स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर
वेळ : साधारण रात्रीचे ८
अशीच एक रस्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ...
कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली
द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली ..
फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत..
गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment
आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .
"तु भारतात कधी येते आहेस ते कळव नक्की मला. मला तुझ्याशी खरचं बोलायचय" आदितीचा चौथा फोन आल्यावर मिताला आता खरचं काळजी वाटायला लागली.
"मी अगं पुढच्याच आठवड्यात पोचते आहे. आणि तुला कबुल केले तसे मी आल्या आल्या लग्गेच तुझ्याकडे येते आहे. पण आदिती काय झालय काय? घरात सगळे ठीक आहेत ना?"
आदिती थोडावेळ शांत झाली. "सगळे ठीक आहेत गं. पण मला तुझ्याशी महत्वाच बोलायचय". बास इतकेच म्हणून तिने फोन ठेवला. मिता भारतात येते आहे कळल्यानंतरचा हा तिचा चौथा फोन.
रात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.
पहिल्या भागाचा दुवा इथे मिळेल: http://www.maayboli.com/node/17258
...................................................................................................................
मी परत येइन : भाग १
फाट्यावर नेहमीप्रमाणे गाडी थांबली. दिरगुळे मास्तरांनी डाक ताब्यात घेतली. नेहमीप्रमाणे ड्रायव्हरबरोबर दोन शब्द बोलून आणि तंबाखुची चिमूट दाढेखाली दाबुन त्यांनी सायकलला टांग मारली.
"अहो...अहो काका, जरा थांबता का? हे कुठलं गाव आहे?"
एक नाजुक आवाजातला प्रश्न कानी आला. मास्तरांनी आवाजाच्या रोखाने नजर वळवली. एक २७-२८ वर्षाची सुस्वरुप मुलगी बसमधुन उतरुन उभी होती. पाठीवर एक ट्रॅव्हल बॅग अंगात जीन्स, शॉर्ट कुर्ता असा आधुनिक वेष...... !
तिने प्रसन्न हसुन दोन्ही हात जोडले.
एक मस्त शीळ वाजवली अभिनं... त्याचं स्वप्न पूर्ण व्हायला सुरूवात झाली होती.
S.P.Industries ला मात देणं हे जणू त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येयच बनलं आता.... orders मागून orders अभिकडं चालून यायला लागल्या...
"बस, Mr. S.P. आता बघालच तुम्ही R.M.Firms कसं तुम्हाला मात देईल ते..." अभि हसला आणि एक प्रकारचं छ्द्मी हास्य उमटलं त्याच्या चेहरयावर....
-----------------------------------------------------------------------------------
तांदळ्याला जाणारी एस.टी. तडवळे फाट्यावर थांबली. ड्रायव्हरने सीटखाली ठेवलेली डाकेची पिशवी उचलुन फाट्यावर उभ्या असलेल्या दिरगुळे मास्तरांच्या हवाली केली. मास्तरांनी हातावर मळलेली तंबाखु थोडी दाढेखाली दाबली, उरलेली ड्रायव्हरच्या हातावर टेकवली.
"कसं काय मास्तर, बरं हाय ना?"
"होय की, सगळं ठिक आहे सखारामदादा."
रात्रीचे सात वाजुन गेले होते. आज शनिवार उद्या सुट्टी म्हणुन मी काम संपवत होतो. काल पासुन रविवारच्या कामांच्या याद्या तयार होत होत्या. काही खरेदी करायची होती, नातेवाईकांना भेटायचे होते. शनिवार हा शनिग्रहाच्या नावाच्या साधर्म्य असलेला वार शनि या ग्रहाच्या मंदगती सारखा संथगतीने पुढे सरकत होता.
"Well Mr. जहागिरदार, आम्ही quality असल्याशिवाय बोलत नाही... तुम्हाला हवं तर तुम्ही हवी तिथे inquiry करू शकता, then go for an order..." सदाशिवराव पाटिल राग आवरून त्यांच्या ठेवणीतल्या नम्र स्वरात बोलत होते... त्यांचा स्वतःच्या company च्या goods quality वर खूप विश्वास होता... अर्थात कारणही तसच होतं... S.P.Industries च नाव सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं... त्यांचं वर्चस्व निर्विवाद होतं आत्तापर्यंत.... पण गेले काही दिवस एक नवीनच गोष्ट त्यांच्या समोर उभी राहिली होती.... R.M.Firms.... अर्थात ते R.M.Firms ला प्रतिस्पर्धी म्हणून कधीच पहात नव्हते.