कथा

लिहिण्यास कारण की

Submitted by चिन्गुडी on 31 January, 2011 - 12:48

वॄंदावन वॄध्दाश्रमातला आजचा दिवसही रोजच्या सारखाचं होता, तेच हास्यक्लबचे लोक येऊन खोटं खोटं हसायला लावत होते, तेच काही निरुत्साही वृध्द पेपरचा रवंथ करत बसले होते, कोणी रोजचा तोच तो नाश्ता चिवडत होते, तेच रोजचे कर्मचारी येऊन साफसफाई करताना सगळ्यांच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत होते. शेवटी वृंदावन हा एक पॉश लोकांचा वृध्दाश्रम होता, तीथे फक्त हाय प्रोफाईल लोकांनाच प्रवेश होता, आणि तसही सर्व सामान्यांना तीथली फी परवडणं ही शक्य नव्हतं.

गुलमोहर: 

कवडी

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 31 January, 2011 - 07:31

दिवस मावळायला लागला तशी छातीत धड्धड सुरू झाली. आजकाल रोजच असं व्हायला लागलं. मन काही ताळ्यावर राहत नाही. मधेच छातीत कळ मारल्यासारखं व्हायचं. सगळ्या अंगातून एक शिरशिरी उठून जायची. बाहेर अंधार वाढू लागला तसं मन उदास होऊ लागलं. ठकीचं आई , भूक लागली, भूक लागली असं गाणं सुरु झालं. स्वयंपाक होत आला होता.

तसं म्हटलं तर आमचा राजा राणीचा संसार. ठकी, मी आणि हे. ठकीनंतर आमच्या घरात पाळणा हलला नव्हता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अनुभूती (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by सुपरमॉम on 30 January, 2011 - 23:17

टी व्ही वरच्या चित्रपटातला गलका एकदम वाढला तशी मला दचकून जाग आली. हातातला रिमोट केव्हाच गालिचावर गळून पडला होता.एकाच कडेला इतका वेळ झोपल्याने मान अवघडून दुखायला सुरुवात झाली होती.
सोफ़्यावरून पाय हळूच खाली घेत मी स्लिपर्समधे सरकवले. आळस कसा अंगात भरून राहिला होता.केसांचा हलकासा सैलसर अंबाडा बांधून घेत मी स्वैपाकघरात आले.
मायक्रोवेव्ह च्या घड्याळात एक वाजत आला होता.
'अजून आला नाहीय हा. आज काय ऑफ़िसमधेच झोपणार आहे वाटतं.....'

गुलमोहर: 

नाती (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by सुपरमॉम on 30 January, 2011 - 22:47

ओसरीवर चपला काढून ठेवत मास्तर जुईच्या वेलाखाली ठेवलेल्या बादलीकडे गेले. थंड पाण्याचे दोन तांबे पायावर घेतल्यावर उन्हाची तलखी थोडी कमी झाली. तेच पाणी घेऊन त्यांनी चेहरा, हात स्वच्छ धुतले. आता त्यांना बरीच हुशारी वाटू लागली.जवळच पाटावर ठेवलेल्या पंचानं तोंड पुसून ते ओसरीवर थोडे टेकले.
तोच हातात पन्ह्याचा पेला घेऊन सुमतीबाई बाहेर आल्या.
'दमलात ना हो? आज खूप तापली होती उन्हं. मला काळजीच वाटत होती...'

'छे, काळजी कशाची?' विमनस्क सुरात मास्तर म्हणाले.त्यांचा ओढलेला सूर ऐकूनच आजही पगार झाला नाही हे न सांगताच कळलं सुमतीबाईंना.

गुलमोहर: 

आधार (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by सुपरमॉम on 30 January, 2011 - 21:16

घराचा दर्शनी दरवाजा उघडून रसिका आत आली. केसांवर, ओव्हरकोटावर पडलेले बर्फ़ाचे कण तिनं अलगद झटकले अन कोट नीट कपाटात लावून ठेवला. एक नजर आपल्या सुरुचीपूर्ण सजवलेल्या दिवाणखान्याकडे टाकतानाच तिच्या ओठांच्या कोपर्‍यात हसू उमटलं. बाहेर विलक्षण थंडी होती. शिकागोमधला हिवाळा म्हणजे अगदी नकोसा होत असे. अशा जीवघेण्या वातावरणात, कामावरून थकून आल्यावर विसावायला इतकं सुरेख घर आपल्याला आहे याचा थोडा अभिमान, थोडा आनंद तिच्या मनात तरंगल्यावाचून राहिला नाही.

जिन्याखाली पायातले बर्फ़ाचे बूट काढून ठेवत ती वर जायला निघाली, तोच हेमलचा किनरा आवाज अन भरतचं हसणं तिच्या कानावर पडलं.

गुलमोहर: 

बेरीज - वजाबाकी (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by सुपरमॉम on 30 January, 2011 - 21:01

एक मायबोलीकर मैत्रिण नि बहीण या दोघींनी सुचवल्यावरून जुन्या मायबोलीवरच्या कथा इकडे घेते आहे.

एक सफ़ाईदार वळण घेऊन रवीची गाडी गावाकडच्या रस्त्याला लागली. धुळीचा मोठा लोट उठला अन शेजारी बसलेल्या नीलीमाचा चेहेरा चांगलाच त्रासिक झालेला त्याच्या नजरेतून सुटला नाही. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. समोरच्या आरशातून तो तिचं बारीक निरीक्षण करू लागला. रस्ता अगदी शांत होता. मधूनच एखादी गाय नाहीतर बकरी चरत असलेली दिसे. तेवढीच काय ती वर्दळ. त्यामुळे रमत गमत गाडी चालवण्याची चैन तो सहज करू शकत होता. अन त्यामुळेच की काय, नीलीमाकडे निरखून बघणंसुद्धा त्याला जमत होतं.

गुलमोहर: 

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २

Submitted by रणजित चितळे on 28 January, 2011 - 08:26

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला................ वाचा २० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग १)

गुलमोहर: 

.

Submitted by संदीपसमीप on 27 January, 2011 - 09:31

कथा लिहावी म्हणतोय. मग कथाच लिहू म्हणाले...
तर, जर कथा लिहावी तर, [{(तर, आधीच वापरलाय याच वाक्यात तरी परत) आणि असेही नविन काय लिहायचे?} मुळात लिहायचेच का?] कथेला कथा तर असायला पाहिजे. मग कथेची कथा लिहू म्हणाले.
मग लिहावेच म्हणतोय.

DISCLAIMER:- या कथेत कोणीही मरत नाही. जगत असल्यास तशी शक्यता नाकारता येत नाही. कथेला सुरुवात नाही. शेवटाची शक्यता नाही. कथेची कथा लिहिली तरी त्यात कथा असेलच असे नाही. नायक आणि नायिका प्रेमात पडतात आणि पडल्यावर उठायचा कंटाळा येतो म्हणून पडून राहतात असा खुळचट प्रकार करायचा नाही तरी तो होणारच.

One more before we hit the road...

गुलमोहर: 

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू

Submitted by रणजित चितळे on 24 January, 2011 - 09:19

(१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिर्घकथा : जलजीवा (भाग- ९ , १० आणि ११)

Submitted by निमिष_सोनार on 22 January, 2011 - 08:49

(भाग ९)

......हताश अ‍ॅना पुढे वाचत होती:

रात्र शांत होती. जहाजावर काही प्रवासी होते आणि काही भाग माल वाहून नेण्यासाठी राखून ठेवलेला होता. प्रवाश्यांपैकी बहुतकरुन लोक हे श्रीमंत लोक होते. काही हौस म्हणून तर काही संशोधनाचा भाग म्हणून तर काहींना आपल्या काहीजण जलमार्गे काही सोन्याच्या, जुन्या किमती तसेच कर चुकवून आणलेला माल वाहून आणण्यासाठी आणि लपवून ठेवण्यासाठी वापर करत. अनेक अवैध धंदेही चालत जहाजावर. आपण भले आणि आपले काम भले या न्यायाने मी तेथे होतो.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा