पोलीस राइस

Submitted by मुरारी on 5 November, 2010 - 07:40

स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर
वेळ : साधारण रात्रीचे ८

अशीच एक रस्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ...
कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली
द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली ..
फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत..
गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment
आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .
शिवाय राती बेरात्री "land " होणाऱ्या विमानांचा ( अर्थातच बेवडे हो) विमानतळ म्हणा हवतर...
याच गाडीवरचा एक किस्सा ..

रात्र झाल्याने धंदा एकदम तुफान चाललेला , मालक घामाने डबडबून निघालेला, त्याचा "शेफ" चीनी तोतया (तो तर हवाच) मिचमिच्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघत संपूर्ण भात कढईतून वर एक दोन फूट उडवून परत कढईत
झेलण्यात मग्न ......
एकूण काय तर सगळा तसा सुरळीत नेहमी प्रमाणे
पण आज गाडीवर एक नवीन कामगार रुजू झालेला असतो....
पप्पू नाव त्याचं.. त्या चीनी तोतायाचाच भाऊ ,..... गोरागोमटा , मिचमिच्या डोळ्यांचा, असेल साधारण १३-१४ वर्षांचा , तो सुद्धा मुंबईची अफाट गर्दी बघून मजबूत बावरलेला, पहिलाच दिवस असल्याने त्याला फक्त पाणी आणि फडका मारायचं काम दिलेलं असतं. मालक मात्र, वेटर आणि कॅशीअर या दोन्ही आघाड्यावर लढत असतो..... शिवाय कोणी बिल न देता मागच्या मागे कलटी तर मारत नाहीये ना.. याकडे सुद्धा लक्ष देत असतो...
होता होता १० वाजतात , आणि त्याचं वेळी एक विमान मस्त आवाज करत land होतं.... तडफडत एका टेबलापाशी येऊन धडपडत..
येsssssss शिवा (मालकाचं नाव ) .....आज मस्त दो प्लेट "लालीपाप" खिला..
already विमानात एवढं "इंधन" असताना हा अजून किती खाईल असा विचार करून शिवा स्वताशीच हसतो.... आणि ओरडतो... "दो प्लेट लोलिपोप"... तोतया कामाला लागतो...
"आज में बहुत खुश हु सिवा डार्लिंग......... , आज उसे मार दालुंगा . साली.. मुझ्हे पैसे नही देती....... " असे काहीतरी बरळत विमान खिशातून बाटली काढून अजून प्यायला लागतं... बाकीच्यांचा मस्त timepass होत असतो...
तेवढ्यात त्याची प्लेट येते... पण पहिलाच घास खाल्यावर "ब्वां ssssssssss क " विमानातला सगळ इंधन त्या "लालीपाप " वर आणि आजूबाजूला उडतं.. सगळ्यांनाच किळस येते..
ते बघून अजून एक दोन बेवडे ओकतात .....
आता मात्र शिवा जाम वैतागतो..... ए उठाव इसको.. साले जमता नय तो क्यो पिताय इतना?
ए पप्पू ये साफ कर ले सब..... और बचा खाना वो दिब्बे मे दाल दे बहार मत फेंक .....
प्रचंड किळस आलेली असताना देखील पप्पू बिचारा ते सगळं साफ करत होता

हे संपतंय तोच .. सायरन चा आवाज ऐकू येतो.... एक जीप येऊन थांबते
शिवा च्या शिव्या परत सुरु होतात...पण मनातल्या मनात, कारण.. जीप मुंबई पोलिसांची असते .....
एक विद्रूप चेहऱ्याचा , पोट सुटलेला , असा हवालदार उतरतो....उतरल्या उतरल्या त्याच तोंड सुरु होतं.
ए भड* तुला काय हिंदीत सांगू काय ? आ? अब तक खान भेजा नाही चौकी पे? क्या रोज में लेनेको औ क्या?
भो**** बांबू टाकेन ........
गाडी उभी करायचीये न उद्यापासून इथे?
आज शेवटचा आलो इथे? समजदार बन जरा...

हा साब गलती हो गयी . आज जादा भीड था तो आपका special rice बनानेको time नाय मिला...
अभी १० मिनिट में पप्पू को भेजता... में ...

