अप्रतिम निसर्गाचा थाट... भुईबावडा घाट
खडकांच्या कपारीतून खळखळणारे धबधबे, हिरव्यागार वनराईतून फेसाळणारे शुभ्र पाणी, दाट धुक्याची चादर, मनाला आनंद देणारा गार वारा आणि सोबत पावसाच्या सरी... वर्षा पर्यटनासाठी असे वातावरण म्हणजे स्वर्गीय सुखच. सध्या भुईबावडा घाटात असे वातावरण अनुभवायला मिळते आहे. अप्रतिम निसर्गाचा थाट घेवून भुईबावडा घाट वर्षा पर्यटनासाठी निसर्गाला साद घालतो आहे.
प्रचि १
सिंधुदुर्गातील घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि गगनबावडा यांचा वापर सर्वाधिक होतो. तर भुईबावडा घाट काहीसा दुर्लक्षितच राहीलेला आहे. मात्र निसर्गप्रेमीसाठी विशेषत: कोल्हापूर-राधानगरी परिसरातून या घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळते. कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि दाट धुक्यांच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच आहे.
प्रचि २
सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता आहे, तर वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी अवघी ९ ते १० कि.मी. असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून निघते. छोट्या-मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत पहीलाच मोठा धबधबा आणि लगत छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या या खडकांमधून जागोजागी पाणी वाहते. थंडगार पाण्यात बसून अगदी सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो. इथून पुढे घाट चढताना प्रत्येक १०० ते १५० कि.मी.ला छोटा मोठा धबधबा आहे.
प्रचि ३
पायथ्यापासून तीन-चार कि.मी. अंतरावर खूप उंचावरून धबधबा कोसळतो. त्याच्या लगतच्या एका वळणावरून रस्त्याच्या डाव्या बाजूवरून कोसळणारा धबधबा आणि रस्त्यावरील पुलाच्या पाईपमधून कोसळणारे त्याचे पाणी हा नजारा पाहताना थक्क व्हायला होते. घाटमाथा जसजसा जवळ येवू लागतो तशी धुक्याची चादर अधिकच दाट होते. पावसांच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो. भुईबावडा घाट जिल्ह्याच्या एका टोकाला असला तरी अलिकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळते आहे. विशेषत: कोल्हापूर-राधानगरी बाजुचे पर्यटक या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी आवर्जुन येतात.
धुके कमी असेल तर श्री गगनगिरी महाराजांच्या मठाचे विहंगम दृश्य या घाटातून पहायला मिळते. सिंधुदुर्गातून सुरू होणारा हा रस्ता गगनबावडा एसटी स्टँडजवळ येवून पोहोचतो. या ठिकाणी पोटपूजा केल्यानंतर गगनबावडा घाटाने सिंधुदुर्ग वैभववाडीत उतरता येते. संपूर्ण घाटरस्त्याची ही सैर अवघ्या ३०-४० कि.मी. मध्ये पूर्ण करता येते. सोबत पोटपुजेचे साहित्य असेल तर हे वर्षा पर्यटन यादगारच ठरावे.
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
आणि हा फोटो ऑफ डे..
गाडिच्या काचेवरुन पडणार्या पाण्यामुळे मिळालेला इफेक्ट
प्रचि ८
ज ब र द स्त!!!! प्रचि ६ खुपच
ज ब र द स्त!!!!
प्रचि ६ खुपच आवडला
आणि हा फोटो ऑफ डे..>>>>>एक नंबर.
अत्यंत सुंदर! शेवटचा फोटो
अत्यंत सुंदर!
शेवटचा फोटो अमेझिंग टिपला आहे.
सुंदर ! शेवटचा फोटो सही!!
सुंदर !
शेवटचा फोटो सही!!
सावतानू फोटो झ्याक इले हत
सावतानू फोटो झ्याक इले हत
सुंदर !!
सुंदर !!
मस्तच..
मस्तच..
फोटो दिसत नाहि.
फोटो दिसत नाहि.
अप्रतिम ......
अप्रतिम ......
अप्रतिम... फारच छान.. ६ वा न
अप्रतिम... फारच छान.. ६ वा न शेवट चा फारच सही..
मस्त फोटो. ८ छान आहे.
मस्त फोटो. ८ छान आहे.
मस्तच.. गणपतीसाठी कोकणात
मस्तच.. गणपतीसाठी कोकणात जाताना दर्शन होईलच.
अत्यंत सुंदर!
अत्यंत सुंदर!
फोटो ऑफ डे..>>>>> व्वा क्या
फोटो ऑफ डे..>>>>> व्वा क्या बात है
मलाच फोटो का नाय दिसत
मलाच फोटो का नाय दिसत आहे...फक्त पहिलाच दिसतोय.
अप्रेतिम फोटो, आणि तसाच
अप्रेतिम फोटो, आणि तसाच निसर्गही
प्रचि ६ आणि ८ अफलातून
अत्यंत सुंदर फोटो आणि तसाच
अत्यंत सुंदर फोटो आणि तसाच निसर्गही
प्रचि ६ आणि ८ मस्तच.
सगळेच प्रचि मस्त.
सगळेच प्रचि मस्त.
झकास....
झकास....
छान आहेत फोटो.. गगनबावडा बंद
छान आहेत फोटो.. गगनबावडा बंद होता त्यावेळी या घाटातून बस गेली होती. मग एका मित्राबरोबर बाईकने हा घाट उतरलो होतो. अगदी उतरता उतरता एका नदीचे सुंदर वळण दिसते.
वा फारच सुंदर परीसर आहे. फोटो
वा फारच सुंदर परीसर आहे. फोटो अप्रतिम.
मस्त . शेवटचा फोटो तर
मस्त . शेवटचा फोटो तर
वा फारच सुंदर परीसर आहे. फोटो
वा फारच सुंदर परीसर आहे. फोटो अप्रतिम.
कमाल!!! खुप सुंदर फोटो आहेत..
कमाल!!!
खुप सुंदर फोटो आहेत..
फोटो
फोटो अप्रतिम..................
मस्त फोटो..
मस्त फोटो..
फोटो दिसत नाहियेत
फोटो दिसत नाहियेत
फोटो दिसत नाहियेत
फोटो दिसत नाहियेत
नयनरम्य ... नक्की भेट देणार
नयनरम्य ...
नक्की भेट देणार ...
मस्त डोळे तृप्तत !!!
मस्त डोळे तृप्तत !!!
मस्त फोटो सावंतानु
मस्त फोटो सावंतानु
Pages