बसनं इंदौर सोडलं आणि माझी झोप उडाली. ३० सीटर बसमध्ये २७ नंबरच्या सीटवर बसलेल्या आणि म. प्र. मधील रस्त्यांवर चालणाऱ्या बसमध्ये माणसाची परिस्थिती व्हॉलीबॉलसारखीच होते. मी अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्या घालत, हा व्हॉलिबॉलचा खेळ कधी संपतो, याची वाट पाहत होतो. शरीराने जरी मी बसमध्ये असलो तरी मनाने कधीचाच अमरावतीला पोहचलो होतो.
बर्याच दिवसांचं साचलेपण मनभर पसरुन राहिलेलं. तिने तसच स्वतःला रेटत यांत्रिकपणे सगळी कामं उरकली. रोजच्या शिरस्त्याने पुस्तक हातात घेऊन, काल ठेवलेलं खूणेचं पान उघडून वाचायला सुरुवात केली. जेमतेम एक पान संपवलं आणि अस्वस्थ होऊन पुस्तक तसच हातात ठेवून, डोळे मिटून मळभ दूर होण्याची वाट बघत खुर्चीत पडून राहिली.
फोनच्या रिंगने जाग आली, तेव्हा "आई गं!" म्हणत, खुर्चीच्या हातावर स्वतःच्या एका हाताचा जोर देत, दुसरा हात डोळ्यावर धरत वातावरणाशी अॅड्जस्ट होत ती उठली आणि इतका वेळ एकाजागी अवघडून झोपल्यामुळे पायाला आलेल्या मुंग्यांमुळे अडखळत फोनपाशी गेली.
समुद्राच्या किनाय्रावर गार वारा केसांशी खेळत तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. खडकावर उभी राहून स्वतःला सांभाळताना तिच्या प्रेमीचे अदृश्य हात तिला आकाशाकडे साद घालत होते. मागुन ऐकू येणारा वाद्यांचा कर्कश आवाज कानात घुमत तिच्या पायांमधे थरथर निर्माण करत होता. किनाय्राला लागून असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटा आदळत होत्या. मग तिची नजर ओळीत ठेवलेल्या दगडी शवपेट्यांवर गेली. प्रत्येक शवपेटी तिच्या मालकाची वाट पहात होती. मागून एकू येणाय्रा वाद्याचें सुर बदलले. अथांग समुद्राकडे पाठ करून ती तिच्या पतिच्या निर्जिव पार्थिव देह उचललेल्या सेवकांमागे चालू लागली.
सूचना:
[यापूर्वी ही कथा सहा भागात मी क्रमशः प्रसिद्ध केली होती.
वाचकांच्या सोयीसाठी आणि सलग वाचनाचा आनंद मिळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कथा आता सलग एकत्रीतरित्या
प्रसिद्ध करतो आहे.]
-----------------------------------
गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे!!!
--The Fortune Mirrors of Time Planets!!!
-----------------------------------
ही कथा सुरु होते २०२२ साली
दि. २२/०२/२०२२-
मंगळवार-
वेळ सकाळी चार
मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता
वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.
त्या दोघांचे कसे जमले कुणास ठाऊक...
कारण ती म्हणजे रिमझिम पावसाची सर
जिथे जाणार तिथे बरसणार्.......भेटेल त्याला चिंब चिंब करुन टाकणार
तर हा नेहमीच शांत राहणारा.....आपल्या मर्जिने वाहणारा वारा....
आपल्याच विश्वात दंग्......सभोवार कोण याचे भान न ठेवणारा...........
पण एक दिवस दोघे भेटले.....भेटले कसले आदळले........
आणि एक वादळ आले दोघांच्या आयुश्यात........
ती मनात म्हटली कसले हे ध्यान आयुश्यात कधी हसला असेल कि नाही देव जाणे.........तर तो आपला विचार करतोय कसली ही बावळट अजिबातच अक्कल नाही....कॉलसेंटरच्या लोकांसारखी सतत बड्बड्......तो जाम वैतागला होता....
'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'...
... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला...
आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो.
पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला.
’वृद्धाश्रम’... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला.
मायबोली वरच्या कथाबीज ३ साठी लिहिलेली ही कथा. तिथे ५०० शब्दांचे बन्धन होते त्यामुळे काहि गोष्टी नीट लिहिता आल्या नव्हत्या. म्हणुन परत लिहितेय. अशा प्रकारच्या कथेचा, भाषेचा हा पहिला प्रयत्न आहे. चुका असतील तर दाखवुन द्या.
मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, कपड्याचे दुकान, आईस्क्रीम
****************************
"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.
"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."
मीमी एका भरल्या कुटुंबातली मुलगी. ह्या कुटूंबाचा एक असा काही पत्ता सांगता येणार नाही. शोधले की कुणीही सांगेल. प्रत्येक पेठेत अशी घरे आणि घरा घरात अशी माणसे दिसतील. विविधतेत एकता म्हणा हवे तर! घरी आजोबा-आजी, बाबा-आई, लग्न झालेला मोठा भाऊ-वहिनी, त्यांचे छोटे बाळ, आणि ताई, असे मीमीचे भरगच्च कुटुंब. आजोबा, आजी, भाउ वगैरे नाती त्या त्या लोकांविषयी बोलतांना काही नावे द्यायची म्हणून दिलेली नावे. नाहीतर मीमीचे कोणाशी खास असे नाते नाही. नेहमी आपल्या आपल्यामधेच गुरफ़टून असते ती. मात्र ह्या सगळ्यांची मीमी ही एक अतिशय लाडावलेली मैत्रीण. अगदी वाया गेलेलीच म्हणा ना! पण नको. तसे नाही म्हणुया.
२०१२ साली सगळे जग नष्ट होणार असे माया सभ्यतेच्या लोकांनी सांगून ठेवल्यामुळे आणि प्रसार माध्यमांनी त्याला अवाजवी प्रसिद्धी दिल्याने सगळ्या जगावर भीती चे सावट पसरले होते. भूकंपांचे, ज्वालामुखींचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ते सर्वांना खरे होईल असे वाटत होते. २०१२ च्या त्या तारखेला मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. मात्र राहुलला भारतात उत्खननात सापडलेल्या त्या कालग्रहांच्या भविष्य आरश्यांवर दाट विश्वास होता. त्याचा वैज्ञानिक मित्र डॅन याने त्याला अमेरिकेत बोलावले. अनेक ज्योतिषी लोकांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांना गुप्ततेचे आव्हान केले गेले होते.
अस्वस्थ आई
प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येणारी कल्याणला जाणारी जलद लोकल आज प्लॅटफार्म क्रमांक चारवर येत आहे. स्टेशनवर घोषणा झाली रात्रीचे १० वाजत होते आधीच ट्रेनस् लेट त्यामुळे लोक आम्ही शिणलेलो...२ नंबरच्या फलाटावरची सगळी गर्दी यंत्रमानवाला आदेश झाल्यासारखी ४ नंबरवर निघली.पण दिपाली चरफडली. आणखी उशीर होणार. आज मी म्हटलं होत शशांकला लवकर येते म्हणून त्याने परीलाही पाळणाघरातून लवकर घरी आणली.. पण नाहीच जमलं..नेहमीप्रमाणे नाहीच जमलं. बॉसने अर्जंट मीटिंग बोलावली आणि पुढचं सगळे प्लॅनस् कोसळले. चील यार होता है...मी तिची तकलादु समजुत काढली. पण दिपुच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आलं.