकाश, पिवळसर रेती,
निळे भगवे आकाश, पिवळसर रेती, व हिरवा पाण्याचा रंग.... वाह. मस्त फोटो.
वा! मी थोडे माझ्या पोतडीतले
वा! मी थोडे माझ्या पोतडीतले फोटो टाकतेय बरं का.
हा माझा अतिशय आवडीचा फोटो. ल मेरीडियनच्या लॉबीतून घेतला आहे. बाग, जेट्टी आणि मग अथांग हिंदी महासागर:
लॉबी :
आभार दोस्तांनो. मामी, सगळं
आभार दोस्तांनो.
मामी, सगळं अजून तसंच राखलंय ! सर्व्हीस पण छान असायची. क्यूमीन मधल्या शेफला मी मुद्दाम भेटून
कॉम्प्लीमेंटस दिल्या. कच्च्या अननसाचे लोणचे तर मस्तच होते.
एरवी तळलेले पदार्थ मी जास्त खात नसलो तरी तिथल्या भज्यांनी मला मोहात पाडलेच.
दिनेशदादा, मला आत्ताच्या
दिनेशदादा, मला आत्ताच्या आत्ता ती बोरं हवी आहेत.
निळा रंग माझ्या खास आवडीचा.. अतिशय सुंदर अशी ही निळाई
मामी, तुमच्या पोतडीत पण मस्त फोटो आहेत की, आणखी असले तर पाहायला आवडतील.
नले, बोरांचा मोह अजूनही पडतो
नले, बोरांचा मोह अजूनही पडतो मला. कुठेही बोराचे झाड दिसले तर राहवत नाही.
सुंदर किनारा!
सुंदर किनारा!
वा मस्त! हॉटेल्,रुम, किनारा,
वा मस्त! हॉटेल्,रुम, किनारा, टपोरी बोरे, पक्षी मस्त!
वाह!! किती मस्त फोटोज आणी
वाह!! किती मस्त फोटोज आणी वर्णन्..खूप खूप छान वाटलं पाहताना, वाचताना
maame tujhe hi collection mastay..
छान प्रकाशचित्रे.
छान प्रकाशचित्रे.
खूप आवडले फोटो. मस्त भटकंती
खूप आवडले फोटो. मस्त भटकंती चाललीय जियो !
दिनेशदा, मामी मस्त फोटो.
दिनेशदा, मामी मस्त फोटो.
हा भागही सुरेख. मामी, मस्त
हा भागही सुरेख.
मामी, मस्त फोटोज.
मस्त फोटो. वडगाव शब्द आवडला.
मस्त फोटो.
वडगाव शब्द आवडला.
मस्त आहेत फोटोज, मामीचा झब्बू
मस्त आहेत फोटोज, मामीचा झब्बू पण मस्त.
मस्त फोटोज ! मामीचे फोटोही
मस्त फोटोज !
मामीचे फोटोही मस्त आहेत.
खूप आवडले फोटो.
खूप आवडले फोटो.
अप्रतिम !
अप्रतिम !
बास्स फक्त हि निळाई बघत
बास्स फक्त हि निळाई बघत राहावी
दिनेशदा,ताजी ताजी टपोरी
दिनेशदा,ताजी ताजी टपोरी बोरे,पक्षांची मस्त अंगतपंगत,निळाशार समुद्र,नितळ समुद्रकिनारा आणि आकाशातील विविध रंगछटा!व्वा.मन प्रसन्न झालं.
मामी, फोटो आवडले.
सगळेच फोटो केवळ भारीएत .....
सगळेच फोटो केवळ भारीएत .....
पक्ष्यांचे फोटो तर सुर्रेखच ....
Scaly-breasted munia (Lonchura punctulata) सगळ्यात डावीकडे, Madagascar Turtle-dove (Nesoenas picturata) आणि पिवळे पक्षी म्हणजे Village weaver (Ploceus cucullatus) - नर व मादी
शशांक, आणखीही काही पक्ष्यांचे
शशांक, आणखीही काही पक्ष्यांचे फोटो येतील पुढे.. परत एकदा आभार सर्वांचे.
आता पुढच्या भागाच्या तयारीला लागतो.
मस्त आहेत फोटो!!!!!!!!!!!!!!!
मस्त आहेत फोटो!!!!!!!!!!!!!!! पण दिनेशदा,ताजी ताजी टपोरी बोरं....
त्या वडगावात भीती नाही वाटली का?
वा खुपच सुंदर फोटो आहेत. बोरे
वा खुपच सुंदर फोटो आहेत. बोरे पाहून तो.पा.सु.
अरसिक माणसं इथे मासे पकडतात. निषेध, निषेध, निषेध. मासेखाउंचा घोर अपमान
त्यांची रसिकता मासे पकडण्यात आणि खाण्यात असते दिनेशदा
Pages