मैत्री .....!!! तो अन ती दोघांमधली...!! भाग--२
ती..!!
एका शब्दात वर्णायचं झाल्यास "समंजस"...!! पण एका शब्दात वर्णन करुन "ती" वर जरा अन्यायच होईल नाही का...?
तर "ती"..!!
ती..!!
एका शब्दात वर्णायचं झाल्यास "समंजस"...!! पण एका शब्दात वर्णन करुन "ती" वर जरा अन्यायच होईल नाही का...?
तर "ती"..!!
स्त्री अन पुरुष ... का बरं देवानं अशी माणसाची दोन अधुरी रुपं साकारली असतील..? फार कुतुहुलाचा विषय आहे हा.. नाही..? देवानं बनवितानाच दोघांना अस अपरिपूर्ण बनवलयं.. की दोघंही एकमेंकाना पूरकच..!! म्हणतात जगात perfect असं काहीच नसतं..!!!
पण मला या जगात एक perfect दिसलं..!! काय..?
तो/ती "अर्धनटनारिश्वर"...!!
ज्याच्यात तो अन ती दोघं एकमेंकात परिपूर्ण सामावलेले..!!
कधी त्याचं ते कल्पनेतलं चित्र समोर येतं.. अन देवानं स्त्री अन पुरुष या माणसाच्या दोन जाती का निर्मिल्या याचं विश्वरुपी दर्शन होते..!!!
खिडकीबाहेर कोसळणारा वळीवाचा पाऊस. एक कंटाळलेली दुपार आळोखेपिळोखे देत जागी होतेय. चहाच्या गरम घोटागणिक आळसाचा एकेक वेढा गळून पडत होता. शॉपिंग, ट्रेकींग, पार्ट्या, पिकनिक, भेटीगाठी, सिनेमे, नाटक, भेळ, आईस्क्रीम, मस्तानी सगळ्यांनी ओसंडून वाहिलेली दोन महिन्यांची सुटी आता संपत आली होती. पुढच्या आठवड्यात कॉलेज सुरु होतंय. खरंतर कॅलेंडरवरची दोनच महिने पण परीक्षेच्या आधीपासून घेतलेल्या 'प्रीपरेशन लीव्ह' मुळे चांगली चार महिने अक्राळविक्राळ पसरलेल्या सुटीचाही वीट आलाय आता. कॉलेजमध्ये जाण्याचा उत्साहही नाही. आता काय करायचंय तिथे जाऊन?
पहीला- ए तुझी तर्,खुप झालं,आता गेलाच तू,
(पहीला वकिलाच्या आगांवर धावतो आणि त्याची कॉलर पकडतो,दुसरा त्याला हात धरुन मागे खेचतो)
दुसरा- ए थांब, थांब आज नको नंतर बघु ह्याला,साहेब म्हणाले की आधी प्रेमानी समजवून बघा,समजला तर ठीक्,नाही तर बघू म्हणे काय करायचं ते,आपलं काम आपण केलं,आता साहेब बघतील ह्याचं काय करायचं ते.
पहीला-ठीक आहे,पण ए वकिल्,तू सांभाळुन रहा रे,तू खुप अकड दाखवून राहीलास हं बघतोच तुला.
वकील- अबे जा जा,खुप पाहीलेत तुझ्या सारखे आपल्या साहेबांचे चपराशी,चल नीघ.
पहीला-चपराशी! चपराशी म्हणतो मला?
(परत आंगावर धावतो,वकिल ही उसळुन त्याला मागे ढकलतो,दुसरा पहील्या ला मागीए ओढतो)
रात्रीचा एक वाजला होता. सुमी आपल्या दुखर्या अंगावरील प्रत्येक वेदनेला तात्पुरते मनातून दूर सारत विजू या आपल्या ३ वर्षांच्या, मोठ्या मुलाला भज्यांच्या चुर्याचा घास अन पाण्याचा घोट एका आड एक देत होती. तो बावरून बाबांकडे, म्हणजे राशिदकडे बघत होता. राशिदने या हिंदू स्त्रीवर प्रेम बसल्यामुळे व तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या या मुलासकट बायको म्हणून स्वीकारले होते व सुमीलाही राशिद आवडला होता. पण हलाखीच्या परिस्थितीमुळे तिघेही यु.पी.मधून मुंबईला आले होते आणि गेल्या दोन वर्षात त्या दोघांना एक मुलगी झाली होती जिला आत्ता सुमीने पदराआड दडवून ठेवले होते. सुलताना!
चार आठवडे कसून अभ्यास करून संगीता इथले ड्रायविंग लायसेंस मिळवण्यासाठी आवश्यक असलेली लेखी परिक्षा पास झाली होती. भारतातले लायसेंस जर असेल, तर रोड टेस्ट देण्याची गरज नव्हती. फ़क्त लेखी परिक्षेत ९०%च्या वर गूण मिळवले पाहीजे हीच अट होती. आणि संगीताला अभ्यासाचा जणू तापच चढला. पुस्तक आणले आणि रात्रंदिवस तयारी करून तिने परिक्षा दिली. थोडेथोडके नव्हे चांगले ९८% गूण मिळवले. लायसेंस देणे हे जरी पुर्वी ट्रॅफ़ीक पोलीसांचे काम होते, तरी त्यांनी आता ते काम एजंट कंपनीला आउटसोअर्स केले होते. भारतीय लायसेंसचे इथल्या ड्रायवींग लायसेंसमधे रुपांतर करता येत होते.
आज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला नव्हता. लक्ष्मी म्हणजे माझी वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी असणारी, पण अतिशय बोलघेवडी, माणूसवेडी, अगत्यशील दाक्षिणात्य मैत्रीण! आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे तेवढीच अनौपचारिक!