साब आज माफ कर देना....
त्यावर जरा हवालदार थंड होऊन परत ४- ५ शिव्या देऊन निघून जातो.....

आता शिवाचा दीनवाणा, लाचार झालेला चेहरा बदलला असतो , त्यात जणू सूड पेटलेला होतां...
साले रोज आके फोकटका खा जाते हे हरामी......
इनकी मां कि......
शिवाचा आवाज आता घोगरा होतो.... तो शांत स्वरात "तोतया" ला ऑर्डर देतो, चल अब police rice बना.. विथ २ प्लेट लेगपीस ...
तोतया सुद्धा आता छद्मी हसतो.. त्याचे मिचमिचे डोळे जवळपास बंदच होतात..
कोणाचं लक्ष नाही असा बघून, एक प्लास्टिक चा मोठा चमचा घेऊन तो त्या " कचऱ्याच्या डब्यात" खुपसतो.... जेवढा येईल तेवढा उरलेला राइस, नुडल्स , घेतो......
एका वेगळ्या कढईत तो सगळा माल टाकतो.... मस्त नवीन मसाला , आणि नवीन तडका देऊन .. सोबत तो मगासचे "तीर्थात" पावन झालेले "लेगपीस" सुद्धा टाकतो.....
हाच तो...... "स्पेशल पोलीस राइस"

पप्पू चाललेला प्रकार डोळे फाडून बघत असतो.....
त्याच्या डोक्यात पण प्रकाश पडलेला असतो, दिवसभराचे कष्ट विसरून त्याच्या गोड गुलाबी चेहऱ्यावर आता हसू उमललेले असते ..
धावत तो पार्सेल घेऊन समोरच्या चौकीत पळतो...

इकडे शिवा परत त्याच्या धंद्यात गर्क असताना तिकडे चौकीत......

साहेब : वा जाधव काय rice आहे. गरम गरम..... मजा आ गया..... साला फुकट खायची मजाच वेगळी आहे.....
जाधव : साहेब लेगपीस घ्या ना..... मजबूत दिलेत आज..... असा झापलाय त्या भड*ला ...
साहेब : आ? rice मध्ये लेगपीस कधी पासून द्यायला लागला?
जाधव : साहेब असं काय करता...... हा आपला पोलीस राइस हाये .....
स्पेशल पोलीस राइस.................

ता. क. :-

वरील घटना पूर्णपणे काल्पनिक असून वरील पात्रांचा वा कथेचा खऱ्या घटनेशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा Wink

गुलमोहर: 

कथा झानच. सध्या पोलिस फुकट खात नसावेत. त्या ऐवजी आपल्यासारख्यांकडुन ते वेळप्रसंगी जास्त पैसे खातात.

प्रसन्न अ!

आपल्या निरीक्षणाला दाद द्यावीशी वाटली. वर्णन परफेक्ट! मी स्वतः पाषाणच्या चौकात उभ्या राहात असलेल्या चायनीज गाड्यांपैकी एकीवरून चिकन लॉलीपॉप खाली पडल्यावर पुन्हा उचलून ठेवलेले पाहिले आहेत.

चांगली कथा! अभिनंदन! वरवर वाटायला अर्धवट वाटेल! पण यात अनेक गोष्टी कव्हर झालेल्या आहेत.

बालमजूर, अस्वच्छता, भ्रष्टाचार, शोषण वगैरे!

-'बेफिकीर'!

प्रफुल्ल आणि नितीन
मनापासून धन्यवाद.....

बेफिकीर.. आज तुमच्या कडून दाद मिळाली..............

बस मला दुसरं काहीही नको......

तुमच्या एकट्याची प्रतिक्रिया हि १००० प्रतिकिया आल्या सारखी आहे.....

मस्तच लिहिलंयस प्रसन्न अ..... सुरेख वर्णन आणि आपली चीड चांगल्या प्रकारे अभिव्यक्त झालीय. पुलेशु. Happy

या रस्त्यांवरच्या 'चायनीज' टपर्‍या आणि हातगाड्यांवर म्हणे, चिकन ऐवजी कबुतरांचं मांस देतात - स्वस्त पडतं म्हणून .... (ऐकीव माहिती)