चिलमीचं धुराडं पेटवून ज्ञानू दलाल आपल्या अंगणातच तिन्ही सांजचा धूर काढीत बसला होता, तोच बाबू खुचीकर त्याच्या अंगणात आला. भुईतनं वर आलेल्या एका दगडाला त्याच्या अंगठ्यानं जोरात सलामी दिली आणि डावा डोळा बारीक करून तो विव्हळला.
“आगा ऽ ज्ञानदा ऽऽ”
“कायरं बाबू?” – ज्ञानू दलाल सपाट्यानं उठला.
“आयला! कसलं रं हे अंगाण तुझं !”
“माझ्या अंगणात तेरा क्या है रे ऽऽ? ज्ञानू दलालानं हळूच गंमत केली.
“मेरा काम हाय म्हणूनच आया है!” बाबूनं कळ सोसत धेडगुजरीत न म्हणता धेड मुसलमानीत म्हटलं. हळूच दलालानं अंगणात टाकलेल्या घोंगडयावर तो बसला. बसल्या-बसल्या
पुर्वार्ध : वडीलांच्या मृत्युनंतर गारगोटीचा शिरीष भोसले जगायला, पैसे कमवायला म्हणून मुंबईला राहणार्या आपल्या जिवलग मित्राकडे सतीशकडे येतो. इथे आल्यावर शिर्याला कळते की सतीश, त्याचा जिवलग मित्र ऑफीसच्या कामासाठी म्हणून परदेशी गेला आहे. मग सुरू होतो नोकरीचा शोध. याला शेंडी लाव्..त्याला टोपी घाल असे अनेक धंदे करता करता एके दिवशी .......
बिलंदर : भाग १ आणि २ : http://www.maayboli.com/node/14571
**********************************************************************************
"औध्या......... माझा दोस्त गेला रे. मारला त्या भडव्यांनी त्याला."
(संशयित भाग-१ वरून पुढे चालू)
"आर यु ओके ?"डॉक्टरांनी विचारणा केली.
"मी... ठिक... आहे." आगंतुकाने पुन्हा हाताने इशारा करत ती शब्द कष्टाने उच्चारले.
"तुम्हाला वेड लागलय का डॉक्टर ? तुम्ही जीव घेतला होता त्या माणसाचा आता." स्वतःला सावरून ती चक्क किंचाळलीच त्यांच्यावर. ते वरमले. आपल्या हातून चुक झाली हे त्यांच्या चेहर्यावर दिसत होते.
"सॉरी. बॉथ ऑफ यु. तुम्हाला खरचं काही लागलं नाही ना ? " ते पुन्हा आगंतुकाकडे वळले.
"अजून दोन मिनिटे आवळलं असतं तर नक्कीच झालं असतं." आगंतुकाने स्पष्टपणे आपली भावना व्यक्त केली.
सकाळचे ११ वाजले आणि नेहमी प्रमाणे ऑफिसचे कामकाज सुरु झाले.ऑफिसमध्ये काही शिपायांच्या जागा भरायच्या असल्याने नोकरीसाठी गेटवर ताटकळत बसलेल्या रामूला साहेबांनी हाक मारली. रामू लकवा भरल्यागत साहेबांसमोर येऊन उभा राहीला. सत्तेची आणि लाचारीची ओळख ऑफिसच्या दरवाजातच आली.
http://arunoday2010.blogspot.com/2010/04/blog-post.html
ःः चिल्का ःः
``अपर्णा , अग झाली का तयारी ?``
``तयारी , कसली रे ?``
``मस्करी करतेस ?अग चारंच दिवस राहिलेत आपल्याला काश्मीरला जायला ?``
``मग काय झाल ? तयारि कसली करायचीय ? आपली जायची , यायची , तिथल्या हॉटेल्सची ,सगळी-सगळी बुकीग्जस् झाली आहेत. आता फक्त बॅगा भरायचाय न? गेल्या वेळी मी जेव्हा म्हटल की बॅग भरायची म्हणजे कसल मोठ्ठ काम असत, ते जो करतो त्यालाच कळत तर तु म्हणालास होतास त्यात काय एवढ , पुढल्या वेळेला मी भरेन. तेव्हा आता ते काम तुझ``.
खुप वेळा ' मन रानात गेले गं , पाना पानात गेलं ग ' असे गुणगुणत उड्या मारत रानात स्वछंदपणे फिरावेसे वाटते . एखादे छान गाणं कानावर पडावे ..अणि मग मी त्या गाण्याची नायिका व्हावे अशी एक कल्पना किती सुखद असते !!
आयुष्य क्षणभर कुठेतरी थांबले आहे असे उगाचच वाटते . पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो आहे . आणि बैलगाडी चे सर्जा आणि राजा गळ्यातली घुंगरांची माळ वाजवून रस्त्यातल्या लोकांना आपण येत आहे अशी ग्वाही देत आहेत. मी त्यांना "हुर्रर्र " म्हणून वेगाने चालायला सांगते आहे आणि मग हलकेच माझा वेग वाढला आहे असे वाटायला लागते.
विमल नर्सींग होमच्या वेटींग रुम मध्ये अतुल बसुन होता. आत्ताच त्याच्या बायकोला - अश्विनीला त्याने कळा सुरु झाल्या म्हणुन अॅड्मिट केल होत. संध्याकाळचे सात वाजले होते. अजुन चार पास तास लागतील डिलीव्हरी व्हायला असा अंदाज अटेंडिंग डॉक्टर्सनी सांगीतला होता. अश्विनी काही खाऊन निघाली होती. लेबर रुमच्या बाहेर एक रुम होती. त्यातल्या एका बेडवर अश्विनी झोपली होती.
हि कथा माझ्या ब्लॉग वर आहेच , ब्लॉग न पाहीलेल्यांसाठी ......
आटपाट नगर होते . नगरात मुसळधार पाऊस आला . पावसात चिऊ ताई उडत होती. पंख भिजून चिंब झाले होते. आणि फडफड सुद्धा करता येत नव्हती . कोणी कोणी दार उघडायला तयार नव्हते . म्हणे आज काल जमाना खराब आला आहे.
चिऊ चे स्वगत .....
शी आजच या मोबाईल ची हि अवस्था व्हायची होती. या माणसांच्या towers पेक्षा जास्त height नको का आमच्या towers ची ? at least Aeroplane mode तरी पाहिजे होता या मोबाईलला . जाम वैताग आहे . उडताना नेमकी range जाते .
सचिन लक्ष कुठ आहे ? कशात गढला आहेस येवढा ? प्राची सचिनला हलवत विचारत होती.
अ..? काही नाही ग
ह... काही नाही ग ? ऑफिसमधुन आल्यापासुन पहाते आहे. तु बोलत नाहीस्. काय झालय ? ऑफिसमधे काही घडलय का ?
अ...? काही नाही
हे जरा माझ्याकडे पाहुन म्हण. बावीस वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि त्याच्या आधिची ..... सानिया घरात होती म्हणुन प्राचीने पुढचे शब्द हळु उच्चारत वाक्य तोडल. तु विचारात गढला आहेस हे मला समजत का नाही सचिन ?
नसेल काही सांगायच तर नको सांगु पण काही नाही हे म्हणु नकोस.
सचिन तरीही शांत होता. कुठुन सुरु कराव याची मनाशी जुळवा जुळव करत होता.
प्राची ... आज वसुचा ईमेल आला आहे.