आक्काताईची ओळख हा एक पुसला गेलेला अनुभव आहे. एक मात्र खरे की मी तेव्हा ७वीत असेन आणि आम्ही घर बदलून नव्या घरी राहायला गेलो.एकदा सरकारी नळावर (त्याला तेथे चावी म्हणतात) पाणी भरत असताना आक्काताईने मला हाळी घातली .. ए पोरा हिकडं ये. नवीन आलास व्हय गल्लीत ? मी आपले होय म्ह्टल आणि गप्प झालो. मला कळेना हिला कसे कळले मी नवीन आहे. ती फिस्स्कन हसली आणि म्हणाली म्या हतच रहातो .. त्या वैद्यबुवाच्या शेजारी.. ये दुपारी . मी थक्क झालो. कपाळावर मळवट.. नउवारी साडी.. गळा आणि हात ओकेबोके. पण सतत हसरा चेहरा. मी एकदा दुपारचा तिच्या घरी गेलो म्हटलं बोलावलो आहेच तर बघु तर खर.
भाग १ :-- http://www.maayboli.com/node/21817
त्यानंतर पुढे काय झाले त्यांना कळलंच नाही ,फक्त तिन्हीसांजेच्या भयाण प्रकाशात, ती मांजरे, तो चिंचेचा वृक्ष, त्यांची बंगली, आणि कोर्टाची इमारत भोवताली गरागरा फेर धरून नाचत आहेत एवढाच जाणवत होतं.
जाग आली तेव्हा ते बंगल्यातच होते. डोक भयानक ठणकत होतं. हनम्या समोरच उभा असतो, सोबत डॉक्टर दिलीप बिरुटे! हे इथे कसे काय? शेळ्क्यांना प्रश्न पडतो , ते उठायचा प्रयत्न करतात, पण अशक्तपणामुळे परत खाली कोसळतात,
हा हा उठू नका, झोपूनच राहा. , डॉक्टर सांगतात. 'डॉक्टर तुम्ही इथे? काय झालंय मला?' , शेळके विचारतात.
मला मोठी माणसं आजीबात आवडत नाहीत! मोठी माणसं म्हणजे आई,पप्पा,आज्जी,आजोबा(आमच्या मनीला मोठी बोलायचं की छोटी मला माहित नाही. ती उभी असली तरी माझ्यापेक्षा पण छोटी दिसते.पण आई म्हणते ती चार पिल्लांची आई आहे. पण आई कधी छोटी असते का? खरंच, काही समजत नाही ह्या मोठ्या माणसांना!) घरात सगळेच मला छोटी समजतात! म्हणुन मग आजपासुन मी मोठ्या माणसांसारखं वागायचं ठरवलंय.
एक उदास संध्याकाळ "नागरगोजे" गावावर उतरू लागली होती, गेल्या पंधरवड्यात अशा काही घटना तिथे घडल्या होत्या कि ते छोटंसं गाव चांगलंच हादरून गेलं होतं.
"चि. सुधीर, सौ. विद्या, अनेक आशीर्वाद.
आशा आहे की आत्तापर्यंत पोलिसाची चौकशी पूर्ण झाली असेल आणि माझ्या दोन ओळींची चिठ्ठीने त्यांचं समाधान झालं असेल. पण मी हे पाऊल का उचललं त्यामागचा हेतू तुम्हाला विस्तारानं सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुमचा हक्कदेखील. म्हणून हे पत्र.
माझा मोबाईल नंबर मी फ़ार कुणाला देत नाही, त्यामूळे तिने माझा नंबर माझ्या कुठल्यातरी मित्राकडून
मिळवला आला असावा. पण ते तिलाच विचारला आले असते, प्रत्यक्ष भेटीत.
तर असाच एका संध्याकाळी मला फोन आला. नावाची वगैरे खात्री करुन झाल्यावर, मला तिने भेटायची
इच्छा दाखवली. माझ्या कुठल्यातरी एका जून्या कथेबाबत तिला माझ्याशी बोलायचे होते. खरे तर मला
त्या कथेचे नाव अजिबात आठवत नव्हते, अंजली देशपांडेची कथा असेच ती म्हणाली.
मला नाही वाटत कि असे काहिसे नाव मी कुठल्याही कथेला दिले असेल. त्या काळात नूकत्याच कथा
वगैरे लिहायला सुरवात केली होती, पहिल्यांदा जसे सगळेच अनुकरण करत असतात, तसेच मीही त्या
ही रूढ अर्थाने कथा आहे की नाही हे मी सांगू शकणार नाही... तिला आपण शोकांतिका म्हणू शकतो... पण आम्हा मित्रांच्या दृष्टीने ती अजून संपली नाहीये... ही सत्यकथा आहे मात्र खरं...
सूकापूर, सुकापूर असे कंडक्टर ओरडला आणि मी तंद्रीतून जागा झालो. सामान आधीच पोहोचले होते.
त्यामूळे माझ्याजवळ आता फक्त एक बॅगच काय ती होती. घर शोधावे लागलेच नाही, रेडकर न्यायला
आलाच होते.
"येवा, येवा मास्तरानू, बरा असा मा ?" अगदी तोंडभरून स्वागत झाले. त्याच्या गावाला माझी बदली
झाली हे जणू त्याच्या ईच्छेप्रमाणेच झाले, असे त्याला वाटत होते.
प्रथमदर्शनी तरी गाव छान वाटले. तसे मुंबईपासून फार लांब नाही आणि गजबजाटही नाही. इथली
शाळापण अशीच असू दे, म्हणजे गावात निवांतपणे राहता येईल.
"चालत जाउचा का रिक्षा करुची मास्तरानू ?" रेडकराने विचारले.
मायबोलीवर लिहिलेली हि माझी पहिली कथा.(कथा या निकषात बसतेय का ?) कदाचित जून्या मायबोलीवर अजून असेल. त्या काळात युनिकोड नव्हते. आम्ही शिवाजी फाँट्स वापरायचो, त्यामूळे ती कथा आता वाचायला कठीण जाते.
साधारणपणे पहिले लेखन असते तशीच ही आत्मकथा. यातल्या सर्व घटना खर्या. यातला हिंदीचा अतिरेक कदाचित खटकेल, पण मूळ संवाद जसे घडले तसेच लिहिलेत.
या घटना परदेशात घडलेल्या. त्या काळात मोबाईल, केबल टिव्ही वगैरे काहीच नव्हते. कथेतील कुटूंबाशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे तूरळक संपर्क होता, पण मग तो पारच तूटला. त्या काळात हि कथा लिहिलेली.