कथा
झुंज भाग-४
राजुच्या सुखापुढे आता त्त्याच्या वडीलांना कुठले हि सुख मोठे दिसत नव्हते ,पुढे त्यांना जे योग्य वाटले त्यांनी तेच केले.कारन राजुत होणार्या बदलाला ते नाकारत शकु नव्हते.पुढे राजुला हि या मोकळया आसमंताचा आस्वाद हवा-हवासा वाटायला लागतो.तो हळु हळु घरा बाहेर पडायला लागतो.
खीर
तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.
---शब्द ...भाग ४....जयनीत दिक्षित--
दोन्-वकिल साहेब तुम्हीच आता सांगा तुम्ही ज्यान्च्या साठी एव्ह्ढा जीव टाकताय तुम्हाला काही कमी जास्त झालं तर ते काय करणार आहेत तुमच्या साठी?
वकिल्-ते काही करो वा ना करोत,अन मी हे काही त्यांच्या साठी करतच नाहीय्,हा माझा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्यात त्यानी काही करावं अशी माझी काहीही अपेक्षा नाही.
दोन- म्हणजे?
वकिल-हा माझ्या प्रोफेशनल एथीक्स चा प्रश्न आहे,त्यात त्यानी पडाव अशी माझी अपेक्षा नाही.ते माझं मी बघील्,अन त्यात त्यानीही बोललेलं मला आवडणार नाही.
दोन-म्हणजे तुम्ही आमचं ऐकायचच नाही असच ठरवलय तर?
वकिल-तसं समजा हवं तर.
माझा अपघात - सत्यकथा
ही घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे. सत्य आहे.
==========================================
२७ सप्टेंबर, २००५!
कंपनीच्या व्ही.टी. येथील ऑफीसमधून दुपारी दिड वाजताच काम संपवून मी लोकल ट्रेनने वाशीला आलो. वाशी येथील अमोल हॉटेलमधे माझे सामान व गाडी होती. चेक आऊट सकाळीच केलेले होते. हॉटेलवर येऊन दोन घास खाल्ले. साधारणपणे मी कुठेही निघताना एकदा वेळ चेक करतो, पण घड्याळ वापरतच नाही त्यामुळे मोबाईलवर चेक करतो. ३.२६ पी.एम.!
त्यावेळेस माझ्याकडे एक निळी मारुती ८०० होती.
----शब्द---भाग ३--जयनीत दिक्षित---
वकिल-आता तुम्हाला काय अन कसं सागांयच तेच कळेनास झालंय्.तुम्ही जे मला करायला म्हणताहात ते शक्यच नाही,आता कसं सान्गु.
दोन-अहो वकिल साहेब,काय शक्य नाही म्हणताय्,अहो केस तुमच्याच हातात आहे,तुम्ही काही कमी जास्त केलं तर कोणाला काही कळणार नाही,शेवटी गावचे अशिक्षित येडे लोक आहेत ते,त्यांना कुठे काय कळणार आहे?
वकिल-म्हणुन मी त्यांना फसवू ?काय बोलताय!
दोन-अहो त्यात काय जगावेगळं,मोठ्मोठे लोक करतात असं!
वकिल्-ज्यांना करायच असेल ते करतील्,मला मात्र हे शक्य नाही.
एक हुकलेला खून - एका गडावर....
कथेचे मूळ शीर्षक परेश यांच्या विनंतीमुळे बदलले आहे. मात्र इतर संदर्भ तसेच राहिल्याबद्दल क्षमस्व!
-'बेफिकीर'!
======================
जीवन - ५
विनिता शांतपने नोट्स काढ्त होती. स्वाती काहीच न सुचुन तास कधी संपतोय याची वाट पाहत होती. शेवटी एकदाची रिंग झाली व तास संपला. विनिताने सवईप्रमाने कॅफे गाठ्ला. स्वाती पन विनिताच्या मागे कॅफे मध्ये पोहचली. विनिता टेबलवर बसली होती त्याच टेबलवर स्वातीपन बसली. काहीही विचारण्याची तिची मनस्थिती नव्हती.
'तु अशी काहेस?' स्वातीने सरळ मुद्याला हात घातला.
'म्हनजे?'
'काल तु जे केलं, ते?'
'ते...., ते तर नॉर्मल होतं, एव्हडा विचार करु नकोस. झालं ते विसर आणि चल कामाला लाग. कॉलेज नंतर ऑफिसला पन जायायचं आहे.'
'पन....., तु....., मी तुझ्याशी कशी वागले, आणि तु..'
सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं :२: धना...
जगण्याच्या अविश्रांत प्रवाहाला जगण्याचे अगणित प्रवाह भेटतात.... काही अंतर आपल्यासोबत वाहत राहतात आणि एखाद्या वळणावर आपल्याही नकळत आपल्याला एकटं सोडून निघून जातात. जातात ना? भेटलेल्या प्रत्येकाचं स्मरण भुत होऊन आपल्याशी खेळत राहतं... कधी गालावर टपोरी खळी पाडतं तर कधी काळजावरच्या खपल्या काढून खदखदून हसू लागतं. पण त्या वेदनाही आपल्याला नाकारता येत नाहीत. आपण त्या नाकारत नाही... की आपल्याला त्या नाकाराव्याश्या वाटतच नाहीत?.... कधी कधी लिहीताना आनंदाच्या उकळ्या फुटतात... कधी समाधानाची परिसीमा होते....
हरवलेला षड्जं - ४ (जुन्या मायबोलीवर प्रकाशित)
कार्यक्रम संपल्यावर तर बरं वाटत नाहीये म्हणून निघूनही आला कुणालाच न भेटता. रंजनालाही काळजी वाटायला लागली होती. नेहमी दाद देऊन, प्रोत्साहन देत, अगदी साध्या साध्या कलाकारांनाही खुलवणारा अश्विन, एकदम गप्प गप्प होता. तिलाच गिल्टी वाटू लागलं, उगाच खेचून नेला त्याला म्हणून.
हे सगळं डोक्यातून काढायला, दुसर्या दिवशी अश्विनने रजा घेतली आणि रंजनालाही घ्यायला लावली. त्याचा बॉस, रव्या त्याचाच मित्र. त्याला फोन केला तर, ’टेल समवन व्हू केअर्स. अरे, मी ही आज ऑफिसात नाहिये.’
आणि मग बायकोसह रजा घेऊन करण्यासारखी तेवीस "कामं" त्यानेच सांगायला सुरूवात केली.... आणि अश्विनने हसत हसत फोन ठेवला.