दिवाळी असल्यामुळे संपुर्ण परिसर दिव्यांच्यी रोषणाई आणि फटाक्यांच्या आतीषबाजीमुळे गजबजुन गेला होता. महेश ने त्याच्या प्रेयसीला हमरस्त्यावर सोडले आणि आपली बाईक घ्ररच्या दिशेने वळवली अजुनही त्याच्या मणात आत्त्ताच घडुन गेलेल्या गोड आठवनी तरळत होत्या. ऐवढ्यात बाजुने कुनीतरी ऐ मह्ह्हेश अशी जोरात हाक मारली हाक ऐकताच महेशने करकचुन ब्रेक दाबला आणि आवाजाच्या दिशेने वळुन पाहीले, समोर दिपक आणि गणेश त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत उभे होते त्या पैकी ऐक तेजस आहे हे महेश ने ओळखले,दुसय्राची चॉकशी केली असता त्याचे नाव इनायत असल्याचे समजले.
सरकारी कार्यालयातून चहापाणी न पाजता एखादं काम करुन घेण्यासाठी किती जोडे झिजवावे लागतात याचा अनुभव तुमच्यापैकी बर्याच जणांना आला असेलच. माझ्या मित्राचा असाच एक अनुभव मांडत आहे...
हि 'यशोगाथा' माझ्या मित्राच्या Marriage certificate ची...त्याने ज्या चिकाटीने ते मिळवलं त्यामुळे मी या गोष्टीला 'यशोगाथा' म्हटलं, केवढी सहनशक्ती लागते हो त्यासाठी!
त्याचं नाव सुजित .. एका आय.टी. कंपनी मध्ये नोकरी असूनही मी Marriage certificate बनवण्यासाठी agent पकडणार नाही किंवा पैसे चारणार नाही हा त्याचा हट्ट.
तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
कथा वाचकहो,
ही कथा वाचण्यापुर्वी माझी राखण ही कथा वाचावी हि विनंती. अन्यथा काही संदर्भ लक्षात न आल्याने कथा वाचनाचा पुर्ण आनंद मिळणार नाही.
नसली वाचल्यास ही लिंक घ्या. http://www.maayboli.com/node/14421 राखण
बोलका ही कथा राखण या कथेचा पुढ्चा आणि बहुदा शेवटचा भाग आहे. कथा कशी वाट्ली हे सांगाच. मला माहित आहे यात अनेकांना मी पटणार नाही अस लिहील आहे. सर्व काही प्रत्येकाला पटावेच हा आग्रह अजिबात नाही. ज्यांना विचार पट्णार नाही त्यांनी कथावाचनाचा आनंद घ्यावा, विचार सोडुन द्यावा हि विनंती.
----------------------------------------------------------------------------------
आंधळी कोशिंबिर
``अरे या या डॉक्टर साहेब, मी तुमचीच वाट बघत होतो`` सोफ्यावरुन उठत मोहनराव म्हणाले.
``अरे म्हणजे काय , तुम्ही एवढया प्रेमाने बोलावलत की यायलाच पाहिजे. त्यामुळे आज संध्याकाळी सात नंतर कोणालाही अपॉईंटमेंट दिली नव्हती. त्यामुळे कन्स्लटंसी लौकर बंद करुन मुद्दाम आलो``. डॉ. आकाश गोखले म्हणाले.
``हं मग कसा काय गेला आजचा दिवस ?`` डॉक्टरांनि विचारले.
चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला?
चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली.
रेस्ट हाऊसवरून स्पेशल आयजींची गाडी बाहेर पडली आणि त्यापाठोपाठ पत्रकारांचा जत्था बाहेर पडला. डावीकडच्या गेटमधून सारे बाहेर आले. त्या क्षणी त्यांच्यापैकी कोणाच्याही हाती काहीही बातमी नव्हती.
स्पेशल आयजींची बैठक सुमारे सव्वादोन तास सुरू होती. बैठकीत एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्याचं फक्त स्पेशल आयजींनी सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात होती. वाटाघाटींचा प्रयत्न सुरू असला तरी, जन संघर्ष समितीकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नव्हता; मात्र समितीच्या कारवायाही थांबल्या असल्यानं कोंडी फुटण्याची चिन्हं होती.
"काय रे उम्या आज एकदम खासा बेत? काय सुमा तुझ्या नवर्याला लॉटरी लागली की काय ?" जेवणाच्या टेबलवर बसता बसता माझा जिवश्य कंठश्य मित्र अवनिश मला म्हणाला. " काय काय बनवलय ? आमरस आणि पुरणपोळी सुध्दा ?याशिवाय चटणी, कोशिंबीर, वरण भात जेवायला घालुन सदेह स्वर्गात पाठ्वायचा विचार दिसतोय तुझा "? अवनिश सर्व अन्न पाहुन मनापासुन दाद देत म्हणला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सदर कथा ही मानसी(रेईको लॉज) च्या पात्रांबद्दल आहे, पण ती भयकथेचा पुढचा भाग नाही.
"मानसी!!" (रेईको लॉजः भाग २)
(मुळ भयकथा इथे आहे: - http://www.maayboli.com/node/13380 ) ..... धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
....थंडी हळुहळू कमी होऊ लागली होती...