आताशा

Submitted by नितीनचंद्र on 7 November, 2010 - 22:34

आताशा मी तुझ्या प्रेमात आहे
दिसशील तु म्हणुन मी वाट पाहे

थांबेन मी तुला पाहण्यास तेथ
संकेत हा तु ही जाणुन आहे

नि:शब्द मी आणि नि:शब्द तुही
तरी लाजरा चंद्र काही बोलुच पाहे

मौनातले जग संवादी व्हावे
हळुवार ओठात तुझ्या शब्द यावे

वाटते तुझा हात हातात घ्यावा
हुंकार हा शब्द होकार व्हावा

दिशाहीन नौकेस किनारा दिसावा
नयनीचे स्वप्न ते सत्य व्हावे

गुलमोहर: 

नितीनचंद्र-वाचली कविता .
थांबेन मी तुला पाहण्यास तेथ
संकेत हा तु ही जाणुन आहे

आवडली कविता. मनापासून !!

वाटते तुझा हात हातात घ्यावा
हुंकार हा शब्द होकार व्हावा >>> हे भारी आहे.. Happy

आवडली कविता Happy

मस्त Happy

आवडली Happy

झक्कास कविता......

<<आताशा मी तुझ्या प्रेमात आहे
दिसशील तु म्हणुन मी वाट पाहे

थांबेन मी तुला पाहण्यास तेथ
संकेत हा तु ही जाणुन आहे>> अप्रतिम.

मनापासुन आवडली कविता.....

वाटते तुझा हात हातात घ्यावा
हुंकार हा शब्द होकार व्हावा>>> वा!! मस्त!