दिर्घकथा : जलजीवा (भाग- ९ , १० आणि ११)

Submitted by निमिष_सोनार on 22 January, 2011 - 08:49

(भाग ९)

......हताश अ‍ॅना पुढे वाचत होती:

रात्र शांत होती. जहाजावर काही प्रवासी होते आणि काही भाग माल वाहून नेण्यासाठी राखून ठेवलेला होता. प्रवाश्यांपैकी बहुतकरुन लोक हे श्रीमंत लोक होते. काही हौस म्हणून तर काही संशोधनाचा भाग म्हणून तर काहींना आपल्या काहीजण जलमार्गे काही सोन्याच्या, जुन्या किमती तसेच कर चुकवून आणलेला माल वाहून आणण्यासाठी आणि लपवून ठेवण्यासाठी वापर करत. अनेक अवैध धंदेही चालत जहाजावर. आपण भले आणि आपले काम भले या न्यायाने मी तेथे होतो.

पोटापाण्यासाठी या मोठ्या जहाजावर प्रवास करावा लागत असे. मी ही त्यापैकीच एक. पोटापाण्यासाठी जहाजावर काम करणारा एक टेलीकॉम इंजिनियर. तसा मी जलप्रवासाची आवड असणारा एक हौशी जलप्रवाशी ही आहेच. आम्हाला सहा सहा महिने फॅमिली पासून दूर रहावे लागते....

.....आता मी हे घरी आल्यानंतर लिहीत आहे.

यातला काही भाग वापरुन मला वर्तमानपत्रांमध्ये लिखाणही करायचे आहे.
सामान्य वाचकांना सगारातली अदभुत रहस्ये सांगायची आहेत म्हणूनसुद्धा मी हे विस्तृत स्वरुपात लिहून ठेवत आहे....

मात्र लिखाणाचा काही भाग फक्त ठरावीक महत्त्वाच्या लोकांपर्यंतच जावा अशी माझी इच्छा आहे. ....

तो महत्त्वाचा भाग मी "हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स" या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे.
तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे.
तसेच "स्टेटस ऑफ द वॉटर: अ बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो" यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे.......असो.

तर मी काय सांगत होतो... त्या रात्रीबद्दल.
ती रात्र. जहाज साऊथ जॉर्जिया कडे जात होते.
हाडे गोठवून टाकणारी थंडी. सगळे काही सुरळीत चालले होते.
रात्र झाली. त्या रात्री माझी ड्युटी होती..माझे केबीन जहाजाच्या कॅप्टनच्या केबीनजवळच होते.
माझ्या केबीनमध्ये इतर इंजिनियर्स सोबतच मीही असे.
समोरच्या मोठ्या स्क्रीनकडे बघून जहाजाच्या रडार यंत्रणेद्वारे येणारे सिग्नल नियंत्रीत करणे हे माझे काम, वेगवेगळे कंट्रोल पॅनेल्स असलेल्या बोर्ड वर वेगवेगळ्या की होत्या.

तशी आधी मनात भीती होतीच. साऊथ जॉर्जिया जवळ थोडे खाली दक्षिणेकडे असलेल्या चौकोनी आकाराच्या बेटाचा आणि आसपासचा भाग जो डेव्हिल्स स्क्वेअर म्हणून ओळखला जातो, त्याबद्दल ती भीती होती. आतापर्यंत ऐकून होतो त्या भागाबद्दल.

तसे त्या बेटाचे नाव कागदोपत्री - जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड असे आहे. त्या बेटावर जंगल आणि मोठमोठे पहाड आहेत. त्या पहाडांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील मातीचा रंग हिरवा आहे....

सर्व सुरळीत होते. मी शेजारच्या इंजिनियरला सांगून कॅप्टनच्या केबीन मध्ये गेलो. तेथे कॅप्टन शी ओळख असल्याने मी त्याच्याशी गप्पा मारल्या.

नंतर, आम्हाला समोरच्या काचेतून दूरवर समुद्रावर एक तरंगणारा बर्फाचा मानवी आकार दिसला. काळ्याशार समुद्रात तो तरंगणारा मानवी आकार. कॅप्टनच्या मदतनीसाला आम्ही थोड्या वेळाकरता जहाजाचा कंट्रोल देवून आम्ही दोघे पळत जावीन डेकवर गेलो तर आम्हाला जे दृश्य दिसले त्यात दूरवर समुद्रात अनेक बर्फाच्या बनलेल्या मानवाकॄती दूर असलेल्या आणखी एका जहाजाचा पाठलाग करत होत्या. डेकवर इतर कुणी नव्हते.

त्या आकृती नंतर जहाजावर चढल्या आणि मग ते जहाजच तेथून क्षणात दिसेनासे झाले....
हा अद्भुत प्रकार बघून क्षणभर आमचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही.....
घडलेला प्रकार आम्ही कुणाला सांगितला नाही.......
थोड्याच वेळात पाण्यावर छोटछोटे हिमनग तरंगत होते. आणि आधी पाहीलेले ते तिथे नव्हते....

ते जहाज गेले? कुठे?
योगायोगाने आम्ही वाचलो....की अजून धोका पुढे यणार आहे?

कदाचीत हा भास असेल तर....?

तसे आम्ही त्या डेव्हिल्स स्क्वेअर च्या हद्दीत शिरणार नव्हतोच.....

पण त्या जहाजावर आलेले काही हौशी प्रवासी जे जीव धोक्यात घालून त्या डेव्हिल्स स्क्वेअर च्या हद्दीत जाणार होते, अशांबद्दल मी एका रात्री सहज म्हणून डेकवर फिरण्यासाठी गेलो असता ऐकलं होतं.

त्यांनी सर्व तयारी केली होती. तसे सगळे ऐकीव असल्याने कुणी कायदेशीरपणे त्या भागावर जाण्यास मज्जाव केलेला नव्ह्ता. पण, तरीही विषाची परीक्षा कोण घेईल? पण, ते चार लोक आले होते. विषाची परिक्षा घेण्यासाठी. नुसती परीक्षा घेवून थांबण्याचा त्यांचा मानस नव्हता तर, ते त्या विषाला आव्हान देणार होते. देवोत.

साऊथ जॉर्जिया. सुंदर ठीकाण!

मी पहिल्यांदाच जात होतो. तेथे सहा दिवसांचा हॉल्ट होता आणि परत यायचे होते.

ते चार जण तयारीला लागले होते. त्यांची नावे होती - सॅम, जेन, मॅट, केट.

जेन आणि केट या दोन्ही मुली सुद्धा साहसा साठी तयार होत्या. त्या सर्वजणांनी जहाजावरचीच एक छोटी नाव भाड्याने घेतली होती आणि त्याद्वारे ते सहा दिवसात परत येणार होते. माझी त्यांच्याशी काही दिवसांपूर्वी जहाजाच्या स्वीमींग पूलवर ओळख झाली होती. त्या पैकी दोघेच होते त्या दिवशी स्वीमींग पूलवर. केट स्विमींग ड्रेसमध्ये खुपच छान दिसत होती. त्याच स्विमींग ड्रेस सह ती कॉफी प्यायला बसली होती. ती आणि मॅट हे दोघे कॉफी घेत असतांना मी जवळ बसलो होतो. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मी त्यांना त्याबद्दल विचारले.

केट म्हणाली, " होय. मी मूळची कॅनडातली. मला अशी सागरी साहसे करायला आवडतात. मी आणि मॅट लहानपणापासूनच मित्र. नंतर कॉलेजमध्ये आमची ओळख सॅम आणि जेन शी झाली. तेसुद्धा असेच साहसी."

मॅट. ब्राऊन कोट आणि ब्राऊन सूटातला मॅट. केट-मॅट. अगदी शोभून दिसणारी जोडी.

मॅट पुढे हसत म्हणाला, "आणि हो, आम्ही सुट्ट्या एंजॉय करायला सोबत येथे आलोय. या जहाजाच्या कॅप्टन च्या ओळखीने आम्ही यथे आलो आहोत. तर म्हट्लं येथे असलेल्या त्या "स्क्वेअरमधल्या डेव्हीलशी" बघावं दोन हात करून. कुणी म्हणतं की त्या डेव्हीलस स्क्वेअर मध्ये असलेल्या एका बेटावर एका दुर्मिळ धातूंचा खजिना दडलेला आहे.

कुणी म्हणतं तेथे दुसर्‍या महायुद्धात लुटलेलं सोनं आहे. काही म्हणतात की तेथे चाचे असतात आणि एका बेटावर त्यांचं एक पूर्ण शहर आहे. त्यामुळे तेथे कुणी येवू नये आणि सोने, धातू कुणी घेवू नये म्हणून या भागाबद्दल तशा अफवा पसरवल्या आहेत."

मी म्हणालो, "नाईस टू मीट उ. यु ऑल आर इंटरेस्टींग गाय्ज."

ते चौघं गेले. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसे त्या दिवशी वादळ घोंघावत होतं. पण त्या चौघांनी त्या साहसाची जय्यत तयारी केली होती, ते थांबणार नव्हते.

"काही रहस्ये सापडलीत तर मलाही सांगा बरं का धमाल चौकडी!"

ते बोटीतून निघून गेले. मी सहज म्हणून आकाशाकडे पाहीले असता मला आकाशात ढगांमध्ये चमकणारे डोळे दिसले. आकाशात एक विद्रुप काळा चेहेरा छद्मीपणाने हसत माझ्याकडे बघत होता. मला पुढे येणार्‍या कसल्यातरी संकटाची चाहूल लागली. मी देवाची प्रार्थना करुन त्या चौघांचे रक्षण करण्यासाठी मागणी मागीतली....

(भाग १०)

.... सहाव्या दिवशी परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी दुपारी चार वाजता, किनार्‍यावर बेशुद्धावस्थेत केट सापडली. तीच्यावर उपचार केल्यानंतर कॅप्टन शी बोलतांना मी म्हणालो,

"सध्या तर ती संभ्रमावस्थेत आहे. काही बोलत नाही आहे. पण आपण ऐकतो त्याप्रमाणे त्या बेटांवर जलजीवा वास्तव्य करून असतात. तेथे आलेल्या मानवांवर हल्ला करून ते त्यांना "मानव्-जलजीवा" बनवतात आणि आपला टोळीत सामील करतात. ते मरत नाहीत. त्यांना कसे काबूत आणायचे हे अजूनपर्यंत कुणालाही कळले नाही असे म्हणतात. ते स्वतःला पाणी, बर्फ, वाफ, ढग या सर्व रुपामध्ये पाहीजे तेव्हा रुपांतरीत करून घेतात. मी एका पुस्तकात हे वाचले आहे. मी त्यांना हे सांगितले सुद्धा होते. पण त्या चौघांनी ते हसण्यावर नेले....मला वाटते या सर्वांसोबत असेच काहीतरी घडले असले पाहीजे.
आणि आपण दोघांनी त्या रात्री बघीतलेले ते हिमनग? तो भास नसावा असे वाटते...."

कॅप्टन : "या सगळ्या कल्पना आहेत किंवा नाहीत हे नक्की सांगता येत नाही, असे मला वाटते. पण, काहीतरी गूढ आहे हे नक्की. तीला बरे वाटल्यावर आपल्याला कळेलच. "

केट बरी व्हायला आठवडा गेला.

तीने त्यानंतर आपला जो अनुभव आम्हाला सांगितला तो भयानक होता. कल्पनातीत होता."

यापुढील भाग फाईल नं. २ मध्ये. त्याचा पासवर्ड - डेव्हील्स स्क्वेअर- ९०९९२"

हे सर्व वाचतांना अ‍ॅनाच्या डोळ्यासमोर ती सतत फोटोत पहात असलेल्या आपल्या वडीलांचा चेहेरा तीला दिसला. तीला रडू आले. तीचा मोबाईल वाजू लागला.

अमोलः "अ‍ॅना. धीस ईज अमोल."

अ‍ॅना: "यस. अमोल. टेल मी."

अमोलः "अ‍ॅना, वि आर व्हेरी पॉझीटीव्ह टू फाइंड अमेया. बट वी रिक्वेस्ट यू टु कम डाऊन टू इंडिया. वी ऑल वांट टू मीट यू. आम्हाला तूला भेटायचे आहे. तू इकडे ये म्हणजे तुझी दोन्ही दु:खे हलकी होतील.

आपण सर्व मिळून अमेय ला शोधूयात. "

अ‍ॅना: "......"

अमोलः "वी नो. यु आर अपसेट. इफ यु टेक सम टाईम ऑफ अ‍ॅण्ड कॉल अस बॅक अ‍ॅण्ड लेट अस नो युर डिसिजन. सुटी घे आणि भारतात निघून ये. आम्ही तुझी वाट बघत आहोत."

अ‍ॅना: "थॅन्क्स....मे बी लॅटर आय वील टेल यू......आईची शेवटची इछा टिच आहे...अमेया शी लग्ना..... मी येईन... ठरवून सांगते...बाय!!"

आकाशात दोन डोळे अ‍ॅनाच्या खिडकी कडे पाहून हसत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता आंघोळ करायचे ठरवून अ‍ॅना बाथ-टब मध्ये गेली.

अंगावरचे सगळे कपडे काढून ती टब मध्ये बसली. डोक्यात अमेयचाच विचार सुरू होता. गरम पाण्याचा शॉवर हातात धरून ती सगळी कडे फिरवत होती....

मग तीने शॉवर तोंडासमोर धरला. शॉवरचे सगळे थेंब तोंडावर आदळत होते.

शून्य मनाने ती शॉवर बाथ घेत होती. तीने डोळे बंद केले होते.

.......शॉवर मधले थेंब हळू हळू एकत्र यायला लागले.
एकत्र येवून येवून मोठमोठे थेंब व्हायला लागले. ते थेंब एकत्र येवून त्या थेंबातून चेहेरा तयार व्हायला लागला. तीने अचानक डोळे उघडले. समोर पाणी सदृश्य अमेयचा चेहेरा होता. तीला वाटले भास असेल. तीने पुन्हा डोळे बंद केले.

समोर अधांतरी हवेत पाण्यापासून अमेय तयार होत होता, तो तयार होवून बाथरूमच्या भिंतीवरून ओघळत ओघळत वरच्या दिशेला गेला आणि पाणी-सदृश्य अमेय आता बाथरूमच्या वरच्या भागाला चिटकलेला होता.

तीने डोळे उघडताच त्याला छतावर पाहून ती किंचाळली. तो अमेय उर्फ जलजीवा तीच्या कडे पाहून गूढ हसत होता. अमेय? आता? इथे? जलजीवा? बाबांनी लिहिलेले ते वाचल्यामुळे आपल्याला भास तर होत नसेल?

अचानक तीच्या डोक्यात प्रकाश पडला. अमेय मला सांगायचा ती स्त्री.... त्याला भेटली होती. ते जंगल. ती अचानक गायब झालेली स्त्री. बाबांनी लिहिल्याप्रमाणे जहाजावर हल्ला करणारे ते जलजीवा... त्यातही एक स्त्री असायची....

आणि हा समोर? कोण? अमेय? तो तर भारतात आहे. येथे कशाला येईल तो?

ती किंचाळताच तो अमेय पूर्ण माणूस बनू लागला, त्याने तीच्या अंगावर उडी मारली. ती पटकन बाजूला झाली.

तो टब मध्ये पडला. पुन्हा पाणी झाला. त्यामुळे तीला दिसला नाही.

बराच वेळ ती स्तंभित होवून हा सगळा प्रकार बघत होती. त्यानंतर बराच वेळ बाथरूम मध्ये कुणीही नव्हतं.

भास झाला असे समजून ती तशीच बाथरुम च्या बाहेर गेली. तीने कपडे घातले.

ती फारच भेदरलेली होती. पटापट तयार होवून तीने एक ऑमलेट बनवले. ते खाल्ले. कालपासून काही खाल्ले नव्हते.

जेफ ला तीने घडलेला प्रसंग सांगितला. जेफ हसू लागला.

त्याने सल्ला दिला, "हे बघ अ‍ॅना. अमोल म्हणतो त्याप्रमाणे तू इंडीयात का निघून जात नाहीस? तुझ्या वडीलांनी जरी तसे लिहिले आहे तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळे ऐकीव माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे तो तुला भासच झाला असेल. तु इंडियात जा. त्याच्या घरच्यांना भेट. आणि अमेयने तूला सांगितलेल्या त्या स्त्री बद्दल म्हणशील, तर अमेय ने तुझी गम्मत सुद्धा केली असूऊ शकेल गं. डोंन्ट वरी! "

अ‍ॅना: "ठीक आहे जेफ. तेच बरे राहील. मी आज सुट्टी साठी अर्ज करते. आणि जाते निघून इंडीयात. पण माझ्या वडीलांचे लॅपटॉप आणि सर्व सिडीज? त्या सुद्धा सोबत घेवून जाव्या लागणार...."

जेफः "इट्स योर चॉइस. डु अ‍ॅज यू फिल राईट. चल बाय. काही मदत लागली तर सांग! "

जेफ निघून गेला.

विचारात असतांनाच अ‍ॅना ट्युब मध्ये चढली.

तीने सगळी परिस्थीती समजावून सांगितल्यानंतर काही दिवसांची सुट्टी तीला मिळाली. तीने त्याच दिवशी रात्रीची फ्लाईट बुक केली.

अमोलला तीने भारतात येत असल्याचे कळवले.

संध्याकाळी घरात शिरताच घरात सगळीकडे पाणीच पाणी होते. ते तीने काठी असलेल्या स्पंजने पुसले. अगदी सगळी कडेच पाणी होते. कपाटावर, टेबलवर....

ती जायची तयारी करू लागली.

दोन मोठ्या लगेज बॅग्ज आणि स्वतः जवळ विमानात ठेवायच्या दोन छोट्या बॅग्ज अशा चार बॅग्ज तीने घेतल्या. जवळच्या एका बॅग मध्ये लॅपटॉप आणि सर्व सिडीज चा बॉक्स.

(भाग ११)

रात्री जेफ ने अ‍ॅनाला फोनवरून निरोप दिल्यानंतर टीव्ही लावला. एक पोलीस अधिकारी भर रस्त्यावर पाण्यावरून पाय सटकून खाली पडलेला दिसला. तेथे लोकल न्यूज चॅनेलची टीम आलेली होती.

वार्ताहर सांगत होती:

"आता एक अजब घटना घडली आहे. एक पाण्यासारखा दिसणारा मानव आता येथे होता....

या पोलीसाला एक अजब अनुभव आला आहे. एक पाण्यासारखा दिसणारा माणूस हातात काहीतरी घेवून पळत होता. सुरुवातीला पोलीस हबकून गेला. तो मानव अधून मधून बर्फ बनून काचेवर आदळत काच फोडत होता....

पण नंतर त्याने त्या पाणी-मानवाला गोळी मारली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो पाणी मानव पुन्हा माणुस झाला आणि पळायला लागला. त्या पाणी मानवाने पोलीसावर हल्ला केला, तो त्या पोलीसाच्या नाकातोंडात जावू लागला आणि शेवटी त्या पोलीसाने त्या पाणी-मानवाचा नाद सोडला आणि त्या पाण्यावरून तो सटकून पडला.

तोपर्यंत तो पाणी मानव वाफ बनून हवेत उडाला आणि ढगात जावून विविध आकारात रुपांतरीत होवून पळून गेला...."

जेफ आश्चर्यचकीत होवून हे बघत होता. त्याने अ‍ॅनाला कॉल लावला....अ‍ॅना नॉट रीचेबल होती......

विमानातल्या प्रवासात अ‍ॅनाला झोप लागली नाही. तीने तो लॅपटॉप काढला आणि फाईल नं. २ वाचू लागली.

केट चा अनुभव त्यात लिहिला होता.

" आम्ही चौघं मोठ्या उत्साहाने निघालो. आम्हाला तब्बल सहा दिवस मिळणार होते. आम्ही पुढे जावू लागलो. आमच्या एकूण दोन मिनी नाव- बोटी होत्या. पहीले बेट अगदी जवळच होते. सहा दिवसांत या डेव्हीलस स्क्वेअर मधली असतील नसतील ती सगळी बेटं आम्हाला पालथी घालायची होती. पाणबुड्याचे पोषाक सुद्धा आम्ही बरोबर घेतले होते. आम्ही होतोच असे साहसी. आम्हाला थांबवणारे तिथे कुणीही नव्हते. मॅट मोठ्या उत्साहात होता.

आम्हाला लवकरच पहीले बेट सापडले.

त्यावर आम्ही उतरलो. बोटी किनार्‍याला लावल्या. एवढे झकास बेट आणि लोक काय नसत्या अफवा पसरवत असतात.

बेटावर अनेक हिरवे पहाड आणि त्या बाजूला एक जंगल.

खाणे पिणे आटोपल्यानंतर आम्ही दुपारचे थोडे पहुडलो. आम्ही सर्व तेथल्या जंगलात गेलो.

जंगल मोठे अद्भुत. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी. त्यांची शूटींग केल्यानंतर संध्याकाळी आम्ही दुसर्‍या बेटावर जाण्याचा प्लान बनवत होतो.

पण, दिवसभर थकल्याने तंबू ठोकून तेथेच आराम करून उद्या सकाळी निघण्याचा बेत ठरला.

रात्र झाली. सॅम, जेन, मॅट सगळ्यांचा डोळा लागला. मी मात्र रात्रीच्या आकाशातल्या चंद्राकडे बघत पहुडले होते. मी मॅट्ला माझ्या बाहुपाशातून हळूच बाजूला केले आणि सहज आकाशाकडे बघत लोळत पडले.

आमचा तंबू किनार्‍यापासून फार लांब नव्हता. रात्रीचे आकाश थोडे विचित्र दिसत होते. आकाशात विविध आकारांच्या ढगांच्या आड चंद्र लपाछपी खेळत होता.

एक काळा ढग अचानक आपले आकार बदलू लागला. अमीबा या प्राण्यासारखे वेडेवाकडे आकार तो करू लागला. तो ढग नंतर पाणी होवून समुद्रावर खाली पडू लागला.

मी उठून बसले आणि आश्चर्याने बर बघत राहीले.....

काहीतरी भास झाला असेल असे वाटून मी ते विसरण्यासाठी थोडे चालायला लागले तोच अंधार्‍या किनार्‍यावर फेसाळणारी पांढरी लाट हळूहळू आपला आकार बदलू लागली. तीने माणसाचे रूप घेतले आणि तीने सरळसरळ तीघे झोपले होते तेथे हल्ला चढवला. एका लाटेने आमची एक नाव हातात धरून उलटीपालटी करून टाकली आणि सॅमच्या गळ्याभोवती ती स्वतःला गुंडाळून घेवू लागली, हळूहळू तीने सर्वांच्या अंगाभोवती विळखा घातला. त्या लाटेने तिघांना समुद्रात ओढून घेतले.

मग काही वेळ समुद्रात मला दिसले की एक बर्फाळ पांढरी पाणियुक्त स्त्री लाटांवर उभी होती अन मग गायब झाली...
काही वेळानंतर एक लाट माझ्या मागे यायला लागली तशी मी या प्रकाराने भेदरून जावून पहाडांच्या दिशेने पळू लागले......

समोरून अमीबाच्या आकारचे पाणी त्या जख्ख काळ्या अंधारात, चंद्राच्या अंधुक प्रकाशात वेडेवाकडे नाचत माझ्या पुढे येत होते.

मी पुन्हा किनार्‍याकडे पळाले.
अमीबाच्या आकाराचे ते पाणी माझेकडे येवून माझ्या अंगावर चढू लागले. एक अमीबा-पाणी गरम तर एक अगदी थंडगार लागत होता. मी किंचाळले... बचाव म्हणून मी खालची माती उचलून समोरच्य अलाटेवर फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
पण काहीच फरक पडला नाही.लाटेने मला उंच उचलले. आणि पुन्हा किनार्‍यावर आदळले....
थोड्यावेळाने शुद्ध आल्यावर सगळे शांत होते. मग मी कशीबशी बोटीला तरंगून समुद्रात जावू लागले....
.... त्यानंतर मी डोळे उघडले ते साऊथ जॉर्जियाच्या किनार्‍यावरच. "

"मोठा अद्भुत अनुभव आहे." अ‍ॅना स्तंभित होवून वाचत होती.....

ती पुढे वाचू लागली.

वडीलांनी पुढे लिहीले होते:

"या अनुभवावरून मला कळून चुकले की जलजीवा आहेत आणि ते आहेत तर त्यांना नियंत्रीत करण्यासाठी किंवा नाहिसे करण्यासाठी कुठेतरी काहितरी नक्कीच असणार.

त्यानंतर अनेक दिवसांनी रॉबर्ट गॉडमन याचेकडून मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी ते सगळे "हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स" या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे. तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे. असो. तसेच "स्टेटस ऑफ द वॉटर: अ बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो" यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे.......असो."

पुढचे न वाचताच अ‍ॅनाला अचानक काहीतरी वाटले आणि तीने सिडीजचा बॉक्स उघडून पाहीला. त्यात नेमकी ती सिडी नव्हती.......ज्यात जलजीवांना कंट्रोल कसे करायचे ते लिहिले होते!!!

विमान मुंबईत धावपट्टीवर उतरले.
विमानतळावर अमोल, अरविंद आणि अमेय ची आई असे सगळे होते.
अ‍ॅनाला प्रत्यक्ष प्रथमच ते तिघे बघत होते.
पुढे गाडीतून ते सर्व घरी आले.
जुजबी बोलणे झाल्यावर ... ती थकव्या मुळे झोपली.
सकाळी सकाळी जेफचा कॉल आला.
अ‍ॅना: "हा जेफ, आय रिच्ड सेफली... "
जेफ : "अ‍ॅना... तू म्हणत होतीस ते खरे आहे.... इकडे एक जलजीवा सापडला आहे.... चॅनेल्स वर च्या अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार जलजीवा पुन्हा जागॄत झालेत्....आंटार्टीका खंडाजवळच्या डॅव्हील स्क्वेअरवरून ते जगभरात हळूहळू पसरत आहेत आणि आपल्या साध्यासाठी ते अनेक माणसांना "मानव्-जलजीवा" बनवत आहेत... टी.व्ही बघ."

... काही वेळानंतर थोडक्यात सगळी हकिकत सगळ्यांना सांगितल्यानंतर अ‍ॅनाने टी.व्ही. लावला.
सि. एन. एन. वर न्यूज येत होत्या.....

"दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही ठीकाणी असे जलजीवा दृष्टीस पडले होते....असे काहीजण सांगत होते...
पण आता ते पुन्हा परत आलेत....वॉटर्-डीमन्स आर बॅक!"

( क्रमश: )

गुलमोहर: 

हा आता कसं!! Happy
मला तर हॉलिवुडचा एखादा एलियन चित्रपट बघतेय असं वाटुन राहिलय. Happy फारच उत्कंठावर्धक!!

निमिष,

वाचतोय, छान वेग येतोय आता कथेला, असेच मोठे भाग येउदेत आणि वि.पु. तल्या मेसेजबद्दल धन्यवाद Happy

अमित अरुण पेठे

काही कारणास्तव पुढच्या भागांना थोडा उशीर होणार आहे. आपल्याला होणार्‍या गैरसोयीबद्दल क्षमस्व!!