विनिता शांतपने नोट्स काढ्त होती. स्वाती काहीच न सुचुन तास कधी संपतोय याची वाट पाहत होती. शेवटी एकदाची रिंग झाली व तास संपला. विनिताने सवईप्रमाने कॅफे गाठ्ला. स्वाती पन विनिताच्या मागे कॅफे मध्ये पोहचली. विनिता टेबलवर बसली होती त्याच टेबलवर स्वातीपन बसली. काहीही विचारण्याची तिची मनस्थिती नव्हती.
'तु अशी काहेस?' स्वातीने सरळ मुद्याला हात घातला.
'म्हनजे?'
'काल तु जे केलं, ते?'
'ते...., ते तर नॉर्मल होतं, एव्हडा विचार करु नकोस. झालं ते विसर आणि चल कामाला लाग. कॉलेज नंतर ऑफिसला पन जायायचं आहे.'
'पन....., तु....., मी तुझ्याशी कशी वागले, आणि तु..'
'काही नाही, जे झालं ते विसर लेक्चर सुरु होइल आता. चल आट्प'
स्वातीला काहीच समजत नव्हते. काय करावे, काय बोलावे, तिने सरळ विनिताचा हात धरला. काही बोलन्या पेक्षा तिला हेच सोपे वाट्ले.
विनितानी प्रक्षानार्थी नजरेने तिच्याकडे पाहीले. पन दुसर्या क्षणी स्वातीच्या डोळ्यात तरलेले अश्रु पाहुन विनिताला आता हसावे की रडावे ते समजत नव्हते. तास सुरु होण्याची बेल झाली होती. विनिताने स्वातीकडे पाहीले, कॅफेपन रिकामा झाला होता. उभी विनिता परत बसली व स्वातीला पन बसवले. स्वाती ताकद नसल्याप्रमाने धाडन खुर्चीत बसली. विनिताने हातावर हात ठेवताच स्वातीचा तोल गेला व रडु लागली. काय झालं हे पाहण्यासाठी पुठे आलेल्या कॅफेच्या वेटरला विनिताने हातनेच लांब राहण्याचा इशारा केला. वेटर पन मागे झाला. विनिताच्या डोळ्यातिल ते भाव पाहुन तो पन क्षणभर आवाक झाला. कारण इतक्या वर्शात कोणत्याही मुलीच्या चेहर्यावर तसे भाव बघितले नव्हते.
काही वेळानंतर भावनांचा वेग ओसरल्यावर स्वातीने स्वतः डोळे पुसले.
'सॉरी.., मला असं वागायचं नव्हतं,'
'मला माहीत आहे.'
'काय ? '
' दोन्ही, आगोदर पन आणि आताही '
'.....'
'चल दुसरा तास तर संपला आता तिसरा तरी अटेन्ड करुया.'
विनिताने जातानाच स्वातीला रात्री घड्लेल्या प्रकारा बद्द्ल कोणालाही न सांगण्याचे बाजावले. पण स्वाती ने जानले होते की विनिता जर रात्री तिला शोधत आली नसती तर जे घडले असते त्याचा विचारही स्वातीला करवतही नव्हता.
*****************************************************
त्या दिवसानंतर स्वाती एक गोष्ट समजली होती , ति म्हणजे विनिता म्हणजे तिची खरी मैत्रीन आहे. काहीही झाले तरी विनिताशी मैत्री तोडायची नाही हा निश्चय केला.
आता तर दोघींचा नित्यक्रम झाला होता. स्वाती विनितासाठी रोज डबा आने तर विनिता रोज तिला सोबत ऑफिसला घेऊन जाई.
आजही दोघी नेहमी प्रमाने कॅफे मध्ये बसुन चहा व स्वातीचा डबा याचा आस्वाद घेत होत्या.
'विनि एक विचारु'
'तुला कधीपासुन परवांगीची गरज भासली.'
'तु कराटे...'
'नाही ग, तो इंडीयन आर्ट आहे'
'पन...'
'तु काय माझा इंटरव्हुव घेतेस.'
