"अबे यार ते क्वेश्चन पेपर्स असतील!" -निल्या.
"असतील काय, आहेतच! पण प्रश्न असा आहे की याला हे मिळाले कसे? काळे सरांना याने पटवलं कसं?" -मन्या.
"एक मिनिट, त्याच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स क्वेश्चन पेपर्सच आहेत याबद्दल आपल्याला खात्री नाहीये. असा फारतर आपण अंदाज बांधू शकतो." -सम्या.
"पण हा अचानक असा बदलला कसा? काहीतरी तर शिजतच असेल ना?" - रव्या.
"ते काही नाही, आत्ताच्या आत्ता त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्या घरच्यांसमोरच त्याला विचारू! साला एक घाव अन दोन तुकडे!" - मन्या.
"पवार, आण ती फ्लॉपी इकडे!" - करड्या आवाजात पाटील सरांनी पवारला फर्मावलं. पवारने गुमान ती फ्लॉपी सरांच्या हातात दिली. सर ती मोडणार इतक्यात सगळ्यांनीच कोरसमध्ये गलका केला,"प्लीज सर, मोडू नका ना ती फ्लॉपी! महाग येते हो! आता तर पैसेपण नाहीयेत!".
"लाज नाही वाटत! तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कॉपी करताय हे माझ्या लक्षात येणार नाही? हरामखोर आहात सगळे! आता बघतोच एकेकाकडे! नाहीतरी तुमचे बरेच मार्क्स आहेत माझ्या हातात!". पाटील सर काळेनिळे होत बोलले.
(भाग १३)
ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते-
.....परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते. त्या बेटावर त्यांचा खुप छळ केला गेला होता. विरुद्ध राष्टाकडच्या अधिकार्यांकडून, जवानाकडून!
पहाटे पहाटे उबदार रग मधून बाहेर सरकत ,आज्जीनी भक्तीभावाने खिडकीतून दिसणार्या उगवतीला नमस्कार केला. हलक्या हाकेशी दादा आजोबा उठले. सकाळ अजूनही धुक्याच्या दुलईत पहुडलेली होती. आंघोळीचे कपडे घेऊन आजी आजोबा पायात चपला सरकवून चालू लागले. हरिद्वारची हवा,सकाळ्,सारेच मंगल्! भर भर पावले उचलत, त्यांची जोडी गंगेच्या दिशेनं वेगात जाऊ लागली. किती वर्षे पाहिलेलं स्वप्न आज पुरे होत होते. दोघेही व्याकुळलेले- गंगास्नानासाठी !
'आत्या, मी कशी दिसतेय ग?...'
स्वत भोवती एक गिरकी घेऊन गौरीनं मान वेळावून सरलाताईंकडे बघितलं.
सायंपूजा करून घाईघाईत देवघराबाहेर येणार्या सरलाताईंनी जरा चमकूनच तिच्याकडे नजर टाकली.
'अगदी वहिनीची प्रतिकृती.... तेच रेखीव नाकडोळे, तसाच गोरापान रंग नि केसांचा भरदार पिसारा.....' त्यांच्या मनात आलं. न बोलता गौरी अशी समोर येऊन उभी राहिली असती तर आपल्या दिवंगत भावजयीच्या आठवणीने त्या क्षणभर दचकल्याच असत्या.
मोरपिशी रंगाची जरीची साडी,त्यावर शोभणारे नाजूक सुवर्णालंकार नि केसात माळलेलं एकच पांढर्याशुभ्र गुलाबाचं फ़ूल यात ती आज एकदमच गोड दिसत होती.
शरमिंदा
"जरा बाबांना बोलावतोस ?"
"व्हॉट ?"
"जरा तुझ्या बाबांना बाहेर बोलावतोस ?"
"ओsह हां हां डॅडना , ओ डॅड, अरे संकेत आत माझे डॅडी असतील त्यांना बाहेर बोलाव रे," राकेश म्हणाला.
" कोण आलय रे ? अरे तुम्हि ? या न आत या."
.................................................................
.........................................................................
भर दुपारची वेळ , उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत होती , सुर्य जणु आकाशातुन आग ओकत होता. वार्याची हलकिशी झुळुकदेखील उन्हाने भाजणार्या अंगाला सुखावत होती. आबा शेतावर गेलेला होता आणि राधाक्का मागे परसात चुलीवर जेवण बनवीत होती .
सगळं काही अलबेल असताना अचानक डोळ्यात पाणी येणं म्हणजे आपले बदललेले हार्मोन्स असे वाटे तेव्हा!दिवसागणीक वजन वाढत होते,पायावर किंचीत सूज आलेली.अजूनी तारीख लांब होती,पण अगदीच घाईला आले होते.खरे तर आईकडे जावेसे फार वाटे पण ती बरी नव्हती,तिचा रक्तदाब आणी मधुमेह या मुळे मीच तिला समजावलं होतं,आणी सासरीच राहीन बेबीच्या वेळी हे सांगीतले होते.
हे तेव्हा फिरतिवर असायचे,सासु बै खुप काळजी घ्यायच्या.पण मन लागत नसे, न झोप लागे न अन्न पचे.नकोच वाटे काही सुद्धा! शिवाय मी पुण्यात नवी,सासरची माणसे नवी. घरातली भाषाही नवीच.कोणी मैत्रिणी अजुनी झाल्या नवत्या. शेजारी पाजारी ओळखी झाल्या होत्या इतकेच.
टीव्ही वर जाहीर होत होते: वॉटर डिमन्स आर बॅक! पण अजूनपर्यंत मिडीयाला या प्रकरणाचे मूळ सापडले नव्हते.
नाफ्ट चॅनेल ने सुद्धा अमेयच्या गायब होण्याचा आणि या उद्भवलेल्या जलजीवाचा संबंध आहे असा संशय व्यक्त करणारा एक कार्यक्रम बनवला होता...
अॅना ला कळून चुकले की त्या दिवशी घरात अमेय कशासाठी आला होता?
जलजीवांना कसे कंट्रोल करायचे ही सिडी चोरण्यासाठी....
त्या दिवशी बाथरुम मध्ये भास झाला असेल असे समजून ती तशीच पळत पळत बाथरुम च्या बाहेर गेली होती. मग घाबरत घाबरतच ओल्या अंगासहच तीने कपडे घातले.