डिसेंबर १९७६ साली मी एन.डी.ए. मध्ये घाबरत घाबरत प्रवेश घेतला. घरातून पहिल्यांदाच बाहेर शिक्षणासाठी राहात होतो, त्यामुळे थोडे घाबरणे साहजिकच होते. शिवाय रॅगिंगबद्दल ऐकून होतो. अर्थात एन.डी.ए. हे पुण्याजवळ असल्याने थोडे मानसिक समाधान होते की महाराष्ट्रातच आहे. पण अर्थात ते फक्त मानसिक समाधानच होते; कारण एन.डी.ए. चे विश्वच वेगळे आहे. ढोबळ मानाने सांगायचे म्हणजे कॅडेटसाठी तरी तिथे आठवडेच जातात, दिवस नाही; कारण सोमवार ते शनिवार अगदी श्वास घ्यायलासुद्धा वेळ काढायला लागतो आणि तो उपलब्ध नसतो.
समस्त मायबाप वाचकहो, हा भाग टाकण्यात झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल माफी तरी कशी मागु? काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला खुपच उशीर झाला. पण कदाचीत त्यामुळेच मला कळाले की मायबोलीकरांचे माझ्यावर , माझ्या लेखनावर किती प्रेम आहे, किती जीव आहे ते. या पुढे अशी चुक होणार नाही याची ग्वाही देत हा भाग टाकतोय. खरेतर या भागात संपवण्याचा विचार होता. पण काही नवीन गोष्टी अॅड होत गेल्याने पुढच्या भागापर्यंत तुम्हाला अजुन प्रतीक्षा करावी लागेल. क्षमस्व.
विशाल कुलकर्णी
************************************************************************************************************
गिनिपिग - भाग 1
``शशांक, मी काय म्हणतेय, अरे गेले पंधरा दिवस माझ्याशी तु धडपणे नीट बोलतही नाहीस . काय झालय काय तुला ?``
`` काही नाही ग. ऑफिसमध्ये एवढ काम साचलय न की मलाच कळत नाही कि मी ते कसे संपवेन ?``
``एचढच कारण ?``
``हो मग दुसर काय असणार ?``
``नक्की ?``
``अग ..,
``मग मला सांग चिन्मयचे रिपोर्टस आले ? गेले दोन तिन आठवडे झाले तु काहीना काही कारणाने त्याच्या रिपोर्ट बद्दल माझ्याशि बोलतच नाहीस . का काहि ...``.
``तस काही नाही ग, तु आराम कर बघु. आता तुझ्या डिलिव्हरिच्या डेटला दोनच आठवडे राहीलेत. तु खरच आराम कर ग``.
(तराफ हा उर्दु शब्द असुन त्याचा अर्थ धोका असा होतो)
खरंतर हा सगळा आज खरंतर अंथरुणातून उठावंस वाटतंच नव्हत़ं. उगाच कुठेतरी मनात हुरहुर लागली होती. सगळं नीट घडेल ना की काही अघटित घडेल. खरंतर हा सगळा विचार निर्णय घ्यायच्या आधी करायला हवा होता. एक मन म्हणतं तू सगळं घाईघाईत ठरवलंस तर एक म्हणतं तुझ्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. खरंच नाईलाजच होता की माझा. एकीकडे सगळा संसार वाऱ्यावर टाकून गेलेला माझा आयुष्याचा जोडीदार तर दुसरीकडे माझ्या येण्याची वाट बघणारा माझा श्रावण.
दंडोबाच्या मनोर्यावर वारा भयाण सुसाटला होता. अर्ध्यापेक्षा जास्ती सिगरेट वार्यामध्येच अगरबत्ती होवुन चालली होती. पण आज आख्ख पाकीट बरोबर होतं. पूर्वी इथेच चार-पाच मित्र मिळुन थोड्याफार सिगरेटी आणायचो आणि शेअर करुन प्यायचो. कुणी तीनपेक्षा जास्ती झुरके घेवून सिगारेट पुढे नाही सरकवली की डोक्यात फाट्ट करुन टपली पडायची. आज खरं तर आख्खं पाकीट होतं पण शेअर मारायला कोणी नव्हतं.
बरयाच दिवसानी घरी परतलो. कारणही तसच होतं. माझे वडील वारले होते. दिवस कार्य सुरू होते.विविध क्शेत्रातील परिचयातील माणसे,नातेवाइक भेटून सांत्वन करून जात होते. इतक्यात एक चेहरा ओळखीचा पण नाव काहीकेल्या आठवत नव्हते. माझी गडबड पाहून ते स्वतःहून पुढे आले आणि म्हणाले" अरे सुनिल ना तू ? मी देशपान्डे काका - तरीही माझ्या चेहर्यावरील प्रश्न्चिन्ह पाहून हसले आणि म्हणाले अरे मी पोस्ट्मन काका ! "
सकाळचे सात साडेसात वाजले असतील. पहाटे पहाटे धुक्याच्या मिठीत असलेलं हे शहर नुकतंच कुठे जागं होतय. सुटीचे दिवस असल्याने शाळकरी मुलं, कॉलजकट्टे पण अजून जागे झालेले नसतील. डिसेंबरमधली थंडी माझ्या अंगाला मात्र जाणवतेय.
उन्हाचा एखादा चुकार किरण जमिनीवर येतोय. हळदी रंगाचे रस्त्यावर पडलेले कवडसे. रस्त्याच्या आजूबाजूला घनदाट झाडं. आणि त्यातून येणारे ते निरनिराळे पक्ष्यांचे आवाज. एखाद्या स्वर्गासारख्या शांत ठिकाणी आल्यासारखं मला वाटतय. चार पावलावर पुढे माझा नुकताच झालेला नवरा चालतोय.
भाजी वाल्याशी हुज्जत घालणाऱ्या देशपांडे काकूला पहिले आणि काकांची आठवण झाली.
देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करायचे. कारकुनी नोकरी असली तरी फक्त हिशोबाची वही नाही तर बरेच काही लिहिणारे देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करणारे देशपांडे काका...... " सोनू ..... एक दिवस माझे पण नाव येईल हे कोण कवी लोक आहेत त्यांच्या सोबत "... असे म्हणणारे देशपांडे काका.... आणि आमच्या फुटकळ दाद देण्यावर सुद्धा मनापासून खुश होणारे वल्ली ... देशपांडे काका !!
५०००० रु साठले कि माझे पुस्तक छापेन असे कायम स्वप्न पाहत जगणारे देशपांडे काका....
शेताच्या बांधावरुन चालताना रमाईने गरज नसताना डोक्यावरचा पदर सावरला आणि ती झपझप चालू लागली. आठ दिवसापुर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला.
पाटील,"रमाबाई, अवो बामणाच्या बाईने कसल हो शेत कसायच? असल्या नाजुक हातानी काय काम करणार तुमी आन काय ती जुंधळ पिकवणार? मला कसायला द्या, सगळा खर्च करुन तुमच्या वाटणीच देतो की जुंधळ आणुन अगदी घरपोच"
रमाईच्या पोटात तुटल, काशीनाथराव असताना कधी हा माणूस आपल्याशी तोंड वर करुन सुद्धा बोलला नाही आणि आज सरळ सरळ आपल्या शेतावरच हा टपलाय.पाटलाला दुखवुन देखील चालणार नव्हत कसा ही असला तरी शेजारी शेत होत त्याच आणि अडीअडचणीला त्याच्याकडे मदत मागायला जाव लागणार होत.
"सर्वच क्षेत्रांत स्पर्धा असल्याने मुलांवर ताण येतो. अशा वेळी मुलांशी मैत्री करा; त्यांना समजून घ्या. त्यांच्या अडचणी जाणून घ्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका,' अशी कळकळीची विनंती आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांनी समाजाला केली आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. तो करण्यापूर्वी आपणही समाजाचे; आई-वडिलांचे काही देणे लागतो, याचे भान ठेवा, असे मनःपूर्वक आवाहन त्यांनी केले आहे -
वृत्तपत्र - ई-सकाळ
पालक आणि मुले यांच्यातली दरी आणखी खोल खोल होत चालली आहे का??.. असा प्रश्न निर्माण करणारा हा लेख....