स्वातीला एव्ह्ड्या दिवसात एक समजली होती. जेव्हा विनिताला एखाद्या विषयावर बोलायचे नसेल. तेव्हा ती असेच काहि तरी बोलत. मग आपन समजायचे कि विषय बदल केला पाहिजे.
स्वातीने पन विषय बद्द्लला. दोघीपन शांतपने पुढ्यातले गिळत घेतले. तेव्हढ्यात अचानक विनिताच्या चेहर्यावरचे भाव बद्द्लले. काय घड्ले हे विचारण्यासाठी स्वातीने तोंड उघडनार तोच विनिताने मोबाइल काढुन एक नंबर डाइल केला.
'सलाम चाचा...'
'जी मै विनिता बात कर रही हु.'
'जरा अब्बुसे बात करा देंगे.'
विनिताच्या प्रतेक शब्दात अनेक भाव होते. एक काळजी, जरब,. तिचा चेहरा व आवाज एकुण कोणिही त्या क्षणि घाबरला असता.समोर कोण आहे ते समजत नव्हते. पन स्वातीला एक समजत होते की विनिता अचानक खुप बद्द्लली होती. पन असे कोणते कारण नसताना. ह्याचे स्वातीला आश्चार्य वाटत होते.
'अब्बु '
'मै विनिता, मै आ रही हुं'
'आप को रुकना है'
'चाचा आप अब्बु का ख्याल रखना मै आ रही हुं.'
'स्वाती मै, आय मिन , मी लखनऊला जात आहे. अब्बूची तबियत ठिक नाहि.'
एव्हडं म्हणत विनिताने परत दुसरा फोन लावला.
'ये हॅलो वैगरा छोडो , ओर पहली फ्लाइट पकड्के इंडिया आव, अब्बुकि तबियत ठिक नहि है'
स्वाती वेड्यासारखी पाहत होती आणि विनिता निघुन गेली होती.
छान! keep going!!!!!!
छान! keep going!!!!!!
दिपाली याआधीचे भाग कुठे
दिपाली याआधीचे भाग कुठे वाचायला मिळतील? नवीन भागाच्या आधी रिलेटेट कथेच्या पूर्वीच्या सगळ्या अपूर्ण भागांची लिंक दिली तर माझ्या सारख्या चुकार वाचक मंडळींसाठी मदत होईल.
विनिता जर रात्री तिला शोधत
विनिता जर रात्री तिला शोधत आली नसती तर जे घडले असते त्याचा विचारही >> चौथ्या भागात किंवा पाचव्या भागात याचे वर्णन नाहीय, किंवा कदाचित यांच्या मधला भाग मी मिस केला... कारण वरच्या वाक्याची आणि त्या प्रसंगाची लिंक लागली नाही. त्या भागाची लिंक मिळेल का प्लीज?
अॅक्च्युअली मला काही समजलेच
अॅक्च्युअली मला काही समजलेच नाही. या कथानकाचे अनेक भाग आहेत का?
क्षमस्व!
मला काहिहि समजले
मला काहिहि समजले नाहि.............!!!
मला पण... जुने भाग कुठे
मला पण... जुने भाग कुठे मिळतील? आणि 'ण' ल 'न' वाचायला कसंतरीच वाटलं .. क्षमस्व!
भाग १
भाग १ http://www.maayboli.com/node/18563
भाग २ http://www.maayboli.com/node/18573
भाग ३ http://www.maayboli.com/node/18636
भाग ४ http://www.maayboli.com/node/18700
पुढचे काहि भाग आहेत का?
पुढचे काहि भाग आहेत का?
विनिताने जातानाच स्वातीला
विनिताने जातानाच स्वातीला रात्री घड्लेल्या प्रकारा बद्द्ल कोणालाही न सांगण्याचे बाजावले. पण स्वाती ने जानले होते की विनिता जर रात्री तिला शोधत आली नसती तर जे घडले असते त्याचा विचारही स्वातीला करवतही नव्हता.
>>>>>>>>>>>>>>> रात्री काय घडले ते कुठे कळेल??