मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन

Submitted by दिनेश. on 31 July, 2014 - 06:13

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मी मॉरिशियसला पोहोचलो तो दिवस शनिवार होता. दुपार होऊन गेली होती. एमिरेट्सच्या फ्लाईटमधे भरपूर
खाणे झाल्याने भूक नव्हती. इमिग्रेशन वगैरे लगेचच पार पडले. माझ्याकडे फारसे सामानही नव्हते.
ड्रायव्हर माझी वाट बघतच होता.

हा विमानतळ आहे या बेटाच्या दक्षिण पूर्व टोकाला आणि माझे हॉटेल, ल मेरिडीयन उत्तर पश्चिम टोकाला.
हा १०० किमीचा टप्पा त्या देशाच्या एकमेव हायवेवरून तासाभरातच पार पडला. ड्रायव्हर बोलका होता. हिंदीतून
गप्पा चालल्या होत्या. वाटेतला एक अपघात ( दोन दिवसांपुर्वी झालेला ) त्याने मला कौतूकाने दाखवला. मनात
म्हणालो, बेट्या माझ्या आफ्रिकेत ये, म्हणजे दाखवतो तूला अपघात काय असतात ते.

शनिवार असल्याने बहुतेक दुकाने बंदच होती. पण त्याच्या ओळखीने मी डॉलर्स चेंज करून घेतले. ( खरं
तर तशी गरज नव्हती. डॉलर्स कुठल्याही दुकानात स्वीकारतात तिथे.)

हॉटेल मधे पोहोचल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. गेल्यागेल्या चिंचेचे अप्रतिम चवीचे सरबत व आईस्क्रीम
देऊन स्वागत झाले. पाच मिनिटात सर्व सोपस्कार करून रुम ताब्यातही मिळाली. आदल्या रात्री दुबईला
जागरण झाले होते म्ह्णून खरे तर झोप येत होती. रुम तर मस्तच होती.. पण निग्रहाने बाहेर पडलो.

हॉटेलचा परीसर, बाहेरचा रस्ता भटकून आलो.. तिथले हे फोटो.

१) रुमचे प्रथम दर्शन

२)

३) सज्जा

४) आतली पायवाट

५) बाहेरचा रस्ता, इथून पाच मिनिटावर एक सार्वजनिक समुद्रकिनारा होता.

६) वडगाव Happy ( या जंजाळात पण शिरलो मी. )

७) रस्त्याच्या कडेने पसरलेली आईसक्रीम क्रीपर

८) हा फोटो आमच्या कोल्लापूरातला म्हणून खपेल.. हॉटेलच्या समोरच अशी शेती आणि मागे देखणे पर्वत होते.
रोज त्यांचे नवे रुप दिसायचे.

९)

१०) हॉटेलच्या मागे त्यांचाच खाजगी समुद्रकिनारा होता.. तशीच छोट्या स्विमिंग पूल्सची मालिकाही होती.

११) "तिन्हीसांजा सखे मिळाल्या ..." गाणे म्ह्णायची जागा Happy अरसिक माणसं इथे मासे पकडतात.

१२)

१३)

१४)

१५)

१६) हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर बोराचे झाड होते... मी गोळा करून आणली.

१७)

१८)

१९) अंगत पंगत

२०)

२१) त्या रात्री तर जेवलोच नाही.. दुसर्‍या दिवशीचा नाश्ता

२२) दुसर्‍या दिवशीची प्रसन्न सकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू... भावना पोहोचल्या Happy गंम्मत केली... !
तसेही अश्या ठिकाणी केवळ शोभेचेच मासे दिसतात ( रीफ फिश ) त्यांच्या खाण्यासाठी उपयोग नसतो.
टोचा, ओळख भागात खर्चाचा अंदाज आहे.

अप्रतिम दिनेश्दा
शेवटचा फोटो, फोटो वाटतच नाहीए. अस वाटतय तिथच कमरेवर हात ठेवुन मी उभा आहे नी तो झाडुवाला आता हात हलवेल.

वैयाक्तिक गेल्यास बचत कशी होऊ शकते हे जरा इसकटून सांगा राव....
>> रॉबीनहूड , जर तुम्ही ऑफ सिझन आणि अ‍ॅडव्हान्समध्ये हॉटेल आणि विमानाचे बुकींग केले आणि लोकल टुर ऑपरेटरला साईटसिईगसाठी बघितले तर २५ ते ४०% बचत होऊ शकते.

बॉन्ड... काय बोलू मी ?

रॉबीन.. सध्या नेट्मूळे प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संपर्क साधून आपल्या सहली आखता येतात. स्वस्त असल्या तरी कधीकधी गैरसोयही होतेच. युरपियन लोकांना एवढ्यातेवढ्या गैरसोयींचे काही वाटत नाही. प्रवासाला गेल्यावरही
त्यांची कष्ट करायची तयारी असते. आपल्याला ( मला तरी ) सगळे आयते हवे असते Happy

वॉव सुरेख.

मामीचे पण फोटो सुंदर.

अमेय तू आणि जागुने निषेध केला असला तरी माझा पाठींबा दिनेशदाना त्या वाक्यासाठी. (ह.घ्या)

वडगाव मस्त.

प्रत्यक्ष त्या जागेवर न जाताही (जाणेही शक्य नाहीच म्हणा...) निसर्गाने भरभरून उधळलेल्या आणि तेथील संबंधितांनी विलक्षण देखणेपणाने जपलेल्या सौंदर्य दिनेश यांच्या प्रकाशचित्रातून प्रसन्नरितीने समोर आले.... ते अर्थातच किती भावले हे येथील प्रत्येक प्रतिसाद स्पष्ट करीत आहे.

"....आमच्या कोल्लापूरातला म्हणून खपेल...." ~ या वाक्यामुळे परत एकदा त्या चित्राकडे पाहिले आणि मनोमनी पटले की हा भाग तर आमच्या पन्हाळा जोतिबाच्या पायथ्याच्या एखाद्या शेताचाच....शिवाय इकडेही हल्ली शेताशेतातून मोबाईल टॉवर्स उभी झालेली आहेतच.

नयनरम्य सारेच.

Pages