---शब्द ...भाग ४....जयनीत दिक्षित--

Submitted by जयनीत on 19 August, 2010 - 12:41

दोन्-वकिल साहेब तुम्हीच आता सांगा तुम्ही ज्यान्च्या साठी एव्ह्ढा जीव टाकताय तुम्हाला काही कमी जास्त झालं तर ते काय करणार आहेत तुमच्या साठी?

वकिल्-ते काही करो वा ना करोत,अन मी हे काही त्यांच्या साठी करतच नाहीय्,हा माझा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्यात त्यानी काही करावं अशी माझी काहीही अपेक्षा नाही.

दोन- म्हणजे?

वकिल-हा माझ्या प्रोफेशनल एथीक्स चा प्रश्न आहे,त्यात त्यानी पडाव अशी माझी अपेक्षा नाही.ते माझं मी बघील्,अन त्यात त्यानीही बोललेलं मला आवडणार नाही.

दोन-म्हणजे तुम्ही आमचं ऐकायचच नाही असच ठरवलय तर?

वकिल-तसं समजा हवं तर.

एक-चला आता आम्हीही मोकळे.आता आम्हाला दोष देउ नका तुम्ही.

वकिल-हो,नाही देणार्,या आता.

एक-वकिल साहेब लई ओव्हर कॉन्फीडन्स चांगला नाही.

वकिल-बरं बरं ते तुम्हालाच कळेल कोण ओव्हर कॉन्फिडन्स मधे आहे ते.या आता खुप झालं.

एक्-खुप जास्त बोलतोस तू वकिल,बघतोच तुला.

वकिल-हो हो बघुन घेशीलं.नीघ आता.

एक- ए, तुझी तं.(आंगावर धावतो)(दुसरा त्याला ओढतो)

वकिल-ए सरळ रहा हे तुझं घर नाही, की गाव नाही समजलास्!हे सगळे नखरे बाहेर दाखवायचे इथे नाही.

एक-ये, ये तु बाहेरच ये,मग दाखवतोच तुला.

वकिल्-बे ए जा जा खुप बघितलेत तुझ्या सारखे चल नीघ आता.दम असेल तर करुन दाखव नुसता बोलु नकोस.
(क्रमश:)

गुलमोहर: 
शब्दखुणा: