http://www.maayboli.com/node/18116
[पुढे]
दोन वर्षांखाली रेल्वे अपघातात निरंजनचे आई-बाबा गेले, गेल्या वर्षी केतकीची आई गेली, बाबा त्यांच्या गुरूंसोबत तीर्थयात्रेला गेले तेव्हापासून लहानग्या ओंकारला सांभाळण्यासाठी केतकीनं आपली पीएचडी अर्धवटच ठेवली, निरंजनला मदत म्हणून त्याच्या फॅक्टरीत जाणं सोडलं. त्यात भर म्हणून की काय, स्वैपाकाच्या सखूबाईंनी काम सोडणार असल्याचं सांगितलं. निरंजनच्या बालपणापासून त्यांच्याकडे कामाला असलेल्या सखूबाई अगदी विश्वासाच्या, जशा काही घरच्याच होत्या. त्या काम सोडणार म्हणजे त्याचं कारणही तसंच काही महत्त्वाचं असणार!
"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली.
अटळ....
"ए लक्ष कुठय तुझ?"
"अगं लक्षच लागेना कशात काय करु.. प्रेमात पडलोय तुझ्या .."
"ए काहीही काय बावळट नीट सांग..what happen?"
"खर..हेच"
त्याचे डोळे काहीतरी बोलत होते...
.......................................हे परत एकदा...नकॊ.
"चारु काहीही गंमत नको..सांग पाहु"
ऑफ़िसमधुन चेंज म्हणुन आम्ही समोरच्या कॉफी शॉप मध्ये आलो होतो..दोघ होतो..आणि नेहमी यायचो अर्थात आम्ही दोघांनी बरोबरच जॉइन केल्या मुळे असेल पण या ऑफ़िसमध्ये आल्या पासुन चारुशीच बोलण जास्त होत होत..पण आज तो हे काय बोलतोय.म्हणजे हा पण ..
"चारु चल नको सांगु..पटकन जाउ यात खुप काम निपटायचय रे अजुन"
सुर्योदय
``अहो जयंतराव, मि कधीपासून दारावरची बेल वाजवतोय. दार उघडायला इतका उशीर ?``
``या ... या मोहनराव . आत या``
``अहो , काय ही अवस्था करुन घेतलीय तुम्ही. म्हणजे वहिनी गेल्यापासून मी बघतोय , जवळ जवळ महिना झाला , न तुम्ही कुठे बाहेर दिसता न रस्त्यात . सारख आपल दार बंद``.
``मोहनराव .." अस म्हणत जयंतरावांनी मोहनरावांना मिठी मारली व ते हमसाहमशी रडु लागले.
दोन मिनिटे मोहनराव तसेच उभे राहिले. जयंतरावांना त्यांनी मनसोक्त रडु दिल.
``हे बघा आधी नीट इथे बसा बघु. पाणी हवय ?``
``नको , नको``
``मग आधी इथे शांत बसा बघु, का माझ्या घरात येताय ?``
``नाही . नको``.
आतापर्यंत कॉर्पोरेट जगातील व्यवहारापासून उगम पावलेल्या माझ्या काही रुपक कथा आपण वाचल्यात. त्यावर दिलेल्या बऱ्या वाईट प्रतिसादापासून नवे काही काही शिकायला मिळाले.
ह्या आधीच्या कथा कॉर्पोरेट जगातील काही विशीष्ट वागणुकी मधे उगम पावल्या होत्या. ही पुढची कथा मात्र ह्या जगाचेच चित्र रेखाटण्याचा एक प्रयत्न आहे. मागे जालावर तीन तारांवर बसलेल्या पक्ष्यांचे एक शिटी चित्र पाहिले होते. त्यावरून ही कथा सुचली. हे जग इतके गुंतागुंतीचे आहे, की कोणतेही एक चित्र त्याचे नीट दर्शन घडवू शकत नाही. त्यामुळे, त्रुटी राहिल्या असणारच. पण तरीही..............
पक्ष्यांची सभा
एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्रित काम करून भरपूर शिकार मिळवून देतील.
मुंगळा, माशी आणि माकड
एका झाडावर उंच ठीकाणी मधाचे एक पोळे होते. त्यातून अधुनमधून मधाचे थेंब, पोळ्याचे छोटे तुकडे खाली पडत होते. झाडाखाली एक मुंगळा ते गोळा करून हळुहळू एका ओंडक्याखाली नेऊन ठेवत होता. प्रत्येक खेपेला थोडा थोडा करून असा बराच मध त्याने ओंडक्याखाली जमवला होता. त्याचे कार्य अगदी शांतपणे आणि नेटाने सुरू होते. एक आळशी माशी त्याचा हा उद्योग पाहून तिकडे आकर्षित झाली. मुंगळ्याच्या प्रत्येक खेपेबरोबर माशी त्याच्या डोक्यावरून गुणगुण करीत उडत उडत झाडापासून ओंडक्यापर्यंत जात होती. अशा खूप खेपा झाल्या. मुंगळ्याचे काम अविरत सुरू होते.