कथा

दिर्घकथा : जलजीवा (भाग- २)

Submitted by निमिष_सोनार on 3 January, 2011 - 10:47

दिर्घकथा : जलजीवा (भाग- २)

अ‍ॅना हॉफमन. वय वर्षे २६. गोरीपान ब्रिटीश तरूणी.
दिसताक्षणी कुणालाही भुरळ पडेल अशीच.
अंगाने भरलेली आणि आजच्या आधुनिक जमान्यातील परफेक्ट फिगर असलेली.
तीची आई भारतीय आणि वडील ब्रिटीश. अ‍ॅना लहान असतांनाच वडीलांचा मृत्यु झालेला. वडील जहाजावरील टेलीकॉम इंजिनीयर होते. आईने त्यानंतर लग्न केले नाही.

एकाकीपणा दूर करण्यासाठी आणि थोडेफार पैसे मिळवण्यासाठी तीने लायब्ररीयन म्हणून जॉब पत्करला होता.

अ‍ॅना एन. एच. एस्. मध्ये डॉक्टर. लंडनला असताना एकदा रिपोर्टींग करता करता अमेय जखमी झाला होता.

गुलमोहर: 

बोका - नांव तुझंच होणार...

Submitted by बेफ़िकीर on 3 January, 2011 - 08:18

पहिल्यांदाच असा प्रॉब्लेम झालेला होता. बोक्याला त्याने केलेली चूक भोवली होती. नगर राहुरी रोडवर पोलिसांशी पंगा घ्यायला नको होता. आता औरंगाबादचेच नाहीत तर सर्व पश्चिम महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये खबर होती की बोका हाती सापडून पळून गेलेला आहे. चौकशीआधीच पळून जाणे हा गुन्हा असल्यामुळे आता बोक्याला पकडण्याचे समर्थनीय कारण त्यांना मिळालेले होते. आणि त्यामुळेच बोका अस्वस्थ झालेला होता. लवकरात लवकर डिपार्टमेन्टमध्ये एक चांगला कॉन्टॅक्ट निर्माण करणे ही त्याची गरज बनलेली होती. त्या दृष्टीने पावले उचलतानाच त्याची संभाजी बेके नावाच्या सबइन्स्पेक्टरशी जानपछान झाली होती.

गुलमोहर: 

खा गये ना धोखा !! (इन्स्पेक्टर, क्ल्यू दिलाय - भाग २ )

Submitted by Kiran.. on 1 January, 2011 - 13:30

( हा भाग वाचण्याआधी आधीचा भाग इथं वाचावा
http://www.maayboli.com/node/22326 )

दादा माझी डायरी वाचतो.

आधी लपून. आता माझ्यासमोर.

मग फोनवर बोलत बसतो.

डोक्टरांशी बोलत असेल..

एकदा मी रिडायल केला होता.. घारी होती पलिकडं. मग पटकन ठेवून दिला.

माझ्या आत्महत्येचा किस्सा वाचून दादा घाबरला असेल.. पण तसं काही दिसलं नाही. घारीचा फोन आला होता. रात्री उशिरा डॉक्टरांचा फोन आलेला.. मीच घेतला होता आणि दादाला दिला होता.

डॉक्टर मला गूड नाईट म्हटले.

दोन दिवसांनी दादा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. माझी डायरी त्यांच्या टेबलवर होती.
दादाचं काम

याला ना काही कळत नाही.
छे

गुलमोहर: 

दिर्घकथा : जलजीवा (भाग- १)

Submitted by निमिष_सोनार on 1 January, 2011 - 03:53

दिर्घकथा : जलजीवा (भाग- १)

(ही एक काल्पनीक कथा आहे. इतर काही घटनांशी त्याचे साधर्म्य आढळल्यास तो योगायोग मानावा - निमिष न. सोनार)

लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला. असा एक कॉल ज्याने आपले आयुष्य खुप बदलणार आहे, आपले ते पूर्वायुष्य आपल्याला पुन्हा भेटणार आहे याची त्याला पुसटशीही जाणीव नव्हती.

गुलमोहर: 

इन्स्पेक्टर , क्ल्यू दिलाय !!

Submitted by Kiran.. on 31 December, 2010 - 11:52

मी ढ..!

ढ म्हणजे हे माझं नाव आहे. तसं शाळेतलं नाव काहीतरी होतं पण ते शाळेतच राहीलं आणि शाळेत मिळालेलं हे नाव मला चिकटलंय. माझं आडनाव ही ढ वरून ढमढेरे आणि ढ वरून मला ढेरी देखील आहे. माझा भाऊ म्हणतो घरात बसत नको जाऊ. ढेर वाढते.

मग मी काय करू ?

बाहेर तो माणूस ढोल वाजवतो.. ढम ढम ढम.

भावाला ऐकू येत नाही.
मला ऐकू येतं.

ढ शी माझं असं नातं आहे. मला ढोलाची भीती वाटते.

तर मी ढ ढमढेरे !

मी आणि माझा भाऊ इथं राहतो. तो माझी सगळी काळजी घेतो. पण तो जरा अती करतो. मी लहान नाही. आणि वेडा तर नक्कीच नाही.

मला वेडा म्हटलेलं आवडत नाही. ढ म्हटलं तर ठीक आहे. कारण आहेच मी ढ !

गुलमोहर: 

बोका - तुला नाही, मला शोधतायत...

Submitted by बेफ़िकीर on 30 December, 2010 - 01:41

नगरपाशी बोक्याने पुन्हा मोटारसायकलचा टॅन्क फुल्ल करून घेतला. बरीच रात्र झालेली होती. सगळे अंग ठणकत होते. थंडीने कुडकुडल्यासारखे होत होते. पण पाठीवरच्या एका रेक्झिनच्या पिशवीत असलेल्या अडीच लाखांची उब भरपूर होती. खिशातला सेल फोन ऑफ न करताच त्याने केव्हाच घोडेगावपाशी फेकूनही दिलेला होता. जुनेजा आणि सर्व जण आता औरंगाबादहून वारंवार त्या फोनवर कॉल देत असतील आणि कुणीतरी तो फोन कोणत्या टॉवरच्या रेंजमध्ये आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्नही सुरू केलेला असेल हे त्याला माहीत होते.

गुलमोहर: 

जादूचा पूल

Submitted by सुर्यफूल on 27 December, 2010 - 23:31

स्वरूपाचा आणि फ्लायओव्हरस् चा लहानपणापासुनच फार जिव्हाळ्याचा संबंध होता. तसं पाहिलं तर कोणतेही लहान-मोठे ब्रीज, नदीवरचे छोटे पूल यांचंहि तिला अनामिक आकर्षण होतं.

स्वरूपा लहान असताना त्यांच्या मुंबईतल्या घराजवळच एक फ्लायओव्हर होता. ‌ट‍ॅक्सीने येत जात असताना तिचे आई – बाबा मुद्दाम वाट वाकडी करून तिला त्या ब्रीजवरून घेऊन जात असत. ती जगाच्या पाठीवर कुठेही फिरून आली असली तरी ब्रीजवरून गेल्याचा आनंद काही वेगळाच असे.

गुलमोहर: 

आर या पार

Submitted by सुर्यफूल on 27 December, 2010 - 23:10

सोनाली आज ऑफिसच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी स्वतःशीच झगडत होती. कालच्या सुबिरशी झालेल्या भांडणाचे विचार काही केल्या तिच्या डोक्यातून जाताच नव्हते. तसं म्हटलं तर त्या दोघांमध्ये भांडण असं नव्हतच मूळी. कालच‍ं भांडणही तसं मूकंच होतं. जो काही झगडा होता तो तिच्या मनातच होता. नेहमीप्रमाणे तिने कालही मोकळेपणाने बोलायचा विचार केला होता पण वादविवाद टाळणारा सुबीर नेहमीप्रमाणे मौन धरून बसेल आणि ती एकटीच तिचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करेल असं वाटून तिनेही गप्पच रहायचं ठरवलं. सुबीर मुद्दाम गप्प राहिला कि कालच्या घटनेचं त्याच्या लेखी काही महत्वाच नव्हतं? सोनालीच्या मनाला शांत करणारं उत्तरच सापडत नव्हतं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बोका - लगेचच सुवर्णसंधी

Submitted by बेफ़िकीर on 27 December, 2010 - 03:16

संध्याकाळी आठ वाजता जुनेजांच्या जालना रोडवरील अवाढव्य बंगल्याच्या टेरेसवर एक गंभीर मीटिंग चाललेली होती.

स्वतः जुनेजा भेदक नजरेने सर्व आमंत्रितांकडे पाहात होते. जुनेजांचा पार्टनर कम मित्र कम सबकुछ असलेला लाल बेदरकार नजरेने सगळ्यांकडे पाहात मार्लबोरोचे कश मारत होता.

कुणाचाच खरे तर कुणावर विश्वास नव्हता. पण पर्यायही नव्हता भेटण्याशिवाय!

गुलमोहर: 

बोका - बिर्याणी मस्त होती हां???

Submitted by बेफ़िकीर on 24 December, 2010 - 05:24

"बोका पिसाळलाय"

या वाक्यावर मात्र मल्हाररावांनी हातातला ग्लास टीपॉयवर ठेवला आणि ते खदाखदा हसायला लागले.

शाळिग्राम डोळे जितके बटबटीतपणे विस्फारता येतील तेवढे विस्फारून मल्हाररावांकडे बघत होता. इतका वेळ शाळिग्रामला दम देणारे आणि त्याची बोलती बंद करणारे मल्हारराव अचानक हसायला लागल्यामुळे पवारही जोरजोरात हसायला लागला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा