एकोणचाळीसाव्यावर्षी तिला तिच्या बारावीच्या सर्टिफिकीटची गरज लागली.एका डिप्लोमासाठी.अर्हता बारावी.पुढे पदवी मिळवली असली तरी बारावीचं सर्टिफिकीट मस्ट. विद्यापिठाचा नियम.पदविकेची दोन वर्ष होत आलेली.पुढचं वर्ष शेवटचं.आत्ता संस्थेनं सांगितलं, आणून द्या लवकर नाहीतर खरंच प्रॉब्लेम होईल.एफ वायचं आहे,एस वायचं आहे,टी वायचं तर आहेच पण बारावीचंच पायजे!आणि ते तर नाही! गेलं कुठे? त्याच्या छायांकित प्रति आहेत. पण त्या नाही चालत. ओरिजनलच पाहिजे!
शांत चेहेरय़ाच्या वसुधा अल्मेडा.चर्चच्या बाकावर बसलेल्या.शनिवार संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर.त्यांचे दोन्ही हात पुढ्यातल्या डेस्कवर कोपरापासून उभे.दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफलेली.हनुवटीचं टोक गुंतलेल्या त्या पंज्यांवर अलगद टेकवलेलं.नजर आधीच शांत.त्या नजरेत अस्पष्टशी दैवी चमक.नेहेमीप्रमाणे त्यांचे डोळे लागलेले चर्चमधल्या संगमरवरी मूर्तीकडे.मेरीआई आणि तिच्या कडेवरचा गोंडस येशू.खाली, जमिनीवर उतरू बघणारा.ह्या मूर्तीमुळेच हे चर्च वसुधा अल्मेडांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसलेलं.
डॉक्टर ड्राईव्ह करत होता एका मेंटल असायलमकडे.एका वर्दळ नसलेल्या रस्त्याने.रहदारी नसलेल्या वेळी.अशा शांत वेळी त्याच्या मनात ते दृष्य वारंवार प्ले होई.सगळा पट मनात फिरताना त्याला अजिबात आवेश चढत नसे.आवेग येत नसे.मॅटर ऑफ फॅक्टली-वस्तुनिष्ठपणे ते सगळं त्याच्या मनाकडून पाहिलं जाई.ही चित्रफित त्याला जाणीवेच्या पलिकडे ढकलणं सुतराम शक्य नव्हतं म्हणून ते पाहिलं जाई आणि प्रत्येक वेळी आपण यापेक्षा वेगळं काय केलं असतं हीच भावना मनाला व्यापून राही.दरवेळी दुजोऱ्याच्या अनेक वेगवेगळ्या पैलूंची ग्वाही मन देत राही.निर्विकार असणं आणि ही चित्रफित लागल्यावर पैलू उलगडणं ह्या व्यतिरिक्त भरपूर व्याप,प्रॅक्टिस,पेशं
"साssलाss ! ही रात्र नेहमी काळीच का असते बे?" वैतागलेल्या सुन्याने एकदाचे तोंड उघडले.
"अबे पहाट गुलाबी असते ना, म्हणुन रात्र काळी..., हाकानाका!" पक्या खुसखुसला.....
"गपे, उगाच फालतू जोक्स मारु नकोस. साला इथे बुडाला रग लागलीये बसुन बसुन. तुझा तो वाघ काही येत नाही पाणी प्यायला आज. आ़ज दिसायची शक्यता कमीच वाटतेय मला. बहुतेक निर्जळी अमावस्या दिसतेय त्याची." सुन्या करवादला.
खळदहून परिंच्याला आज पालखी निघालेली होती. इतिहासात पहिल्यांदाच! असे कधी झालेले नव्हते आधी! खळदची ग्रामदेवी काळूबाई अत्यंत कडक! ती आणि परिंच्याच्या आपल्या बहिणीकडे म्हणजे म्हाळसाईकडे? हे कसे काय झाले?
त्या रस्त्यावर जी काही किरकोळ वाहतून असायची तीसुद्धा खोळंबत होती. चक्क दिडशे लोकांचा जमाव चाललेला होता. मध्यभागी पालखी! पुढे एक ढोल आणि दोन ताशे! त्याच्या पुढे टाळ कुटत जयघोष करत जाणारी काही माणसे! सगळ्यात पुढे काळूबाई अंगात आलेल्या खळद गावातील काही सुवासिनी! त्या बेभान नाचत होत्या. पालखी आठ जणांनी खांद्यावर पेललेली होती.
पहाटेचे पाच-साडेपाच झाले असतील तोच मोबाईल खडखड करत वाजू लागला.
