अप्रतिम निसर्गाचा थाट... भुईबावडा घाट
खडकांच्या कपारीतून खळखळणारे धबधबे, हिरव्यागार वनराईतून फेसाळणारे शुभ्र पाणी, दाट धुक्याची चादर, मनाला आनंद देणारा गार वारा आणि सोबत पावसाच्या सरी... वर्षा पर्यटनासाठी असे वातावरण म्हणजे स्वर्गीय सुखच. सध्या भुईबावडा घाटात असे वातावरण अनुभवायला मिळते आहे. अप्रतिम निसर्गाचा थाट घेवून भुईबावडा घाट वर्षा पर्यटनासाठी निसर्गाला साद घालतो आहे.
प्रचि १
सिंधुदुर्गातील घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि गगनबावडा यांचा वापर सर्वाधिक होतो. तर भुईबावडा घाट काहीसा दुर्लक्षितच राहीलेला आहे. मात्र निसर्गप्रेमीसाठी विशेषत: कोल्हापूर-राधानगरी परिसरातून या घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळते. कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि दाट धुक्यांच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच आहे.
प्रचि २
सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता आहे, तर वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी अवघी ९ ते १० कि.मी. असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून निघते. छोट्या-मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत पहीलाच मोठा धबधबा आणि लगत छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात. या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या या खडकांमधून जागोजागी पाणी वाहते. थंडगार पाण्यात बसून अगदी सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो. इथून पुढे घाट चढताना प्रत्येक १०० ते १५० कि.मी.ला छोटा मोठा धबधबा आहे.
प्रचि ३
पायथ्यापासून तीन-चार कि.मी. अंतरावर खूप उंचावरून धबधबा कोसळतो. त्याच्या लगतच्या एका वळणावरून रस्त्याच्या डाव्या बाजूवरून कोसळणारा धबधबा आणि रस्त्यावरील पुलाच्या पाईपमधून कोसळणारे त्याचे पाणी हा नजारा पाहताना थक्क व्हायला होते. घाटमाथा जसजसा जवळ येवू लागतो तशी धुक्याची चादर अधिकच दाट होते. पावसांच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो. भुईबावडा घाट जिल्ह्याच्या एका टोकाला असला तरी अलिकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळते आहे. विशेषत: कोल्हापूर-राधानगरी बाजुचे पर्यटक या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी आवर्जुन येतात.
धुके कमी असेल तर श्री गगनगिरी महाराजांच्या मठाचे विहंगम दृश्य या घाटातून पहायला मिळते. सिंधुदुर्गातून सुरू होणारा हा रस्ता गगनबावडा एसटी स्टँडजवळ येवून पोहोचतो. या ठिकाणी पोटपूजा केल्यानंतर गगनबावडा घाटाने सिंधुदुर्ग वैभववाडीत उतरता येते. संपूर्ण घाटरस्त्याची ही सैर अवघ्या ३०-४० कि.मी. मध्ये पूर्ण करता येते. सोबत पोटपुजेचे साहित्य असेल तर हे वर्षा पर्यटन यादगारच ठरावे.
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
आणि हा फोटो ऑफ डे..
गाडिच्या काचेवरुन पडणार्या पाण्यामुळे मिळालेला इफेक्ट
प्रचि ८
सावतानु, फोटो झकास हा! पण
सावतानु, फोटो झकास हा!
पण फ़ोटो बघून जीव जळता बघा.
जरा आपल्या भरलेल्या "गड" नदीचेव फ़ोटो द्या बघू.
सगळे फोटो अप्रतीम आलेत.
सगळे फोटो अप्रतीम आलेत. धबधबा पाहुन जीव धबाधबा जळ्तो. खरच आजपर्यन्त कुठलाच धबधबा जवळुन बघीतलेला नाहीये.:अरेरे:
शेवटचा फोटो खूप छान असला तरी थोडा एकान्तातला, भीतीदायक किन्वा गुढ असा वाटतो.
झकास.......
झकास.......
अप्रतिम... प्रचि २, ६ आणि ८
अप्रतिम... प्रचि २, ६ आणि ८ ला तर शब्दच नाही... खुप सुंदर...
अप्रतिम प्रचि आता प्रचि ६
अप्रतिम प्रचि
आता प्रचि ६ बद्द्ल मी वेगळे काय बोलु .
झक्कास फोटो!
झक्कास फोटो!
मस्त
मस्त
सुंदर ! शेवटचा फोटो तर
सुंदर ! शेवटचा फोटो तर क्लासिक
फोटो ऑफ डे आणि सगळी फोटो-
फोटो ऑफ डे आणि सगळी फोटो- एकदम मस्त
Pages