अप्रतिम निसर्गाचा थाट... भुईबावडा घाट
खडकांच्या कपारीतून खळखळणारे धबधबे, हिरव्यागार वनराईतून फेसाळणारे शुभ्र पाणी, दाट धुक्याची चादर, मनाला आनंद देणारा गार वारा आणि सोबत पावसाच्या सरी... वर्षा पर्यटनासाठी असे वातावरण म्हणजे स्वर्गीय सुखच. सध्या भुईबावडा घाटात असे वातावरण अनुभवायला मिळते आहे. अप्रतिम निसर्गाचा थाट घेवून भुईबावडा घाट वर्षा पर्यटनासाठी निसर्गाला साद घालतो आहे.
प्रचि १
सिंधुदुर्गातील घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि गगनबावडा यांचा वापर सर्वाधिक होतो. तर भुईबावडा घाट काहीसा दुर्लक्षितच राहीलेला आहे. मात्र निसर्गप्रेमीसाठी विशेषत: कोल्हापूर-राधानगरी परिसरातून या घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळते. कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि दाट धुक्यांच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच आहे.
प्रचि २
सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता आहे, तर वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी अवघी ९ ते १० कि.मी. असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून निघते. छोट्या-मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत पहीलाच मोठा धबधबा आणि लगत छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या या खडकांमधून जागोजागी पाणी वाहते. थंडगार पाण्यात बसून अगदी सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो. इथून पुढे घाट चढताना प्रत्येक १०० ते १५० कि.मी.ला छोटा मोठा धबधबा आहे.
प्रचि ३
पायथ्यापासून तीन-चार कि.मी. अंतरावर खूप उंचावरून धबधबा कोसळतो. त्याच्या लगतच्या एका वळणावरून रस्त्याच्या डाव्या बाजूवरून कोसळणारा धबधबा आणि रस्त्यावरील पुलाच्या पाईपमधून कोसळणारे त्याचे पाणी हा नजारा पाहताना थक्क व्हायला होते. घाटमाथा जसजसा जवळ येवू लागतो तशी धुक्याची चादर अधिकच दाट होते. पावसांच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो. भुईबावडा घाट जिल्ह्याच्या एका टोकाला असला तरी अलिकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळते आहे. विशेषत: कोल्हापूर-राधानगरी बाजुचे पर्यटक या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी आवर्जुन येतात.
धुके कमी असेल तर श्री गगनगिरी महाराजांच्या मठाचे विहंगम दृश्य या घाटातून पहायला मिळते. सिंधुदुर्गातून सुरू होणारा हा रस्ता गगनबावडा एसटी स्टँडजवळ येवून पोहोचतो. या ठिकाणी पोटपूजा केल्यानंतर गगनबावडा घाटाने सिंधुदुर्ग वैभववाडीत उतरता येते. संपूर्ण घाटरस्त्याची ही सैर अवघ्या ३०-४० कि.मी. मध्ये पूर्ण करता येते. सोबत पोटपुजेचे साहित्य असेल तर हे वर्षा पर्यटन यादगारच ठरावे.
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
आणि हा फोटो ऑफ डे..
गाडिच्या काचेवरुन पडणार्या पाण्यामुळे मिळालेला इफेक्ट
प्रचि ८
राजापुरातस्ना वाभ्भ्यात
राजापुरातस्ना वाभ्भ्यात जाताना भुईबावड्यास्ना गेलंलय ता आठवता. एस्टी अजुनपोवत जाता काय ओ सांवतानु?
वा जुन्या आठवणी जाग्या
वा जुन्या आठवणी जाग्या केल्यात. शेर्पे नापण्याला पाणी आले आहे की नाही भरपूर?
अप्रतीम फोटो !!!
अप्रतीम फोटो !!!
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
टंण्या.. नापन्याक भन्नाट पाणी
टंण्या.. नापन्याक भन्नाट पाणी इला हां. आठवड़ो भर जोरदार पाउस पड़ता हा.. आजव हां... येतास मा..
राज.. st चालु हां घाटातुन
राज.. st चालु हां घाटातुन
डोळे आणि मन तृप्त झाल.शेवटचा
डोळे आणि मन तृप्त झाल.शेवटचा प्रचीतर अप्रतिम
प्रचि क्र. २ आणि ५ चे कॅमेरा
प्रचि क्र. २ आणि ५ चे कॅमेरा सेटींग मस्तच आहे, धबधब्यासाठी जसे हवे असते तसे.
शेवटचा फोटो तर अफलातूनच
सगळेच प्रचि अत्यंत सुंदर
सगळेच प्रचि अत्यंत सुंदर आहेत.. जबरी..
धबधब्याचे long exposure
धबधब्याचे long exposure मस्तच!
शेवटचा पण अप्रतिम.
टंण्या.. नापन्याक भन्नाट पाणी
टंण्या.. नापन्याक भन्नाट पाणी इला हां. आठवड़ो भर जोरदार पाउस पड़ता हा.. आजव हां... येतास मा..
>>>
का कृर चेष्टा करतोस बाबा!! नेपणं दूर राहिलं
सगळे प्रचि मस्तच !!!!
सगळे प्रचि मस्तच !!!!
सुंदर फोटो. आणि शेवटचा फोटो
सुंदर फोटो.
आणि शेवटचा फोटो अप्रतिम.
तुफान फोटु रे! शेवटचा
तुफान फोटु रे!
शेवटचा काचेमधुन काधलेला भन्नट आहे! तुला शार्पशूटर सावत्या म्हणायला हव राव.
सुरेख आलेत सर्व फोटो.
सुरेख आलेत सर्व फोटो. धबधब्याचे तर अप्रतिम एकदम.
.
.
गिरीश, मस्त माहीती आणि मस्त
गिरीश, मस्त माहीती आणि मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त फोटो
फार सुंदर. खूप छान वाटल फोटो
फार सुंदर. खूप छान वाटल फोटो पाहून.
मस्त!
मस्त!
हिरवाई व निसर्गसौंदर्याने
हिरवाई व निसर्गसौंदर्याने डोळे निवले.
शेवटचा फोटो एकदम सहीच!
अप्रतिम....
अप्रतिम....
अप्रतिमच.
अप्रतिमच.
सर्वांच्या प्रोत्साहानाबद्द्ल
सर्वांच्या प्रोत्साहानाबद्द्ल आभार....
the last one is a highlight
the last one is a highlight .. apratim
सगळेच फोटो मस्त आहेत
सगळेच फोटो मस्त आहेत .
कोणत्या कॅमेराने काढले आहेत ?
स्वराली . canon 550d With 10
स्वराली .
canon 550d With 10 - 22 mm
And 18 - 135 mm
आनि माझा डोळा....!
अप्रतिम फोटो... हा घाट लागतो
अप्रतिम फोटो... हा घाट लागतो आम्हाला गावी जाताना
शेवटच वाॅटर कलर पेंटिंग वाटतय अगदी ...
सुन्दर हिरवागार निसर्ग! लास्ट
सुन्दर हिरवागार निसर्ग!
लास्ट फोटो टॉप्पक्लास!
सुरेखच अमोल केळकर मला इथे
सुरेखच
अमोल केळकर
मला इथे भेटा
Pages