"व्हुज धिस बास्टर्ड"
"ए जाड्या, मी आहे, शमी"
"पांडवांनी ढाल लुटली की काय"
"हे हे हे, आज नाही चिडणार मी, आज म्हण हवे ते"
"आयचा घो तुझ्या, झोपू दे, उगी डोक्याला का वात आणतेस?"
"ऐ ऐक ऐक ऐक.." अगदी काकुळता स्वर.
"बोल.."
"पक्या गेला.."
"कुठे?"
"गया वो, बाल्कनी का टिकट कटवाके"
"ए म्हशे, का खोबरं करतेस झोपेचं, मस्त सकाळ खराब केलीस साली"
"ए ऐक, पक्या गेला आत्ताच थोड्यावेळापुर्वी, ही इज नो मोर"
"व्हाट?"
"येस, मिहिरनेच दिली ही गोड न्युज"
"ये मुर्ख मुली, काहीतरी काय बरळतेस त्या सिंध्याला सोबत घेऊन? अन् यात गुड न्युज काय?"
कोशातून बाहेर येण्याची धडपड करत असताना ते एकदा नवीन विश्वात आले . त्याला हवं असलेले ते विश्व होत . इथे येण्याची इच्छा तर सगळी जण करत असतात मग ते का नाही करू शकत .त्याच्याकडे पण काही स्वप्न होती . कोशात असताना पाहिलेली . ती पूर्ण करायची उर्मी त्याच्या अंगात पण होती .
त्याने अगदी साधी सोपी स्वप्न बघितली होती .
उंच आकाशात उडायचं ..........
सुंदर सुंदर फुलांबरोबर मैत्री करायची ......
बागडायचं ......
आणखी काही काही .......
त्याची ती स्वप्न पूर्ण होतील ???
का ,,,,,,,,,,,,,
झकास पैकी हळवा-डींकाचे लाडू खाऊन,आणी बेबीला आईकडे सोपवून शांत झोप /डुलकी घ्यायची तिची ऐष लवकर्च संपली. तिचे आई वडील भारतात परत गेले.
आता घरात फक्त ती ,छोटया आणि छोट्या पेक्शा फार लहान नसलेलं बाळ्. बाबा चे ऑफीस,आणी परत पार्ट टाइम कॉलेज चाललेले.सगळा दिवस "थाम्ब माझ्या बाळाना आंघोळ घालते..थांब माझ्या बाळाना कपडे घालते..थाम्ब माझ्या बाळाना जेवू घालते...." सारख्या चिउताइसारखा भूर उडून जायचा.मोठ बाळ रडायचं..आता आई वेळ देत नाही म्हणून आणी छोट्याला रडायला काही कारण नसायचं..
(वाचकांच्या विनंतीवरून हा भाग नेहेमीपेक्षा मोठा टाकत आहे.)
त्या मुख्य एक्सेल फाईलचा पासवर्ड तीच्या वडीलांच्या नावाचा होता पण फक्त स्पेलींगमध्ये थोडा फेरफार केलेला होता तो आईने तीला सांगितला होताच!
फक्त चकीत करणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या फाईलमध्ये ज्या इतर सिडीजची, तारखेवार विविध प्रकारच्या फाईलसची जी लीस्ट होती, त्यांचे पासवर्ड समोरच्या कॉलममध्ये लिहिले होतेच पण प्रत्येक फाईलचा पासवर्ड डेव्हील्स स्क्वेअर या शब्दानेच बनलेला होता आणि फक्त त्यात विविध अंकांची योजना केली होती.
एका निबिड जंगलातून तो धावत सुटला होता. समोरचं काही दिसत नाहीये, कुठे जातोय कळत नाहीये ... पण एकच गोष्ट ठाऊक आहे की इथून कसंतरी बाहेर पडायचयं ..... त्याने आपल्याला गाठायच्या आत. मागून आवाज येतोय का? की त्याचंच हॄदय त्याच्या छातीच्या पिंजर्यावर धडका मारतय? पायात पेटके येतायत ... त्राण कमी कमी होतय. पण निश्चय करून जीवाच्या आकांताने तो पळतोय. आणि मुठीत धरून ठेवलेली ती वस्तू????? दचकून त्याने ती पुन्हा चाचपून पाहतोय, तिच्याभोवतीची बोटं अधिकच घट्ट झालीत. ही वस्तू आपण किती शिताफीनं हस्तगत केली त्याच्या हातून पण मग त्यामुळेच तर तो खवळला. आता आपण त्याच्या तावडीत सापडून चालणारच नाही.