कथा

सत्तांतर

Submitted by नितीनचंद्र on 10 July, 2010 - 22:54

काय झाल रे ? असा डोक्याला हात लाऊन का बसला आहेस ? प्रशांतला शांत बसलेला पाहुन त्याच्याच विभागात काम करणार्‍या, सेल्स बॅक अ‍ॅफिस संभाळणार्‍या अविनाशला जरा वेगळच वाटल. दोघांच अनेक वर्षाच ट्युनींग असल्यामुळे व्यावसायीक सुख वा दु:खाची विचारपुस नेहमीच व्हायची. दोघही मनमोकळ करीत सुख वाटत आणि दु:खावर उपाय शोधत पुढे जायचे. ही व्यावसायीक मैत्री अनेक अडचणींवर मात करीत दोघांच्याही मनात एकमेकांबद्दलचा आदर वाढवत फुलत होती.

गुलमोहर: 

तीन बेडूक

Submitted by अरुण मनोहर on 10 July, 2010 - 06:05

पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या.
**************************
तीन बेडूक

गुलमोहर: 

एशान उवाच.

Submitted by ऋयाम on 10 July, 2010 - 02:58

प्रेरणेचे मुळ : "शब्द": - http://www.maayboli.com/node/12228

मुळ कथा "शब्द" फार आवडली. ती 'तिच्या' बाजुने लिहीलेली कथा होती. त्यात 'एशानच्या' बाजुनेही काही लिहीण्यासारखं असेल असं वाटुन एशानच्या बाजुने कथा कशी घडली, हे लिहावंसं वाटलं...
शब्दकरिण बाईंची परवांगी घेतली आहे. आभारी आहे परवांगी बद्दल. Happy

* अर्थात, मुळ "शब्द" च्या जवळपास पोहोचु शकीन असं वाटत नाही, पण एक प्रयत्न जरुर करणार आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"क्या हिरो? क्या सोच रहा है? "
"काही नाही गं."
"अपने कंचनसेभी नहीं कहेगा?? "
"कंचन प्लीज...... आणि अचानक हे हिंदीमधे काय लावलयस? " एशान म्हटला.

गुलमोहर: 

सौ. वनिता रानडे

Submitted by बेफ़िकीर on 8 July, 2010 - 23:25

उदयच्या पहिल्या एसेमेसवरच शांत राहायला हवे होते हे वनिताला लक्षात आलेले होते. पण आता जरासे प्रकरण पुढच्या टप्प्यावर गेलेले होते. मॅनेज करणे भाग पडणार होते. आणि हळूहळू ते प्रकरण निर्जीवही करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी आवश्यक ती देहबोली, आवश्यक तिकडे संवाद फिरवण्याचे कौशल्य हे स्त्रीमधे उपजत असतेच, पण आणखीन विचारपुर्वक वागावे लागणार असे दिसत होते.

गुलमोहर: 

पॉलची भारतभेट - एक काल्पनिक कथा

Submitted by सुनिल परचुरे on 8 July, 2010 - 09:50

पॉलची भारतभेट - एक काल्पनिक कथा

आधी जर्मनीच्या वृत्तपत्रात बातमी आली " भविष्यवेता पॉल अचानक दोन दिवसाच्या रजेवर. जर्मनीतील ऍक्वेरियममधील पॉल व त्याचा केअरटेकर मि. नॅनो मुल्लर दोघेही दोन दिवसांच्या रजेवर गेले आहेत. नॅनो जातांना मेल करुन गेले आहेत कि, त्यांचे वडिल जे भारतात नावाजलेले ऍस्ट्रॉलॉजर आहेत ते शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे नॅनो पॉलसह त्यांना भेटायला गेले आहेत."

गुलमोहर: 

शीर्षक सुचवा

Submitted by कमलेश पाटील on 4 July, 2010 - 03:38

आज खूपच उत्सुकता वाटत होती. आज मी विक्रमला भेटायला जाणार होते. विक्रम, चाटींग करता करता भेटलेला एक मुलगा एवढी छोटीशी ओळख बरोबर ठेवून. मनात थोडी धाकधूक होतीच. कसा असेल तो, काय बोलेल तो. कारण कॉम्प्युटर आणि फोनवर गप्पा मारणं वेगळं अन् त्याच माणसाला प्रत्यक्षात भेटणं वेगळं.

तरीही मी त्याला भेटायला चालले होते.एक वेगळीच आपुलकी होती त्याच्या बोलण्यात म्हणूनतर त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करताना मी जास्त आढेवेढे घेतले नाही.

गुलमोहर: 

सिंधूचा बाप

Submitted by dreamgirl on 1 July, 2010 - 07:50

आज माझा प्रत्येक अश्रू
हरएक शब्द बनला आहे;
म्हणूनच जीभेला धार अन
डोळ्यांना कोरडेपणा आला आहे...

गुलमोहर: 

धोंड्या-१

Submitted by प्रकाश काळेल on 1 July, 2010 - 01:43

"धोंड्याssssss"
गडप अंधारातनं आलेली हाळी काळ्या दगडाच्या भिताडावर आदळून परत त्याच अंधारात गप्प झाली. आन येकाच घटकेच्या शांततेनंतर दचकलेली जंबेल आवाजाच्या दीशेने भूकत अंधारात झेपावली. धोंड्या जेवत्या ताटावरनं उठून पळतच भायीर आला आन तीला सावारलं. न्हायतर आज भगवान नानाला पार फाडलाच होता तीनं!
"कोण हाय गा ? ...भगवान नाना? एवढ्या रातच्याला! "
"आरं...आरं लेका धोंड्या त्या कुत्रीला रातच्याला तर बांधून ठीवत जा की रं!" नानाच्या कापरं भरलेल्या आवाजावरनंच त्येंची हाबकलेली अवस्था कळत होती!

गुलमोहर: 

मिठी

Submitted by ऋयाम on 24 June, 2010 - 11:45

"ज्या ने!" (^^)/ "चल, भेटुया नंतर ! " (^^)/ ...."हिरोशी"नं मेसेज केला.
"मात्तेरुयो. क्यो~मो इचिनिचि गान्बात्तेने!" (´∀`) "वाट बघतेय. " (´∀`) ........... "एमी"चं उत्तर आलं.

"पुढं काय बोलावं?" याचा विचार करत असतानाच "ट्रेनमधला मागचा माणुस बिनधास्त आपला मेसेज वाचतोय!" हे पाहुन थोडंसं वैतागुनच हिरोशीनं मोबाईल बंद केला. "'एमी' सारखी आपणही मोबाईलला ती 'फिल्म' बसवुन घ्यायला हवी होती. ती लावली की ठराविक अँगलमधुनच मोबाईलच्या स्क्रीनवरचं दिसतं. आपल्या 'प्रायव्हसी'चं आपणच बघायला हवं.................

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा