भारतमाता
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलके
पहाता पहाता पुन्हा जुलै महिना संपेल. पाउस थोडासा ओसरेल आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत वेध लागतील स्वातंत्रदिनाचे.
काश्मिरमधल्या ठराविक सरकारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्येक्रमाशिवाय अन्य कोठेही तिरंगा दिसणार नाही. तिथल्या जनतेला त्याचे औत्सुक्य ही असणार नाही. काश्मिर शिवाय अन्य ठिकाणी जन्माला आलेल्याच काय काश्मिरातल्या नविन पिढीला सुध्दा हे माहित नाही की असे का ? त्यांना फक्त एकच शब्द माहित असेल स्वयंनिर्णायाचा अधिकार.
भारतमाता
भारतमातेच्या पायांशी हिंदी महासागर आहे.
उजव्या हाताशी सिंधुसागर आहे.
डाव्या हाताशी बंगालचा उपसागर आहे.
शिरोभागी देवतात्मा हिमालय आहे.
हिमालयाच्या उत्तरेला असलेल्या विस्तृत पठारावर, मध्यभागी `मन: सरोवर' आहे.
मन: सरोवराच्या उत्तरेला कैलास पर्वत विराजमान आहे.
मन: सरोवराच्या पश्चिमेकडील रंध्रातून एक ओहोळ बाहेर पडतो.
ओहोळाचा ओढा, ओढ्याचा नाला, नाल्याची नदी होते.
उत्तुंग कड्यांवरून खोल, खोल दऱ्यांमध्ये उड्या घेत ती नदी पंजाबात उतरते.
त्या नदीचा आकार एवढा विशालकाय होतो की तिला `नद' म्हणू लागतात.
पुढे पंजाबातून वाहत, वाहत ती सिंधुसागरास मिळते.
हीच ती सुप्रसिद्ध सिंधू नदी.