फ्रॉईड, मला माफ कर!
तू लिहिलेली एकही ओळ न वाचता मी परवा चारचौघांसमोर म्हणालो, "माणसाचं कर्तृत्व, त्याचा भविष्यकाळ हे सगळं त्याच्या बालपणावर, त्याच्या आणि त्याच्या आई-बापांच्या संबंधांवर अवलंबून असतं. म्हणजे त्याचा प्रवास आधीच ठरलेला असतो, आपण आयुष्यभर फक्त या 'ब्रॉडस्ट्रोक्स'चं डिटेलिंग करत असतो, हा शोध जाहीर करण्यासाठी सिगमंड फ्रॉईडला भर चौकात फाशी द्यायला हवी होती". असो!
मी गांजा ओढतो. राम पण हल्ली गांजा ओढू लागला आहे. त्यालाही अफूपेक्षा गांजा जास्त आवडतो. आम्ही गांजा ओढतो तेव्हा आम्ही गाडित असतो. समोर काही उंदीर नाचत असतात. आम्ही तिकडे दुर्लक्ष करून मनापासून एक एक कश ओढत राहतो.
माझीच एक जुनी कथा परत इथे टाकतेय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
खरंतर ती एक खूप सुंदर सकाळ होती. थंडीचा कडाका पडायच्या आधीची मोहक थंडी आणि कोवळ्या उन्हाचे मऊसूत कवडसे. तिच्या घरासमोरून जाणारी वाटही सुंदर सकाळीएवढीच सुंदर होती. या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखडा असवा तशी ती तिच्या घराच्या गॅलरीत उभी होती. परत एकदा मिनिटामिनिटाला आत आत उतरत जाणारं नैराश्य अनुभवत. इतक्या सुंदर सकाळी ती निराश का होत होती हे मात्र कोणालाच उमजण्यासारखं नव्हतं.
खालील कथेतील सर्व पात्रे आणि घटना अंशतः काल्पनिक आहेत तरी ही पात्रे वा घटना आपल्यास आढळल्यास... आश्चर्य कसले? घरोघरी.............!
-----------------------------------------------------------------------------------
"काय रे, खूप उडायला लागलास तू ? "
"कोण बोलतंय ? "
"तुझा बाप.... xxxx .. ओळखलं नाही का ? "
"अं... नाही. "
"मी बंड्यादादा बोलतोय.... चल हप्ता पोचव पटकन नाहीतर ... "
"नाहीतर .......... "
"नाहीतर तुला पोचवीन... हि हि हि ... "
*************************
"का रे .... तू मला काय येडा समजलास काय ? "
"......... "
"तू पोलिसांकडे कंप्लेंट केली ते मला समजत नाय काय ? अबे भुक्कड.. जगायचं असेल तर ५०,००० पोचव ..... नाहीतर तुझा तेरावा घालीन मी.... समजला काय ? बंड्यादादा म्हणतात मला"
************************************
"हॅलो"
"बंड्या को देना"
ती आणि तो १: http://www.maayboli.com/node/20185
ती आणि तो भाग २: http://www.maayboli.com/node/20410
अनिकेत चे मिशन एसी.
अनिकेत : अनुष्का, मला खुप दिवसांपासुन सांगायचे होते पण मला कळत नव्हते कसे सांगु ते...पण आज विचार केला तुला स्पष्टच सांगुन टाकावे....
अनुचे आपले मनात स्वतःशीच वादविवाद चालू.
अनु : हा तसला काही विचार तर करत नाही ना आपल्याला प्रपोज वगैरे करण्याचा?
हा अगदीच गर्लिश विचार अनुच्या मनात आला , आणि तिला त्याबाबत स्वतःवरच राग आला , आपणही ना कसे बावळटासारखे विचार करतो ना...
....हळुहळु अनु आता तिच्या मोठाल्या कंपनीत रुळली होती. फ्रेशर असल्यामुळे काम शिकायला थोडे प्रयास पडलेत पण लवकरच आपली कामातली प्रॉडक्टिवीटी दाखवल्यामुळे ६ महिन्यातच पर्मनंट एम्प्लॉई झाल्यात मॅडम!!!! ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनीअर वरुन सॉफ्टवेअर इंजिनीअर ही बढ्ती झाल्यामुळे मेन म्हणजे ट्रेनि असल्याचा शिक्का साफ पुसला गेला होता त्यामुळे स्वारी एकदम मजेत असायची. दिवस मजेत जात होते . आपण आता खुप काम करतो आणि अजुन शिकायला हवे असे सतत वाटत असे. टीममधे कोणाही सिनिअरला पकडायचे आणि आपल्या कामातले डाउट्स क्लीअर करायचे.
कुर्ला - हावडाच्या मासळीच्या वासाने भरलेल्या डब्यातला १४ तास प्रवास आणि पुढे धामणगाव ते घाटंजी २ सीटवर तिघांनी बसून केलेला बिड्यांच्या धुरात केलेला ३ तासाचा प्रवास... अगं आई गं... मला अक्षरशः जीव नकोसा झाला होता. त्या गर्दीतून दोन जड बॅग्ज कुणालाही लागू न देता बसबाहेर कश्याबश्या काढल्या आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. ऑटोत बॅग टाकून त्याला "ग्रीन कॉलनी" सांगितले आणि जरा मागे रेललो.
ही माझी नोकरी लागल्यानंतरची पहिली दिवाळी. साहजिकच सर्वांसाठी काहिनाकाही घेतल्यामुळे बॅग्ज जड झाल्या होत्या. खड्ड्यातून उसळणाऱ्या ऑटोतही त्यांना सांभाळणे कठिणच होते.
भाग पहिला इथे वाचता येईलः http://www.maayboli.com/node/20354
गोंधळलेली शामा काकांच्या पाठोपाठ दिवाणखान्यात आली.
.........................................................................................
माझा हा कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटला याच्या अभिप्रायाच्या अपेक्षेत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संध्याकाळचे तिरपे ऊन त्याच्या चेहर्यावरून मागे सरळ सावली पाडत होते.
त्याचे लक्ष दूरवर होते आणि त्याच्या पांढर्या शर्टाच्या पाठिवर
त्याच्या सावलीपेक्षा गडद रंगात त्याचे नाव लिहिले होते. त्याची नजर
स्थिर होऊन आता फक्त लांबून जवळच्या अंतरावर फ़ोकस होत होती. अंतर
झपट्याने कमी होत होते आणि त्याचे हाता-पायांचे स्नायू हळूच ताठरत होते.
ट्रेनच्या रुळांवर मधोमध ऊभे राहून समोरून येणार्या गाडीच्या हेडलाईट
कडे बघताना अगदी तसेच होते.
हेडलाईट हळूहळू मोठी होत जाते, श्वास आत घेतला जातो. आतापर्यंत स्थिर
असलेली नजर इतरत्र पाहुन घेते. अंतर आत नाममात्र राहिलेले असते. घ्यायचा