नितिनचंद्र

धारा ३७० पर्याय काय आहेत ?

Submitted by नितीनचंद्र on 2 June, 2014 - 00:27

धारा ३७० या माझ्या http://www.maayboli.com/node/49176 धाग्याला वेगाने प्रतिक्रिया मिळाल्या. या प्रतिक्रिया ओमर अबदुल्ला सारख्या तिखट होत्या. तांत्रीक बाबींवर आधारीत होत्या. भाजपच्या अजेंडा म्हणुन हिणवणार्‍या होत्या. आक्षेपार्ह वाक्याचा निषेध करणार्‍या होत्या. ( माझ्या मुळच्या धाग्यावरच्या काही आक्षेपार्ह भाग वेबमास्टर ने संपादीत केला आहे ) यावर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे. माझ्या मते तो मुळ्चा भाग नव्हता. धारा ३७० च्या निमीत्ताने आलेल्या विषयाला अनुषंगुन ती एक टिप्प्णी होती.

ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलके

Submitted by नितीनचंद्र on 22 July, 2011 - 13:15

पहाता पहाता पुन्हा जुलै महिना संपेल. पाउस थोडासा ओसरेल आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत वेध लागतील स्वातंत्रदिनाचे.

काश्मिरमधल्या ठराविक सरकारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्येक्रमाशिवाय अन्य कोठेही तिरंगा दिसणार नाही. तिथल्या जनतेला त्याचे औत्सुक्य ही असणार नाही. काश्मिर शिवाय अन्य ठिकाणी जन्माला आलेल्याच काय काश्मिरातल्या नविन पिढीला सुध्दा हे माहित नाही की असे का ? त्यांना फक्त एकच शब्द माहित असेल स्वयंनिर्णायाचा अधिकार.

गुलमोहर: 

आताशा

Submitted by नितीनचंद्र on 7 November, 2010 - 22:34

आताशा मी तुझ्या प्रेमात आहे
दिसशील तु म्हणुन मी वाट पाहे

थांबेन मी तुला पाहण्यास तेथ
संकेत हा तु ही जाणुन आहे

नि:शब्द मी आणि नि:शब्द तुही
तरी लाजरा चंद्र काही बोलुच पाहे

मौनातले जग संवादी व्हावे
हळुवार ओठात तुझ्या शब्द यावे

वाटते तुझा हात हातात घ्यावा
हुंकार हा शब्द होकार व्हावा

दिशाहीन नौकेस किनारा दिसावा
नयनीचे स्वप्न ते सत्य व्हावे

गुलमोहर: 

कल्याणकारी राज्य

Submitted by नितीनचंद्र on 24 October, 2010 - 13:52

रात्रीचे सात वाजुन गेले होते. आज शनिवार उद्या सुट्टी म्हणुन मी काम संपवत होतो. काल पासुन रविवारच्या कामांच्या याद्या तयार होत होत्या. काही खरेदी करायची होती, नातेवाईकांना भेटायचे होते. शनिवार हा शनिग्रहाच्या नावाच्या साधर्म्य असलेला वार शनि या ग्रहाच्या मंदगती सारखा संथगतीने पुढे सरकत होता.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नितिनचंद्र